settings icon
share icon
प्रश्नः

अक्षम्य पाप/ माफ न करता येणारे पाप म्हणजे काय?

उत्तरः


अक्षम्य पाप/ माफ न करता येणारे पाप किंवा “पवित्र आत्म्याची निंदा” याचा उल्लेख मार्क 3:22-30 आणि मत्तय 12:22-32 मध्ये केलेला आहे. येशूने म्हंटले, “मी तुम्हास खचित सांगतो की, मानवपुत्रांना सर्व प्रकारच्या पापांची व त्यांनी केलेल्या दुर्भाषनांची क्षमा होईल” (मार्क 3:28), परंतु नंतर तो एक अपवाद देतो: “जो कोणी पवित्र आत्म्याची निंदा करील त्याला क्षमा नाहीच, तर तो सार्वकालिक पापाचा दोषी आहे” (वचन 29).

येशूच्या अनुसार, अक्षम्य किंवा माफ न करता येणारे पाप हे एकमेव आहे. हा एक अधर्म आहे ज्याला कधीही माफ केले जाणार नाही (“कधीही नाही” याचा मत्तय 12:32 मध्ये अर्थ “ना ह्या युगात ना येणाऱ्या युगात” असा आहे). माफ न करता येणारे पाप हे जगामध्ये ख्रिस्ताद्वारे आत्म्याच्या कार्याच्या संदर्भात पवित्र आत्म्याची निंदा (“अवज्ञा अनादर”) करणे आहे. दुसऱ्या शब्दात, निंदा करण्याचे विशिष्ट प्रकरण हे मत्तय 12 आणि मार्क 3 मध्ये पहावयास मिळते ते एकमेव आहे. दोषी पक्ष, परुश्यांचा समूह, अशा पुराव्यांचा साक्षीदार होता ज्यांना खोटे सिद्ध करता येत नाही ते म्हणजे येशू पवित्र आत्म्याच्या मदतीने चमत्कार करत होता, तरीही त्यांनी असा दावा केला की, त्याला भूतांचा अधिपती बालजबुल याने धरले आहे (मत्तय 12:24; मार्क 3:30).

येशूच्या काळातील यहुदी पुढाऱ्याने येशू ख्रिस्ताला (मनुष्य म्हणून पृथ्वीवर असताना) भुताने धरले आहे असा दोष लावून अक्षम्य पाप केले. त्यांच्याकडे अशा कृत्याचे कोणतेही निमित्त नव्हते. ते अज्ञानातून किंवा गैरसमजुतीतून असे बोलत नव्हते. परुश्यांना हे माहित होते की येशू हाच तो मसीहा आहे ज्याला देवाने इस्राएली लोकांना वाचवण्यासाठी पाठवले. भविष्यवाण्या पूर्ण होत आहेत हेही त्यांना माहित होते. त्यांनी येशूचे अद्भुत कार्य बघितले, आणि त्यांनी त्याचे सत्याचे सादरीकरण ऐकले. तरीसुद्धा त्यांनी जाणीवपूर्वक सत्याला नाकारण्याची आणि पवित्र आत्म्याची निंदा करण्याचे निवडले. जगाच्या प्रकाशासमोर उभे राहून, त्याच्या तेजामध्ये डुबून, त्यांनी निश्चितपणे त्यांचे डोळे बंद केले आणि स्वेच्छेने आंधळे झाले. येशूने अशा पापाचा माफ न करता येणारे पाप म्हणून उल्लेख केला.

पवित्र आत्म्याची निंदा, जसे की ती नेमकी परुश्यांची परिस्थिती होती, आणि त्याची आजच्या घडीला नक्कल करता येणे शक्य नाही. येशू ख्रिस्त पृथ्वीवर नाही, आणि कोणीही येशूला चमत्कार करताना प्रत्यक्ष बघू शकत नाही आणि मग त्याचे श्रेय आत्म्याऐवजी सैतानाला देऊ शकत नाही. आजघडीला अक्षम्य असे पाप हे फक्त एकच आहे ते म्हणजे अविश्वास करत राहणे. अशा व्यक्तीला क्षमा नाही जो ख्रिस्ताला नाकारत मरतो. पवित्र आत्मा जगामध्ये कार्यरत आहे, नितीमत्वाविषयी, आणि न्यायनिवाड्याविषयी, पापापासून न वाचलेल्यांना दोषी ठरवत आहे (योहान 16:31). जर एखादा व्यक्ती त्या दोषारोपाला विरोध करेल आणि पश्चात्ताप न करता राहील, तर तो स्वर्गाच्या जागी नरकाची निवड करील. “विश्वासावाचून देवाला संतोषाविने अशक्य आहे” (इब्री 11:6), आणि विश्वासाची बाब येशू आहे (प्रेषित 16:31). अशा एखाद्यासाठी क्षमा नाहीच जो ख्रिस्तावर विश्वास न ठेवता मरतो.

देवाने आपले तारण त्याच्या पुत्रामध्ये उपलब्ध करून दिले आहे (योहान 3:16). क्षमा ही फक्त येशुमध्येच मिळते (योहान 14:6). एकमेव तारणाऱ्याचा नकार करणे म्हणजे तारणाचे कोणतेही साधन शिल्लक न राहणे; एकमेव क्षमेला नाकारणे हे निश्चितच अक्षम्य राहणे आहे.

अनेक लोक घाबरतात की त्यांनी काहीतरी असे पाप केले आहे ज्याला देव क्षमा करू शकत नाही किंवा क्षमा करणार नाही, आणि त्यांना असे वाटते की त्यांनी काहीही केले तरी आता त्यांच्याकडे कोणतीही आशा नाही. लोकांनी त्या गैरसमजुतीखाली राहावे याशिवाय सैतानाला दुसरे काहीही नको आहे. देव अशा पाप्याला उत्तेजन देतो ज्याच्या पापाचा दोष सिद्ध झाला आहे: “देवाजवळ या म्हणजे तो तुम्हजवळ येईल” (याकोब 4:8). “जेंव्हा पाप वाढले तेंव्हा कृपा त्यापेक्षा विपुल झाली” (रोम 5:20). आणि पौलाची साक्ष हा एक सकारात्मक पुरावा आहे की, देवाकडे जो कोणी विश्वासाने येतो त्याला वाचवणे देवाला शक्य आहे आणि तशी त्याची इच्छादेखील आहे. (1 तीमथ्या 1:12-17). जर आज तुम्ही दोषाच्या ओझ्याखाली दबलेले असाल, तर निश्चिंत व्हा की तुम्ही कोणतेही अक्षम्य पाप केलेले नाही. देव हात पसरून तुमची वाट बघत आहे. येशूने वचन दिले की, “त्याच्याद्वारे देवाजवळ जाणाऱ्यांना पूर्णपणे तारण्यास तो समर्थ आहे” (इब्री 7:25). आपला प्रभू कधीही अपयशी होणार नाही. “पहा देव माझे तारण आहे; मी भाव धरितो, भीत नाही; कारण प्रभू परमेश्वर माझे बल व गीत आहे; तो मला तारण झाला आहे” (यशया 12:2).

Englishमराठीच्या पहिल्या पानावर वापस या

अक्षम्य पाप/ माफ न करता येणारे पाप म्हणजे काय?
© Copyright Got Questions Ministries