settings icon
share icon
प्रश्नः

बायबल म्हणजे काय?

उत्तरः


“बायबल” हा शब्द लॅटिन व ग्रीक शब्दावरून आला आहे ज्याचा अर्थ “पुस्तक” आहे, एक समर्पक नाव आहे कारण बायबल सर्व काळातील सर्व लोकांसाठी पुस्तक आहे. दुसरे कुठलेही पुस्तक असे नाही, ते स्वतःमध्येच उत्कृष्ट आहे.

बायबलमध्ये सहासष्ट वेगवेगळी पुस्तके आहेत. त्यामध्ये लेवीय आणि अनुवाद यासारखी नियमशास्त्राची पुस्तके, एज्रा आणि प्रेषितांची कृत्ये यासारखी ऐतिहासिक पुस्तके; कवितांची पुस्तके, जसे की स्तोत्रे आणि उपदेशक; भविष्यवाणीची पुस्तके, जसे की यशया आणि प्रकटीकरण; मत्तय आणि योहान यांच्यासारखी चरित्रे; आणि पत्रे (औपचारिक पत्रे) जसे की तीत आणि इब्री लोकांस पत्र यांचा समावेश आहे.

लेखक

सुमारे 40 वेगवेगळ्या मानवी लेखकांनी बायबलमध्ये लेखन केले आहे, जे सुमारे 1500 वर्षांच्या कालावधीत लिहिले गेले. हे लेखक राजे, मच्छीमार, याजक, सरकारी अधिकारी, शेतकरी, मेंढपाळ आणि वैद्य होते. या सर्व विविधतेतून अविश्वसनीय एकसंधता येते, ज्यात सामान्य विषय विणलेले आहेत.

बायबलमधील ऐक्य या वस्तुस्थितीमुळे आहे की, शेवटी, त्याचा लेखक एकच - स्वतः देव आहे. बायबल “परमेश्वरप्रेरित” आहे (२ तीमथ्य 3:16). मानवी लेखकांनी तेच लिहिले जे त्यांनी लिहावे अशी परमेश्वराची इच्छा होती, आणि त्याचा परिणाम म्हणजे देवाचे सिद्ध आणि पवित्र वचन (स्तोत्र 12:6; 2 पेत्र 1:21).

विभाग

बायबलचे दोन मुख्य भाग आहेत: जुना करार आणि नवा करार. थोडक्यात, जुना करार एका राष्ट्राची गाथा आहे आणि नवीन करार हा माणसाची गाथा आहे. हे राष्ट्र त्या मनुष्यास - येशू ख्रिस्तास - जगामध्ये आणण्याचा देवाचा मार्ग होता.

जुना करार इस्राएल राष्ट्राची स्थापना व संरक्षणाचे वर्णन करतो. देवाने संपूर्ण जगाला आशीर्वाद देण्यासाठी इस्राएलचा उपयोग करण्याचे अभिवचन दिले (उत्पत्ति 12:2-3). इस्राएल राष्ट्राची स्थापना झाल्यानंतर, देवाने त्या राष्ट्रांतर्गत एक कुटूंब उभे केले ज्याद्वारे आशीर्वाद प्राप्त होईलः दाविदाचे कुटूंब (स्तोत्र 89:3-4). मग, दाविदाच्या कुटूंबातून जन्मास येणार्‍या एका पुरुषाचे अभिवचन दिले जो वचन दिलेला आशीर्वाद ठरणार होता (यशया 11:1-10).

नवीन करारामध्ये त्या वचन दिलेल्या मनुष्याविषयी माहिती आहे. त्याचे नाव येशू होते आणि त्याने जुन्या कराराच्या भविष्यवाण्या पूर्ण केल्या कारण तो परिपूर्ण जीवन जगला, तारणारा होण्यासाठी मरण पावला आणि मेलेल्यांतून उठला.

मुख्य पात्र

येशू हा बायबलमधील मुख्य पात्र आहे - संपूर्ण पुस्तक खरोखरच त्याच्याविषयी आहे. जुना करार त्याच्या येण्याची भविष्यवाणी करतो आणि जगात त्याच्या प्रवेशासाठी मंच तयार करतो. नवीन करार त्याच्या आगमनाचे आणि आमच्या पापी जगाला तारण मिळवून देण्यासाठी त्याने केलेल्या कार्याचे वर्णन करतो.

