प्रश्नः
ख्रिस्ती महिलांनी सौंदर्यप्रसाधने लावावीत काय किंवा दागिने घालावीत काय?
उत्तरः
काही ख्रिस्ती लोकांचा असा विश्वास आहे की स्त्रियांनी सौंदर्यप्रसाधने लावणे किंवा दागिने घालणे चुकीचे आहे, नवीन कराराच्या काही परिच्छेदांचा हवाला देऊन अशा गोष्टींना मनाई केली जाते. आम्ही निश्चितपणे देवाच्या पुनर्जन्मलेल्या मुलांच्या विश्वासाचा आदर करतो, परंतु आम्ही हे देखील सुनिश्चित करू इच्छितो की आमचे शिक्षण देवाच्या वचनाने जे सांगितले आहे त्या पलीकडे जात नाही. आम्हाला “देवाच्या आज्ञा म्हणून मानवनिर्मित कल्पना शिकवायच्या नाहीत” (मार्क 7:7, एनएलटी).
सौंदर्यप्रसाधने लावणे किंवा दागिने घालणे याच्या योग्यतेचे परीक्षण करताना, आम्ही 1 शमुवेल 16:7ब ने सुरुवात करतो: “मानवासारखे परमेश्वराचे पाहणे नसते; मानव बाहेरचे स्वरूप पाहतो पण परमेश्वर हृदय पाहतो.” हे वचन आपल्या दृष्टीकोनाच्या मर्यादांशी संबंधित एक मूलभूत तत्त्व मांडतो: आपण स्वाभाविकपणे बाह्य पाहू; देव अंतर्गत सत्य पाहतो. याचा अर्थ असा नाही की बाहेरील महत्वहीन आहेत, अर्थातच - आम्ही दृश्य संकेतांद्वारे इतरांशी सहज संवाद साधतो आणि आपण स्वतःसाठी निवडलेला देखावा बंडखोरी, धार्मिकता, निष्काळजीपणा, सावधगिरी इत्यादी व्यक्त करू शकतो परंतु दिसणे फसवे असू शकते आणि तेथे हृदयाचा सखोल मुद्दा आहे. बाह्य स्वरूपासाठी जे काही केले जाते ते मनुष्याला दिसण्यासाठी केले जाते आणि आपण त्याबद्दल सावध असले पाहिजे, परंतु अंतःकरणात काय घडत आहे याबद्दल देव अधिक काळजी करतो.
सार्वजनिक उपासनेच्या नियमांच्या संदर्भात, पौल म्हणतो, “तसेच स्त्रियांनी स्वतःस साजेल अशा वेषाने आपणांस भीडस्तपणाने व मर्यादेने शोभवावे; केस गुंफणे आणि सोने, मोती व मोलवान वस्त्रे ह्यांनी नव्हे, तर देवभक्ती स्वीकारलेल्या स्त्रियांना शोभते तसे सत्कृत्यांनी आपणांस शोभवावे” (1 तीमथ्य 2:9-10). हा एक उतारा आहे ज्यामुळे काही स्त्रिया सौंदर्यप्रसाधने लावणे किंवा दागिने घालणे पूर्णपणे टाळतात.
या परिच्छेदात काही गोष्टी लक्षात घेण्यासारख्या आहेत: प्रथम, आराधनेची सेवा करणाऱ्या महिलांसाठी काही योग्य पोशाखाचा स्तर सांगण्यात आला आहे. पौल काही तपशील देत नाही, परंतु स्त्रीचे कपडे विनयशील आणि सभ्य आणि आदरणीय असावेत. निर्दोष, अशोभनीय किंवा अयोग्य असे काहीही परिधान करणे चुकीचे आहे. विनयशील आणि अविनयशील यांच्यातील रेषा काढणे व्यक्तिनिष्ठ असू शकते आणि विनयशीलता काही प्रमाणात सांस्कृतिक गुणांवर अवलंबून असते, परंतु प्रत्येक विश्वास ठेवणाऱ्या व्यक्तीने इतरांना पापात न पडण्याचा पुरेसे विवेकी असले पाहिजे.
दुसरे म्हणजे, देवाची आराधना करणाऱ्या स्त्रियांसाठी योग्य अलंकार आणि अयोग्य शोभा आहे. दैवीय स्त्रीसाठी योग्य सजणे म्हणजे फक्त चांगली कर्मे होय. टबीथाने “नेहमी चांगले काम करून आणि गरीबांना मदत करून” स्वतःला सुंदर सजवले (प्रेषित 9:36). दैवीय महिलेची अयोग्य सजणे हे ते आहे जे तिला अभिमानाने फुगवते किंवा तिच्या बाह्य देखाव्याकडे लक्ष वेधते: उदाहरणे म्हणजे विस्तृत केसरचना, सोने आणि मोती आणि महागडे कपडे. आराधानेच्या सेवेचा केंद्रबिंदू परमेश्वर असणे आवश्यक आहे, नवीनतम फॅशन, सर्वात मोठा हिरा किंवा सर्वात डोळ्यात भरणारे केसांचे गुंफणे नाही. सभेला येताना 3000 डॉलर्सचा पोशाख घालणे किंवा खडबडीत दागिने चमकवणे हे देवाच्या स्त्रीला खरोखर शोभण्यासारखे नाही. जर तिने पोशाख विकला आणि पैसे एका ख्रिस्ती चॅरिटीला दिले तर ते खूप चांगली होईल - आणि गरीबांची अधिक चांगली सेवा होईल. कदाचित तिने विस्तृत केशरचनावर घालवलेला वेळ एखाद्या गरजू व्यक्तीची सेवा करण्यात अधिक चांगला खर्च झाला असता.
