आपण मेल्यानंतर देवदूत बनतो का?


प्रश्नः आपण मेल्यानंतर देवदूत बनतो का?

उत्तरः
देवदूत देवाने बनवलेले प्राणी आहेत (कलस्सै 1:15-17) आणि मानवांपेक्षा पूर्णपणे भिन्न आहेत. ते देवाची योजना पार पाडणारे आणि ख्रिस्ताच्या अनुयायांची सेवा करणारे देवाचे खास एजंट आहेत (इब्री लोकांस पत्र 1:13-14). देवदूत पूर्वी मनुष्य किंवा इतर काहीही होते याचा पुरावा नाही - ते देवदूत म्हणून निर्माण केले गेले होते. देवदूतांना मुक्तीची गरज नाही व त्याचा अनुभवही घेता येणार नाही जे मानवजातीस देण्यासाठी ख्रिस्त जगात आला. 1पेत्र 1:12 मध्ये शुभवर्तमानात डोकावण्याच्या त्यांच्या इच्छेचे वर्णन केले आहे, परंतु त्यांना ते अनुभवण्याची गरज नाही. जर ते पूर्वीचे मनुष्य असते तर त्यांनी स्वतः त्याचा अनुभव घेतल्यामुळे तारणाची संकल्पना त्यांच्यासाठी रहस्यमय ठरली नसती. होय, जेव्हा एक पापी ख्रिस्ताकडे वळतो तेव्हा त्यांना आनंद होतो (लूक 15:10), परंतु ख्रिस्तामध्ये तारण त्यांच्यासाठी नाही.

अखेरीस, ख्रिस्तामध्ये विश्वास ठेवणार्‍याचे शरीर मरेल. मग काय होते? विश्वासणार्‍याचा आत्मा ख्रिस्ताबरोबर राहावयास जातो (2 करिंथ 5: 8). विश्वासणारा देवदूत बनत नाही. रूपांतराच्या डोंगरावर एलीया व मोशे दोघेही ओळखण्याजोगे होते हे विशेष. ते देवदूतांमध्ये रूपांतरित झाले नव्हते, तर ते स्वतः जसे होते तसे दिसले - जरी गौरवान्वित असले तरीही - आणि पेत्र, याकोब आणि योहान त्यांना ओळखू शकलेे.

1 थेस्सल 4:13-18 मध्ये पौल आम्हास सांगतो की ख्रिस्तामध्ये विश्वासणारे येशूमध्ये झोपले आहेत; म्हणजेच त्यांचे देह मेले आहेत, परंतु त्यांचे आत्मे जिवंत आहेत. हे वचन आपल्याला सांगते की जेव्हा ख्रिस्त परत येईल, तेव्हा जे त्याच्यामध्ये झोपलेले आहेत त्यांना तो आपल्याबरोबर आणील आणि मग त्यांचे शरीर उठविले जाईल आणि ख्रिस्ताच्या पुनरुत्थित देहासारखे नवीन केले जाईल, जे ख्रिस्ताबरोबर आलेल्या त्यांच्या आत्म्यांशी जुळतील. ख्रिस्तामधील सर्व विश्वासणारे जे ख्रिस्ताच्या आगमनाच्या वेळी जिवंत असतील त्यांचे शरीर ख्रिस्तासारखे बदलून जाईल, आणि ते त्यांच्या आत्म्यात पूर्णपणे नवीन होतील, यापुढे त्यांचा स्वभाव पापमय असणार नाही.

ख्रिस्तामधील सर्व विश्वासणारे एकमेकांना ओळखतील आणि सर्वकाळ प्रभूबरोबर राहतील. आम्ही देवदूत म्हणून नव्हे, तर देवदूतांसह अनंतकाळ त्याची सेवा करू. येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणार्याला त्याने जिवंत आशा दिल्याबद्दल परमेश्वराचे उपकार.

English
मराठीच्या पहिल्या पानावर वापस या
आपण मेल्यानंतर देवदूत बनतो का?