settings icon
share icon
प्रश्नः

ख्रिस्तामध्ये मी कोण आहे?

उत्तरः


2 करिंथकरांस पत्र 5:17 नुसार, “जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल तर तो नवी उत्पत्ती आहे; जुने ते होऊन गेले; पाहा, ते नवे झाले आहे!” ग्रीक भाषेमध्ये दोन शब्द आहेत जे पवित्र शास्त्रामध्ये “नवीन” असे भाषांतरित केले गेले आहेत. प्रथम म्हणजे निओस, हा शब्द नुसत्याच तयार केलेल्या कशाचा तरी संदर्भ देतो, परंतु यासारखे अगोदरपासूनच पुष्कळसे अस्तित्वात आहे. या वचनामध्ये भाषांतरित केलेला “नवीन” हा शब्द काईनोस आहे,

ज्याचा अर्थ “अस्थित्वात नाही असे काहीतरी नुसतेच बनविले आहे असा होतो”. ख्रिस्तामध्ये, आपण पूर्णपणे नवीन निर्मिती आहोत, ज्याप्रमाणे देवाने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली – देवाने त्यांना कशातूनही बनविले नाही आणि त्याच प्रकारे त्याने आपणाला हि बनविले आहे. तो आपल्या जुन्या मनुष्याश शुद्ध करीत नाही तर आपल्याला पूर्णपणे नवीन बनवतो. जेंव्हा आपण ख्रिस्तामध्ये असतो तेंव्हा आपण “ईश्वरी स्वभावाचे वाटेकरी” असतो (2 पेत्र 1:4 केजेव्ही). आपल्या पवित्र आत्म्याद्वारे देव स्वत: आपल्या अंत:करणात वास करतो. आम्ही ख्रिस्तामध्ये आहोत आणि तो आमच्यामध्ये आहे.

ख्रिस्तामध्ये आपण पुनर्निर्मित केलेले, नवीन केलेले, आणि पुन्हा जन्मलेले आहोत, आणि या नवनिर्मितीची मानसिकता दैहिक नसून आत्मिक आहे. हि नवनिर्मिती देवाबरोबर संगती करते, त्याच्या इच्छेचे पालन करते आणि त्याच्या सेवेत तत्पर असते. या अशा क्रिया आहेत ज्या करण्यास अथवा ज्यांची इच्छा करण्यास देखील जुना स्वभास असमर्थ आहे. आत्म्याच्या गोष्टींस जुना स्वभाव मृत आहे आणि तो पुन्हा जिवंत होऊ शकत नाही. हा “अपराध व आपली पातके ह्यांमुळे मृत” (इफिसकरांस पत्र 2:1) असा असून केवळ अलौकिक बाबींनीच उठवला जाऊ शकतो, आणि जेंव्हा आपण ख्रिस्ताकडे येतो आणि तो आपणामध्ये वास करतो तेंव्हा असे होते. ख्रिस्त आपल्याला पूर्णपणे नवीन व पवित्र स्वभाव आणि अविनाशी जीवन देतो. पूर्वी पापामुळे देवास मेलेले आपले जुने जीवन पुरले गेलेले आणि आता आपण त्याच्याबरोबर “नवीन प्रकारच्या जीवनात चालण्यासाठी” उठविले गेलेलो आहोत (रोमकरांस पत्र 6:4).

जर आपण ख्रिस्ताचे आहोत तर आपण त्याच्यात एकरूप झालो आहोत आणि यापुढे पापाचे गुलाम नाही (रोमकरांस पत्र 6:5-6); आपण त्याच्याबरोबर जिवंत केले गेलो आहोत (इफिसकरांस पत्र 2:5); आपण त्याच्या प्रतीरूपाचे बनविण्यात आलो आहोत (रोमकरांस पत्र 8:29); आपण दंडाज्ञेपासून मुक्त केलेले आहोत आणि देहाप्रमाणे न वागता पवित्र आत्म्याप्रमाणे वागतो (रोमकरांस पत्र 8:1); आपण ख्रिस्तामध्ये एक शरीर असून प्रत्येक जण एकमेकांचे अवयव असे आहोत (रोमकरांस पत्र 12:5), विश्वास ठेवणाऱ्या लोकांजवळ एक नवीन हृदय आहे (यहेज्केल 11:19), आणि आपल्याला “स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केले आहे” (इफिसकरांस पत्र 1:3).

आपण ख्रिस्ताला आपले जीवन दिले आहे आणि आपल्याला आपल्या तारणाची खात्री आहे तरी देखील कित्येकवेळा आपण वर्णीत केलेल्या मार्गाने जात नसल्याचे आपल्याला आश्चर्य वाटत असावे. याचे करण आपला नवीन स्वभाव आपल्या जुन्या देहामध्ये वास करीत आहे आणि हे दोघे एक-दुसऱ्याच्या विरोधात आहेत. जुना स्वभाव मेला असला तरी नवीन स्वभावाला सध्या राहत असलेल्या “तंबू”शी लढा द्यावा लागत आहे. पाप आणि दुष्कर्म अजूनही अस्तित्त्वात असले तरीही विश्वास ठेवणारा व्यक्ती त्यांना आता एका नवीन दृष्टीकोनातून पाहतो आणि यापूर्वी जसे केले त्याप्रमाणे त्यांना यापुढे त्याच्यावर नियंत्रण ठेवता येत नाही. ख्रिस्तामध्ये आता आपण पापाचा प्रतिकार करू शकतो तरी जुना स्वभाव तसे करू शकत नाही. आता आपल्याकडे वचन, प्रार्थना आणि आज्ञाधारकतेद्वारे नवीन स्वभावाला भरवायचे किंवा या गोष्टींकडे दुर्लक्ष करून देहाला भरावयाचे याची निवड आहे.

जेंव्हा आपण ख्रिस्तामध्ये असतो तेंव्हा “ज्याने आपल्यावर प्रीती केली त्याच्या योगे आपण महाविजयी ठरतो” (रोमकरांस पत्र 8:37), जो सर्व गोष्टी शक्य करतो त्या आपल्या तारणहारात आपण आनंद करू शकतो (फिलिप्पैकरांस पत्र 4:13). ख्रिस्तामध्ये आपण प्रेम केलेले, क्षमा केलेले आणि सुरक्षित आहोत. ख्रिस्तामध्ये आपण दत्तक, नीतिमान, सोडवलेले, समेट केलेले आणि निवडलेले आहोत. ख्रिस्तामध्ये आपण विजयी, आनंद आणि शांतीने परिपूर्ण, आणि जीवनाचा खरा अर्थ प्राप्त झालेले आहोत. ख्रिस्त किती अद्भुत तारणारा आहे!

English



मराठीच्या पहिल्या पानावर वापस या

ख्रिस्तामध्ये मी कोण आहे?
© Copyright Got Questions Ministries