प्रश्नः
देवाचे सार्वभौमत्व आणि मानवाची स्वतंत्र इच्छा मिळून तारणासाठी कसे कार्य करते?
उत्तरः
देवाचे सार्वभौमत्व आणि मानवाची स्वतंत्र इच्छा मिळुन तारणासाठी कसे कार्य करते ,हे पूर्णपणे समजने फार अश्यक्य आहे. फक्त देवाला हे समजू शकते,की दोघे तारणासाठी कसे एकत्र काम करु शकतात. कदाचित हया विषयावर इतर दुसऱ्या धर्म सिध्दांतांच्या देवाचा स्वभाव, आणि आमचे नाते यामधील संबंध पूर्णपणे समजून घेण्यासाठी आमची अयोग्यता समजून घेणे हे महत्वाचे आहे. दोघांमधुन कोणाकडेही अधिकजास्त दूर जाणे. याचा परिणाम तारणासाठी चुकीचा विचार करणे आहे.
पवित्र वचन स्पष्ट सांगते की, देवाला माहित आहे कोण वाचविला जाऊ शकेल (रोम 8:29; I पेत्र 1:2). इफिस 1:4 सांगते देवाने आम्हाला निवडलेले आहे “जगाच्या स्थापनेपूर्वी.” पवित्र शास्त्र वारंवार सांगते विश्वासनारे “निवडलेला” आहेत (रोम 8:33, 11:5; इफिस 1:11, कलसै 3:12 ;I थ्रेसलोनी 1:4; I पेत्र 1:2, 2:9) आणि “निवडुन घेतलेले” (मत्तय 24:22; 31; मार्क 13:20, 27; रोम 11:7; I तिमथी 5:21; II तिमथी 2:10; तिताला पत्र 1:1; I पेत्र 1:1). हे सत्य विश्वासनाऱ्यांसाठी पूर्वीपासूनच ठरवून ठेवले आहे (रोम 8:29-3 इफिस 1:5, 11). आणि तारणासाठी निवडलेले (रोम 9:11, 11:28, II पेत्र, 1:10)हे स्पष्ट आहेत.
पवित्र शास्त्र हे देखिल सांगते की, आम्ही ख्रिस्ताला तारणारा म्हणुन स्विकारणे हे आमचे आद्य कर्तव्य आहे. आम्ही फक्त हे करणे जरुरी आहे की- येशू ख्रिस्तावर विश्वास ठेऊन आम्ही वाचविले जाऊ (योहान 3:16; रोम 10:9-10). देवाला माहित आहे की कोण वाचविला जाईल .म्हणून देव त्यालाच निवडतो जो वाचविला जाईल म्हणून आम्ही ख्रिस्ताला निवडून घेतले पाहिजे. हे तीन सत्य कार्य करतात हे आमच्या बुध्दीकल्पनेपलिकडचे सत्य आहे (रोम 11:33-36). संपूर्ण जगाला शुभवर्तमान सांगणे हे आमचे आद्य कर्तव्य आहे (मतय 28:18-20; प्रेषित 1:8). आम्हाला पूर्ण ज्ञानाने निवडले ,व पुर्वीच नियुक्त केलेल्या, या सर्व गोष्टी देवावर सोपवून देऊन आपण शुभवर्तमान सांगण्याच्या या आज्ञेचे पालन करावे.
English
देवाचे सार्वभौमत्व आणि मानवाची स्वतंत्र इच्छा मिळून तारणासाठी कसे कार्य करते?