settings icon
share icon
प्रश्नः

विवाहापूर्वी सलगी अथवा घनिष्टतेची योग्य पातळी काय आहे?

उत्तरः


इफिसकरांस पत्र 5:3 म्हणते, "परंतु पवित्र जनांना शोभते त्याप्रमाणे, जारकर्म, सर्व प्रकारची अशुद्धता व लोभ ह्यांचे तुमच्यामध्ये नांवसुद्धा निघूं नये" कोणतीही गोष्ट जी लैंगिक अनैतिकतेकडे मात्र "इशारा" का करीत असेना ख्रिस्ती व्यक्तीसाठी अनुचित आहे. कोणती गोष्ट "इशारा" म्हणून आहे याची यादी बायबल आम्हास देत नाही किंवा आम्हाला हे सांगत नाही की कोणत्या शरीरिक कृती दाम्पत्त्याने विवाहापूर्वी कराव्यात म्हणून मान्य आहेत. तथापि, बायबल ह्या विषयास विशिष्टरित्या उद्देशून बोलत नाही याचा अर्थ असा नाही की देव विवाहापूर्वी "समागम-पूर्व" कृत्यास मान्यता देते. मतितार्थ असा की, सहवासपूर्व क्रीडा व्यक्तीस समागमासाठी तयार करण्यासाठी असते. मग तार्किकदृष्ट्या, सहवासपूर्व क्रीडा विवाहित दाम्पत्त्यांपुरती मर्यादित असावी. ज्यास सहवासपूर्व क्रीडा म्हणता येईल ते सर्व काही विवाहापर्यंत टाळावे.

एखादी कृती करणे अविवाहित दाम्पत्त्यासाठी योग्य आहे किंवा नाही याविषयी जर कुठलीही शंका असेल तर, त्यास टाळावे (रोमकरांस पत्र 14:23). कोणतीही आणि सर्व प्रकारची लैंगिक कृती विवाहित दाम्पत्त्यांपुरती मर्यादित असावी. अविवाहित दाम्पत्त्याने अशी कोणतीही कृती टाळावी जी त्याला लैंगिकक्रीडेच्या परीक्षेत टाकते, जी अनैतिकतेचा देखावा आहे, अथवा ज्यास सहवासपूर्व क्रीडा म्हणता येईल. अनेक पाळक व ख्रिस्ती सल्लागार दाम्पत्त्यास सल्ला देतात की त्यांनी विवाहापूर्वी हाथ धरणे, आलिंगन देणे, आणि हल्के चुंबन या पलीकडे जाता कामा नये. विवाहित दाम्पत्त्यास जिसके अधिक फक्त त्यांच्यामध्ये सहभागी होता येईल, तितके लैंगिक नाते त्या वैवाहिक जीवनात विशेष आणि अद्वितीय ठरेल.

English



मराठीच्या पहिल्या पानावर वापस या

विवाहापूर्वी सलगी अथवा घनिष्टतेची योग्य पातळी काय आहे?
© Copyright Got Questions Ministries