settings icon
share icon
प्रश्नः

कोण तारण पाऊ शकते?

उत्तरः


येशूने योहान 3:16 मध्ये स्पष्टपणे शिकवले की त्याच्यावर विश्वास ठेवणार्या अशा कोणालाही तो वाचवील: देवाने जगावर एवढी प्रीती केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.” या “जो कोणी” मध्ये आपण आणि जगातील प्रत्येक व्यक्तीचा समावेश आहे.

बायबल म्हणते की, जर तारण आपल्या स्वतःच्या प्रयत्नांवर आधारित असते तर कोणीही वाचू शकले नसते, ¯कारण सर्वांनीं पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत;” (रोम 3:23). स्तोत्र 143:2 जोडते, “तुझ्यापुढे कोणीही जिवंत मनुष्य नीतिमान ठरणार नाही..” रोम 3:10 याची पुष्टी करते, “कोणीही नीतिमान नाही, एकसुद्धा नाही.”

आपण स्वतःला वाचवू शकत नाही. त्याऐवजी आम्ही जेव्हा येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो तेव्हा आमचे तारण होते. इफिस. 2:8-9 शिकवते, “कारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झालेले आहे आणि हे तुमच्या हातून झाले असे नाही, तर हे देवाचे दान आहे; कोणी आढ्यता बाळगू नये म्हणून कर्मे केल्याने हे झाले नाही.” आम्ही देवाच्या कृपेने तारण पावलो आहोत, आणि व्याख्येनुसार कृपा कमविता येत नाही. नाही. आम्ही तारणास पात्र नाही; आपण फक्त विश्वासाने हे प्राप्त करतो.

सर्व पापे झाकून टाकण्यासाठी देवाची कृपा पुरेशी आहे (रोम 5:20). बायबल अशा लोकांच्या उदाहरणाने परिपूर्ण आहे जे पापी पृष्ठभूमीतून वाचले होते. प्रेषित पौलाने अशा ख्रिस्ती लोकांना लिहिले जे पूर्वी लैंगिक अनैतिकता, मूर्तिपूजा, व्यभिचार, समलैंगिकता, चोरी, लोभ आणि मद्यपान यांसह अनेक प्रकारच्या पापांत जगत होते. परंतु पौलाने त्यांच्या तारणानंतर त्यांना सांगितले, “तरी तुम्ही प्रभु येशू ख्रिस्ताच्या नांवांत व आपल्या देवाच्या आत्म्यांत धुतलेले, पवित्र केलेले व नीतिमान् ठरविलेले असे झाला” (1 करिंथ 6:9-11).

प्रेषित पौल स्वतः ख्रिस्ती लोकांचा छळ करणारा होता, त्याने स्तेफनाच्या मृत्यूला मान्यता दिली (प्रेषितांची कृत्ये 8:1) आणि ख्रिस्ती लोकांना अटक करुन तुरूंगात टाकले (प्रेषितांची कृत्ये 8:3). नंतर त्याने लिहिले, “कारण ज्यांनी सेवकपण चांगले चालवले ते आपणांसाठी चांगली योग्यता आणि ख्रिस्त येशूवरील विश्वासात फार धैर्य मिळवतात. तुझ्याकडे लवकर येण्याची आशा धरून हे तुला लिहिले आहे; तरीपण मला उशीर लागल्यास सत्याचा स्तंभ व पाया अशी जी जिवंत देवाची मंडळी आहे तिच्यात म्हणजे देवाच्या घरात कसे वागले पाहिजे, हे तुला समजावे.” (1 तीमथ्य 1:13-15).

देव बहुतेकदा असंभवनीय लोकांना त्याच्या उद्देशाच्या पूर्तीसाठी वाचवतो. चोराला जिवंत राहण्यासाठी फक्त काही मिनिटेच होती त्याला त्याने वाचवले (लूक 23:42-43), मंडळीचा छळ करणारा (पौल), त्याचा नाकार करणारा मासे धरणारा (पेत्र), रोमन नागरिक आणि त्याचे कुटुंबीय (प्रेषितांची कृत्ये 10) , पळून जाणारा गुलाम (फिलेमोनच्या पत्रातील ओनेसिमस) आणि इतर बरेच जण. देवास वाचविता येणार नाही असा कोणीही नाही (यशया 50:2 पहा) आपण विश्वासाने प्रतिसाद दिला पाहिजे आणि सार्वकालिक जीवनाची त्यांची विनामूल्य भेट प्राप्त केली पाहिजे.

कोणाचे तारण होऊ शकते? एक गोष्ट निश्चित आहे - आपण आपला तारणारा म्हणून येशू ख्रिस्ताचा स्वीकार केल्यास, आपण हे करू शकता! जर आपल्याला खात्री नसेल की आपण येशूला आपला तारणहार म्हणून स्वीकारले आहे तर, आत्ताच या प्रमाणे प्रार्थना करुन तुम्ही प्रतिसाद देऊ शकता:

“देवा, मी पापी आहे हे मला उमगले आहे आणि माझ्या स्वतःच्या चांगल्या कर्मांनी स्वर्गात कधी पोचू शकत नाही. सध्या मी येशू ख्रिस्तावर माझा विश्वास ठेवतो की तो देवाचा पुत्र आहे जो माझ्या पापांसाठी मरण पावला व मला अनंतकाळचे जीवन देण्यासाठी मेलेल्यातून उठला. कृपया माझ्या पापांची मला क्षमा करा आणि तुमच्यासाठी जगण्यासाठी मला मदत करा. मला स्वीकारून मला अनंतकाळचे जीवन दिल्याबद्दल धन्यवाद.”

Englishमराठीच्या पहिल्या पानावर वापस या

कोण तारण पाऊ शकते?
© Copyright Got Questions Ministries