settings icon
share icon
प्रश्नः

बायबल युद्धाविषयी काय म्हणते?

उत्तरः


अनेक लोक बायबलमध्ये हे वाचण्याची चूक करतात की बायबल निर्गम 20:13 मध्ये काय म्हणते, "खून करू नकोस," आणि मग ते ही आज्ञा युद्धासही लागू करण्याचा प्रयत्न करतात. परंतु इब्री शब्दाचा शाब्दिक अर्थ आहे "जाणूनबुझून, आधीच ठरवून दुसर्या व्यक्तीस मत्सराने मारणे, वध करणे." देवाने बरेचदा इस्राएली लोकांस इतर राष्ट्रांबरोबर युद्ध करावयास जाण्यास सांगितले (1 शमुवेल 15:3; यहोशवा 4:13). देवाने अनेक अपराधांसाठी मृत्यूदंडाची आज्ञा दिली (निर्गम 21:12, 15; 22:19; लेवीय 20:11). म्हणून, देव सर्व परिस्थितींत वध करण्याच्या विरोधात नाही, पण केवळ खूनाच्या विरोधात आहे. युद्ध ही कधीही चांगली गोष्ट नाही, पण कधी कधी ते जरूरी ठरते. पापी लोकांनी भरलेल्या जगात (रोमकरांस प्रत्र 3:10-18), युद्ध अटळ आहे. कधी कधी पापी लोकांस निरपराध लोकांना मोठी इजा करण्यापासून रोखण्याचा एकमेव मार्ग असतो युद्धावर जाणे.

जुन्या करारात देवाने इस्राएलास आज्ञा दिली, "इस्राएल लोकांचा वतीने मिद्यान्यांचा सूड घे; त्यानंतर तू आपल्या पूर्वजांस जाऊन मिळशील" (गणना 31:2). अनुवाद 20:16-17 घोषणा करते, "पण तुझा देव परमेश्वर ह्या राष्ट्रांची जी नगरे तुला वतन म्हणून देत आहे त्यातला कोणताही प्राणी जिवंत ठेवू नको. तुझा देव परमेश्वर ह्याने तुला आज्ञा केल्याप्रमाणे... ह्यांचा समूळ नाश कर." तसेच, शमुवेल 15:18 म्हणते, "मग परमेश्वराने तुला मोहिमेवर पाठवून सांगितले की, जा त्या पापिष्ठ अमालेक्यांचा सर्वस्वी संहार कर, आणि ते नष्ट होत पर्यंत त्याजशी युद्ध कर." स्पष्टपणे, देव सर्व युद्धांच्या विरोधात नाही. येशू नेहमीच पित्यासोबत सिद्धपणे सहमत असतो (योहान 10:30), म्हणून आपण हा वाद घालू शकत नाही की युद्ध ही केवळ जुन्या करारात देवाची इच्छा होती. देव कधीही बदलत नाही (मलाखी 3:6; याकोबाचे पत्र 1:17).

ख्रिस्ताचे दुसरे आगमन हे अत्यंत हिंसक असेल. प्रकटीकरण 19:11-21 यांत जगाचा न्याय करणारा आणि "न्यायाने युद्ध करणारा" (वचन 11) ख्रिस्त याच्यासोबत, शेवटच्या युद्धाचे वर्णन करण्यात आले आहे. ह्या युद्धात मोठा रक्तपात होईल (वचन 13) आणि ते भयंकर असेल. त्याचा विरोध करणार्याचे मांस पक्षी खातील (वचन 17-18). तो आपल्या शत्रूंवर दया करणार नाही, ज्यांचा तो पूर्णपणे पाडाव करील आणि त्यांस "अग्नी व गंधकाच्या सरोवरात" टाकील (वचन 20).

असे म्हणणे चूक आहे की देव कधीही युद्धाचे समर्थन करीत नाही. येशू हा शांततावादी नाही. दुष्ट लोकांनी भरलेल्या जगात, युद्ध हे कधी कधी त्याहीपेक्षा भयंकर वाईटास आळा घालण्यासाठी जरूरी ठरते. जर दुसर्या जागतिक युद्धाद्वारे हिटलरचा पराभव करण्यात आला नसता, तर आणखी किती लक्षावधी लोक मारले गेले असते? जर अमेरिकन यादवी युद्ध लढले गेले नसते, तर आफ्रिकन-अमेरिकन लोकांस आणखी किती काळ गुलाम म्हणून यातना सहाव्या लागल्या असत्या?

युद्ध ही भयंकर गोष्ट आहे. काही युद्धे इतर युद्धांपेक्षा अधिक "न्याय्य" असतात, पण युद्ध हा नेहमीच पापाचा परिणाम असतो (रोमकरांस पत्र 3:10-18), त्याचवेळी उपदेशक 3:8 घोषणा करते, "प्रेम करण्याचा समय व द्वेष करण्याचा समय, व सख्य करण्याचा समय असतो." पाप, घृणा, आणि दुष्कर्माने भरलेल्या जगात (रोमकरांस पत्र 3:10-18) युद्ध हे अटळ आहे. ख्रिस्ती लोकांनी युद्धाची इच्छा धरता कामा नये, पण ख्रिस्ती लोकांनी सरकारचा सुद्धा विरोध करता कामा नये ज्यांस देवाने त्यांच्यावर अधिकारी म्हणून नेमिले आहे (रोमकरांस पत्र 13:1-4; पेत्राचे 1 ले पत्र 2:17). सर्वात महत्वाची गोष्ट जी आपण युद्धाच्या काळात करू शकतो, ती म्हणजे आमच्या पुढार्यांस दैवी बुद्धी लाभावी म्हणून प्रार्थना करणे, आमच्या सैन्याच्या संरक्षणासाठी प्रार्थना, आपसातील संघर्ष लवकर सुटावा म्हणून प्रार्थना, आणि दोन्ही पक्षाच्या नागरिकांस कमीत कमी इजा व्हावी म्हणून प्रार्थना करावी (फिलिप्पैकरांस पत्र 4:6-7).

English



मराठीच्या पहिल्या पानावर वापस या

बायबल युद्धाविषयी काय म्हणते?
© Copyright Got Questions Ministries