settings icon
share icon
प्रश्नः

देवपरिज्ञान शास्त्राची व्याख्या काय आहे?

उत्तरः


“देवपरिज्ञान शास्त्र” अर्थात थिओलॉजी हा शब्द दोन ग्रीक शब्दापासून आला आहे ज्याचा अर्थ “देवाचा अभ्यास” असा आहे. पवित्र शास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे ख्रिस्ती देवपरिज्ञान शास्त्र म्हणजे फक्त देव समजून घेण्याचा प्रयत्न होय. देव अमर्यात आणि आपल्यापेक्षा सार्वकालीत सर्वश्रेष्ठ असल्यामुळे कोणतेही देवपरिज्ञान शास्त्र देव आणि त्याच्या मार्गांचे पूर्णपणे स्पष्टीकरण देणार नाही. म्हणूनच, त्याचे वर्णन करण्याचा कोणताही प्रयत्न कमी पडेल (रोमकरांस पत्र 1:33-36). तथापि, जितके शक्य आहे तितके आपण देवाला ओळखावे हि त्याची इच्छा आहे, आणि देवपरिज्ञान शास्त्र म्हणजे संघटित आणि समजण्यासारख्या पद्धतीने आपण देवाबद्दल काय जाणून घेऊ शकतो आणि काय समजू शकतो हे जाणून घेणे ही कला आणि विज्ञान आहे. काही लोकांचा देवपरिज्ञान शास्त्र हे विभाजित असल्याचा विश्वास असल्यामुळे ते त्यास टाळण्याचा प्रयत्न करतात. योग्य प्रकारे समजून घ्या कि देवपरिज्ञान शास्त्र हे एकतिक करते. पवित्र शास्त्रीय देवपरिज्ञान शास्त्र अर्थात बिबलिकल थिओलॉजीहि एक चांगली बाब आहे; हे देवाच्या वचनाचे शिक्षण आहे (2 तीमथ्याला पत्र 3:16-17).

तर मग, देवपरिज्ञान शास्त्राचा अभ्यास हे दुसरे काही नसून त्याने स्वतःविषयी जे काही प्रकट केले आहे ते शोधण्यासाठी देवाच्या वचनात खोल उतरणे होय. जेव्हा आपण हे करतो तेव्हा आपण त्याला सर्व गोष्टींचा निर्माणकर्ता, सर्व गोष्टींचा सांभाळणारा आणि सर्व गोष्टींचा न्यायाधीश म्हणून ओळखतो. तो अल्फा आणि ओमेगा म्हणजेच सर्व गोष्टींचा आरंभ आणि शेवट आहे. जेंव्हा मोशेने त्याला विचारले कि त्याला फारोकडे कोण पाठवत आहे तेव्हा देवाने त्याला उत्तर दिले कि “मी आहे तो आहे” (निर्गम 3:14). “मी आहे” हे नाव व्यक्तिमत्त्व दर्शवते. देवाला एक नाव आहे, इथेपर्यंत कि त्याने इतरांना नावे दिली आहेत. मी आहे या नावाने एक मुक्त, हेतूपूर्ण आणि स्वयंपूर्ण व्यक्तिमत्व आहे. देव कुठलीतरी शक्ती किंवा वैश्विक ऊर्जा नाही. तो सर्वशक्तिमान, स्वतः अस्तित्वात असणारा, मनाने आणि इच्छेने आत्मनिर्यय घेणारा देव ज्याने स्वतःला आपल्या वचनाद्वारे आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्याद्वारे मानवजातीसाठी प्रकट केले आहे.

देवपरिज्ञान शास्त्र अर्थात थिओलॉजी चा अभ्यास करणे म्हणजे देवाला ओळखणे जेणेकरून आपण आपल्या प्रीतीद्वारे आणि आज्ञापालणाद्वारे त्याचे गौरव करावे. इथल्या प्रगतीकडे लक्ष द्या: आपण त्याच्यावर प्रेम करण्यापूर्वी आपण त्याला ओळखले पाहिजे, आणि त्याच्या आज्ञा पाळण्याची इच्छा करण्यापूर्वी आपण त्याच्यावर प्रेम केले पाहिजे. जन्मताच, जे त्याला ओळखतात, त्याच्यावर प्रेम करतात आणि त्याच्या आज्ञा पाळतात त्याला तो समृद्धीने आशा आणि सांत्वन देतो. कमकुवत देवपरिज्ञान शास्त्र आणि देवाबद्दलचे चुकीचे ज्ञान हे आपण उत्सुक असलेल्या आशा आणि सांत्वनेपेक्षा आपले जीवन अधिक खराब करते. देवाबद्दल जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आपण जर देवाबद्दल जाणून घेतल्याशिवाय जर या जगात जगण्याचा प्रयत्न करत असू तर तर आपण स्वतःवर क्रूर होत आहोत. जग एक वेदनादायक स्थान आहे आणि त्यामधील जीवन निराशाजनक आणि अप्रिय आहे. देवपरिज्ञान शास्त्राचा नकार करणे म्हणजे स्वतःला दिशारहित जीवनात झोकून देणे होय. देवपरिज्ञान शास्त्राशिवाय आपण आपले जीवन वाया घालवितो आणि आपला जीव गमावतो.

ख्रिस्ती लोकांनी देवपरिज्ञान शास्त्राचे सेवन करून देवाविषयी वैयक्तित आणि सखोल अभ्यासाने सर्व करणे आवश्यक आहे, जेणेकरून ज्याच्याबरोबर आपण आनंदात अनंतकाळ घालविणार आहोत त्याला जाणून घेऊ, त्याला प्रेम करू आणि त्याच्या आज्ञेचे पालन करू.

Englishमराठीच्या पहिल्या पानावर वापस या

देवपरिज्ञान शास्त्राची व्याख्या काय आहे?
© Copyright Got Questions Ministries