1 तीमथ्य 2:9-10 मध्ये, पौलाने देवाला संतुष्ट करण्याचा प्रयत्न करणे आणि मनुष्यांना संतुष्ट करण्याचा प्रयत्न करणे यात फरक केला आहे. सार्वजनिक आराधना सेवा फॅशन शो असू नये. असे नाही की एक स्त्री कधीही दागिने घालू शकत नाही किंवा तिच्या केसांना वेगळ्या पद्धतीने स्टाईल करू शकत नाही. सभेमध्ये अतिउपभोग आणि अतिपणा अयोग्य आहे. आपण सर्वांनी अभिमानापासून सावध असले पाहिजे आणि इतरांना (किंवा स्वतःला) देवाची उपासना आणि इतरांची सेवा अशा खरोखर महत्वाचे असलेल्या गोष्टीपासून विचलित होणार नाही याची काळजी घ्यावी.
स्त्रियांनी सौंदर्यप्रसाधने लावणे किंवा दागिने घालणे या मुद्द्याशी संबंधित आणखी एक उतारा 1 पेत्र 3:3-5 आहे, “तुमची शोभा केसांचे गुंफणे, सोन्याचे दागिने घालणे किंवा उंची पोशाख करणे अशी बाहेरून दिसणारी नसावी, तर जो सौम्य व शांत आत्मा देवाच्या दृष्टीने बहुमूल्य आहे त्याची म्हणजे अंत:करणातील गुप्त मनुष्यपणाची, अविनाशी शोभा असावी. कारण ह्याप्रमाणे पूर्वी, देवावर आशा ठेवणार्या पवित्र स्त्रियांही आपापल्या पतीच्या अधीन राहून आपणांस शोभवत असत.”
पेत्र बाह्य, क्षणभंगुर सौंदर्य आणि स्त्रीचे अंतर्बाह्य, चिरस्थायी सौंदर्य यांच्यातील फरक यावर जोर देत आहे. खरोखर सुंदर स्त्रीमध्ये “सौम्य आणि शांत आत्मा” असतो. कदाचित या जगात तिची फारशी दखल घेतली जाणार नाही, पण देव हृदय पाहतो सौंदर्याचा देखावा स्वार्थासाठी करणे हे ख्रिस्ताच्या नम्रतेला अनुसरून नाही, विशेषत: असा दिखावा आरधानेच्या वेळी केला जातो तेंव्हा तो कदापि ग्रहणीय नाही. पुन्हा, हे असे नाही की वेणीचे केस पापी आहेत, परंतु जे लोक त्यांच्या केसांवर, त्यांच्या दागिन्यांवर किंवा त्यांच्या कपड्यांना सुंदर बनवण्यासाठी अवलंबून असतात ते व्यर्थतेचा पाठलाग करतात. ईश्वरीय चारित्र्य विकसित करणे अधिक फायदेशीर आहे.
सारांश, जोपर्यंत माफक पद्धतीने केले जाते तोपर्यंत दागदागिने, सौंदर्यप्रसाधने, किंवा वेणी घातलेले केस घालण्यात स्वाभाविकपणे काहीही चुकीचे नाही. तसेच, अशा गोष्टी कधीही चांगल्या कर्मांची किंवा नम्र भावनेची जागा घेऊ शकत नाहीत. ख्रिस्ती स्त्रीने तिच्या बाह्य स्वरूपावर इतके लक्ष केंद्रित करू नये की ती तिच्या आध्यात्मिक जीवनाकडे दुर्लक्ष करते. उपासना सेवा आपल्यावर नव्हे तर देवावर केंद्रित केली पाहिजे. जर एखादी स्त्री तिच्या देखाव्यावर जास्त वेळ आणि पैसा खर्च करत असेल तर समस्या ही आहे की स्त्रीचे प्राधान्यक्रम चुकीचे आहेत. महाग दागिने आणि कपडे हे समस्येचे परिणाम आहेत, स्वतः समस्या नाही.
English
ख्रिस्ती महिलांनी सौंदर्यप्रसाधने लावावीत काय किंवा दागिने घालावीत काय?