settings icon
share icon
प्रश्नः

प्रार्थना का करावी? जर परमेश्वरास भविष्य माहीत आहे आणि सर्व गोष्टी त्याच्या नियंत्रणात आहेत तर प्रार्थना करण्यात काय अर्थ आहे. जर आपण देवाचे अंतःकरण बदलू शकत नाही, तर आपण प्रार्थना का करावी?

उत्तरः


ख्रिस्ती व्यक्तीसाठी, प्रार्थना करणे हे श्वास घेण्यासारखे असले पाहिजे, न करण्यापेक्षा करणे सोपे. आपण विविध कारणांनी प्रार्थना करीत असतो. एक म्हणजे, प्रार्थना करणे हे देवाची सेवा करण्याचे एक स्वरूप होय (लूक 2:36-38) आणि त्याच्या आज्ञेचे पालन करणे होय. आम्ही प्रार्थना करतो कारण परमेश्वर देव आम्हास प्रार्थना करण्याची आज्ञा देतो (फिलिप्पैकरांस पत्र 4:6-7). ख्रिस्ताने आणि प्रारंभिक मंडळीने आम्हासाठी प्रार्थनेचे उदाहरण घालून दिले (मार्क 1:35; प्रेषितांची कृत्ये 1:14; 2:42; 3:1; 4:23-31; 6:4; 13:1-3). जर येशूला प्रार्थना करणे योग्य वाटले, तर आम्हालासुद्धा वाटले पाहिजे. जर पित्याच्या इच्छेत राहण्यासाठी त्याला प्रार्थनेची गरज होती, तर आम्हाला प्रार्थना करण्याची किती अधिक गरज आहे?

प्रार्थना करण्याचे दुसरे कारण हे आहे की अनेक परिस्थितींत त्याचा उपाय प्राप्त करण्याचे साधन म्हणून देव प्रार्थना ठरवितो. आपण मुख्य निर्णयासाठी तयारी म्हणून (लूक 6:12-13); दुरात्म्यांच्या अडखळणावर विजय मिळविण्यासाठी (मत्तय 17:14-21); आध्यात्मिक कापणीसाठी कार्यकर्ते एकत्र करण्यासाठी (लूक 10:2); परीक्षेवर विजय मिळविण्याकरिता बळ प्राप्त करण्यासाठी (मत्तय 26:41); आणि इतरांस आध्यात्मिकरित्या बळ देण्याची साधने प्राप्त करण्यासाठी (इफिसकरांस पत्र 6:18-19) प्रार्थना करतो.

आपण विशिष्ट विनंत्या घेऊन परमेश्वर देवाजवळ येतो, आणि जरी आम्ही मागितलेल्या विशिष्ट गोष्टी आम्हाला प्राप्त झाल्या नाहीत, तरीही आम्हास देवाचे अभिवचन प्राप्त होते की आमच्या प्रार्थना व्यर्थ नाहीत (मत्तय 6:6; रोमकरांस पत्र 8:26-27). त्याने अभिवचन दिले आहे की जेव्हा आम्ही अशा गोष्टी मागतो ज्या त्याच्या इच्छेनुसार आहेत, तेव्हा तो आम्हास आम्ही जे मागितले आहे ते देईल (योहानाचे 1 पत्र 5:14-15). कधी कधी त्याच्या बुद्धीनुसार आणि आमच्या फायद्यासाठी प्रार्थनेच्या उत्तरात परमेश्वर विलंब करतो. ह्या परिस्थितींत आम्ही प्रार्थनेत तत्पर आणि आग्रही असावे (मत्तय 7:7; लूक 18:1-8). पृथ्वीवर आमची इच्छा पूर्ण करण्यास परमेश्वरास भाग पडण्याचे आमचे साधन म्हणून आम्ही प्रार्थनेकडे पाहता कामा नये, तर पृथ्वीवर परमेश्वर देवाची इच्छा पूर्ण करण्याचे साधन म्हणून पाहावे. देवाची बुद्धी आमच्या बुद्धीपेक्षा फार श्रेष्ठ आहे.

अशा परिस्थितींसाठी ज्यात आम्हास देवाची इच्छा निश्चितपणे माहीत नसते, त्यात प्रार्थना हे देवाची इच्छा जाणण्याचे एक साधन होय. जर सुरफुनीकी स्त्रीने जिच्या मुलीच भुताने पछाडले होते ख्रिस्ताजवळ प्रार्थना केली नसती, तर तिची मुलगी बरी झाली नसती (मार्क 7:26-30). जर यरीहोच्या बाहेर बसलेल्या आंधळ्या माणसाने ख्रिस्ताला बोलाविले नसते, तर तो आंधळाच राहिला असता (लूक 18:35-43). देवाने असे म्हटले आहे की आम्ही मागत नाही म्हणून आम्हाला मिळत नाही (याकोब 4:2). एका अर्थाने, प्रार्थना हे लोकांस सुवार्ता सांगण्यासारखे आहे. जोवर आम्ही सुवार्ता सांगणार नाही तोवर सुवार्तेच्या संदेशास कोण प्रतिसाद देईल हे आम्ही जाणत नाही. अगदी तशाचप्रकारे, जोवर आम्ही प्रार्थना करणार नाही तोवर आम्हास उत्तरित प्रार्थनांचे परिणाम कधीही दिसणार नाहीत.

प्रार्थनेची उणीव देवाच्या वचनात विश्वासाची उणीव आणि भरवश्याची उणीव दाखविते. आम्ही देवाठायी आपला विश्वास दाखविण्यासाठी प्रार्थना करतो, की जे अभिवचन त्याने आपल्या वचनात दिले आहे ते तो पूर्ण करील आणि आमच्या मागण्यापेक्षा आणि आशेपेक्षा तो आमच्या जीवनांस विपुल आशीर्वाद देईल (इफिसकरांस पत्र 3:20). प्रार्थना हे इतरांच्या जीवनांत देवाचे कार्य पाहण्याचे आमचे मुख्य साधन आहे. देवाच्या सामर्थ्यात "प्लग जोडण्याचे" ते आमचे साधन आहे, त्यामुळे ते सैतानास आणि त्याच्या सैन्यास पराभूत करण्याचे आमचे साधन आहे ज्यावर आम्ही स्वतः विजय मिळविण्यास निर्बळ ठरतो. म्हणून, देवाने आम्हास बरेचदा त्याच्या सिंहासनासमोर पाहावे, कारण स्वर्गात आमचा एक महायाजक आहे आणि आम्हास जे काही सहन करावे लागते त्याच्याशी तो एकरूप होऊ शकतो (इब्रीकरांस पत्र 4:15-16). आमच्याजवळ त्याचे अभिवचन आहे की नीतिमान व्यक्तीची कळकळीची प्रार्थना बरेच काही प्राप्त करते (याकोबाचे पत्र 5:16-18). देव आमच्या जीवनांत त्याच्या नावास गौरव देवो कारण आम्ही त्याजवर इतका विश्वास ठेवतो की आम्ही बरेचदा प्रार्थनेमध्ये त्याच्याजवळ येतो.

English



मराठीच्या पहिल्या पानावर वापस या

प्रार्थना का करावी? जर परमेश्वरास भविष्य माहीत आहे आणि सर्व गोष्टी त्याच्या नियंत्रणात आहेत तर प्रार्थना करण्यात काय अर्थ आहे. जर आपण देवाचे अंतःकरण बदलू शकत नाही, तर आपण प्रार्थना का करावी?
© Copyright Got Questions Ministries