settings icon
share icon
प्रश्नः

सार्वत्रिक मंडळी आणि स्थानिक मंडळीत काय फरक आहे?

उत्तरः


स्थानिक मंडळी आणि सार्वत्रिक मंडळीतील फरक समजण्यासाठी आम्हाला प्रत्येकाची मूळ व्याख्या पाहिली पाहिजे. स्थानिक मंडळी म्हणजे येशू ख्रिस्ताचा अंगीकार करणार्‍या लोकांचा समूह जो नियमितपणे एखाद्या विशिष्ट ठिकाणी सभेसाठी एकत्र येतो. सार्वत्रिक मंडळी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणार्‍या जगभरातील सर्व विश्वासणार्ंयानी बनलेली आहे.

चर्च हा शब्द ग्रीक शब्दाचे भाषांतर आहे ज्याचा संबंध एकत्र येण्याशी किंवा “सभेशी” आहे (1 थेस्सल 2:14; 2 थेस्सल. 1:1). या शब्दाचा संबंध “बाहेर बोलाविण्यात आलेले” म्हणून विश्वासणार्‍याच्या तारणात आणि पवित्र करण्याच्या देवाच्या कार्याशी आहे. आणखी एक ग्रीक शब्द जो मालकीविषयी बोलतो आणि शब्दशः अर्थ “प्रभूचा आहे” हे चर्च म्हणून लिप्यंतरित केले जाते, परंतु तो नवीन करारात केवळ दोनदा वापरला गेला आहे आणि चर्चच्या थेट संदर्भात कधीही नाही (1 करिंथ 11:20; प्रकटीकरण 1:10)..

स्थानिक चर्च सामान्यतः ख्रिस्तावर विश्वास आणि निष्ठा असल्याचा दावा करणार्‍या सर्वांची स्थानिक मंडळी म्हणून परिभाषित केली जाते. अनेकदा स्थानिक ग्रीक शब्द (1 थेस्सल 1:1; 1 करिंथ 4:17; 2 करिंथ 11:8) इक्लेसिया स्थानिक मंडळीच्या संदर्भात वापरला जातो. कोणत्याही एका क्षेत्रात फक्त एक विशिष्ट स्थानिक मंडळी नाही. मोठ्या शहरांमध्ये अनेक स्थानिक मंडळ्या आहेत.

सार्वत्रिक मंडळी जागतिक मंडळीला दिलेले नाव आहे. या बाबतीत मंडळीची कल्पना स्वतः मंडळी नाही तर जे मंडळी बनवितात ते आहेत. अधिकृत सभा घेत नसतानाही चर्च हे चर्च आहे. प्रेषितांची कृत्ये 8:3 मध्ये, एखादी व्यक्ती आपल्या घरी असूनही चर्च अजूनही चर्च असल्याचे पाहू शकते. प्रेषितांची कृत्ये 9:31 मध्ये, किंग जेम्स मध्ये दिलेला बहुवचनी शब्द चर्चेस भाषांतर प्रत्यक्षात एकवचनी चर्च असावा जो सार्वत्रिक मंडळीचे वर्णन करतो, केवळ स्थानिक मंडळ्यांचे नाही. कधीकधी सार्वत्रिक मंडळीला “अदृश्य मंडळी” म्हटले जाते - जे रस्त्याचा पत्ता, जीपीएस समन्वय किंवा भौतिक इमारत नसल्याच्या अर्थाने अदृश्य आहे आणि या अर्थाने की केवळ देव पाहू शकतो की खरोखरच कोणाचे तारण झाले आहे. अर्थात, पवित्र शास्त्रात मंडळीचे वर्णन कधीच “अदृश्य” म्हणून केलेले नाही आणि टेकडीवर वसलेले शहर म्हणून ते नक्कीच दृश्यमान असले पाहिजे (मत्तय 5:14). येथे सार्वत्रिक मंडळीबद्दल बोलणारी अधिक वचने आहेतः 1 करिंथ 12:28; 15:9; मत्तय 16:18; इफिस. 1:22-23; कलस्सै 1:18.

Englishमराठीच्या पहिल्या पानावर वापस या

सार्वत्रिक मंडळी आणि स्थानिक मंडळीत काय फरक आहे?
© Copyright Got Questions Ministries