settings icon
share icon
प्रश्नः

शुद्ध अक्षत व पवित्र जन्म महत्वाचे का आहे?

उत्तरः


शुद्ध अक्षत व पवित्र जन्माचा सिद्धांत फार महत्वाचा आहे (यशया 7:14 मत्तय 1:23; लूक 1:27, 34). प्रथम, पवित्र शास्त्र हि घटनेचे कसे वर्णन करते ते बघूया. मरीया च्या प्रश्नाला उत्तर म्हणून, "हे असे कसे होईल?" (लूक 1:34), गब्रीएल म्हणतो, "पवित्र आत्मा तुझ्यावर संचार करील, आणि सर्वोच्च देवाचे सामर्थ्य तुझ्यावर सावली पडेल" (लूक 1:35). ईश्वरदूत योसेफला सांगतो की हे शब्द सांगून मरीयालाची भीती घालव: (मत्तय 1:20) " तिला होणारे मूल हे पवित्र आत्माच्या माध्यमातून असेल." मॅथ्यू ने असे म्हटले आहे की कुमारिका "पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने गर्भवती आहे असे दिसून आले," (मत्तय 1:18). गलती 4: 4 शुद्ध अक्षत व पवित्र जन्म शिकवते: "ईश्वराने त्याचा पुत्र जो स्त्रीपासून जन्मला त्याला पाठविले."

या उताऱ्यापासून हे नक्कीच स्पष्ट होते की , येशूचा जन्म पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यातून मारियाच्या शरीरातून झाला. अमूर्त (आत्मा) आणि मूर्त (मारियाचा उदर) दोन्ही यात सहभागी होते. मरीया, अर्थातच, स्वत: ला गरोदर करू शकत नव्हती, आणि त्या अर्थाने ती फक्त एक "पात्र." होती. फक्त ईश्वराच अवताराचा चमत्कार करू शकतो.

तथापि, मरीया आणि येशूच्या दरम्यान एक भौतिक संबंध न मानने यामुळे असे ध्वनित होईल की येशू खरोखर मानव नव्हता. पवित्र शास्त्र शिकवते की येशू आपल्यासारख्या भौतिक शरीर धारण केलेला, पूर्णपणे मानवी होता. त्याला हे शरीर मिळाले ते मरिया कडून त्याच वेळी, येशू पूर्णपणे शाश्वत पवित्र ईश्वर होता (योहान 1:14 1 तीमथ्य 3:16; इब्री 2:14-17.)

येशूचा जन्म पापा मध्ये झाला नाही; म्हणजेच, त्याचा स्वभावात पाप नव्हते (इब्री 7:26). असे वाटते की पापाचा स्वभाव वडीलाच्या माध्यमातून पिढ्यानपिढ्या स्थानांतरीत होत जातो (रोम 5:12, 17, 19). शुद्ध अक्षत व पवित्र जन्माचा अशा स्थानांतराशी काहीही संबंध नसतो आणि शाश्वत परमेश्वराला एक परिपूर्ण माणूस बनवतो.

Englishमराठीच्या पहिल्या पानावर वापस या

शुद्ध अक्षत व पवित्र जन्म महत्वाचे का आहे?
© Copyright Got Questions Ministries