येशू ऐतिहासिक व्यक्तींपेक्षा अधिक आहे; खरे तर, तो मनुष्यापेक्षा अधिक आहे. तो देहधारी देव आहे आणि त्याचे आगमन जगाच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाची घटना होती. तो कोण आहे याविषयी आम्हाला स्पष्ट आणि समजण्यायोग्य चित्र देण्यासाठी देव स्वतः मनुष्य झाला. देव कसा आहे? तो येशूसारखा आहे; येशू मानवी स्वरुपात देव आहे (योहान 1:14, 14:9).

संक्षिप्त सारांश

देवाने मनुष्याची निर्मिती केली आणि त्याला परिपूर्ण वातावरणात ठेवले; तथापि, मनुष्याने देवाविरुध्द बंड केले आणि तो देवाने जसे ठरविले होते त्या विपरीत त्याचे पतन झाले. पापामुळे देवाने जगाला शापाधीन केले पण लगेच मानवजातीला आणि सर्व सृष्टीला त्याच्या मूळ गौरवात पुनः आणण्याची योजना त्वरित स्थापन केली.

त्याच्या तारणाच्या योजनेचा एक भाग म्हणून, देवाने अब्राहामास बेबिलोनियाहून बाहेर कनान देशात (ख्रि.पू. सुमारे 2000) बोलाविले. देवाने अब्राहम, त्याचा मुलगा इसहाक आणि त्याचा नातू याकोब यांना (ज्याला इस्राएल देखील म्हटले जाते) अशी प्रतिज्ञा केली की तो त्यांच्या वंशजांद्वारे जगाला आशीर्वाद देईल. इस्राएलचे कुटूंब कनानहून मिसर देशास गेले, जेथे ते एक राष्ट्र बनले.

ख्रि.पू. सुमारे 1400 मध्ये, देवाने मोशेच्या मार्गदर्शनाखाली इस्राएलच्या वंशजांना मिसर देशातून बाहेर नेले आणि त्यांना कराराचा देश, कनान त्यांच्या स्वतःच्या मालकीचा देश म्हणून दिला. मोशेद्वारे, देवाने इस्राएल लोकांना नियमशास्त्र दिले आणि त्यांच्याबरोबर एक करार (करारनामा) केला. जर ते देवास विश्वासू राहिले आणि आजूबाजूच्या राष्ट्रांच्या मूर्तिपूजेचे पालन केले नाही तर ते यशस्वी होतील. जर त्यांनी देवाला सोडले आणि मूर्तींचे अनुसरण केले तर देव त्यांच्या राष्ट्राचा नाश करील.

सुमारे 400 वर्षांनंतर, दावीद आणि त्याचा मुलगा शलमोन यांच्या कारकिर्दीत, इस्राएल एक महान व सामर्थ्यशाली राज्य बनले. देवाने दावीद व शलमोन यांना वचन दिले की त्यांचा वंशज अनंतकाळ राज्य करेल.

शलमोनाच्या कारकिर्दीनंतर, इस्राएल राष्ट्राचे विभाजन झाले. उत्तरेकडील दहा जमातींना “इस्राएल” असे नाव मिळाले, आणि देव त्यांच्या मूर्तिपूजेसाठी त्यांचा न्याय करण्यापूर्वी ते सुमारे 200 वर्षे टिकून राहिले. अश्शूरने इस्राएलला सुमारे ख्रि.पू. 721 मध्ये ताब्यात घेतले. दक्षिणेकडील दोन जमातींना “यहूदा” असे म्हणतात आणि ते थोडा काळ टिकून राहिले पण शेवटी तेही देवापासून दूर गेले. बेबिलोनने त्यांना जवळजवळ ख्रि.पू. 600 मध्ये बंदी करून नेले.

सुमारे 70 वर्षांनंतर, देवाने आपल्या कृपेने बंदीवासात नेलेल्यांपैकी काही जणांना त्यांच्या देशात परत आणले. यरुशलेमची राजधानी, सुमारे ख्रि.पू. 444 पुन्हा निर्माण करण्यात केली आणि इस्राएलने पुन्हा एकदा आपली राष्ट्रीय ओळख स्थापित केली. अशा प्रकारे, जुना करार समाप्त होतो.

English
मराठीच्या पहिल्या पानावर वापस या

बायबल म्हणजे काय?
© Copyright Got Questions Ministries