settings icon
share icon
प्रश्नः

पवित्रशास्त्र डायनासोअर विषयी काय सांगते?

उत्तरः


उत्पत्ती 1:1 असे सांगते, “प्रारंभी देवाने आकाश आणि पृथ्वी ही उत्पन्न केली.” नंतर, उत्पत्ती 2:4 मध्ये, असे दिसून येते की उत्पत्तीच्या दुसऱ्या, वेगळ्या कथेची सुरवात होते. दोन वेगवेगळ्या निर्मितीच्या अहवालांची संकल्पना ही सामान्यपणे त्या दोन परिच्छेदांचा चुकीचा अर्थ लावल्यामुळे आहे, वस्तुस्थितीमध्ये ते परिच्छेद त्याच निर्मितीच्या घटनेचे वर्णन करतात. ते ज्या क्रमाने गोष्टींची निर्मिती झाली त्याच्याशी असहमत नाहीत आणि एकमेकांच्या विरुध्द प्रतिपादन सुद्धा करीत नाहीत. उत्पत्ती 1 “सहा दिवसांमध्ये उत्पत्ती” (आणि सातव्या दिवशी विश्राम) याचे वर्णन करते, तर उत्पत्ती 2 आठवड्यातील फक्त एका दिवसाचे—सहावा दिवस याचा अंतर्भाव करते आणि त्यामध्ये कोणताही विरोधाभास नाही.

उत्पात्ती 2 मध्ये, लेखक सहाव्या दिवसाच्या ऐहिक क्रमामध्ये परत येतो, जेंव्हा देवाने मनुष्याची निर्मिती केली. पहिल्या अधिकारामध्ये, उत्पत्तीचा लेखक सहाव्या दिवशी मनुष्याच्या निर्मितीला कळस किंवा उत्पत्तीचा उच्च बिंदू असे प्रस्तुत करतो. नंतर, दुसऱ्या अधिकारात, लेखक मनुष्याच्या निर्मितीबद्दल सखोल तपशील देतो.

उत्पत्ती 1 आणि 2 अधिकारांच्यामध्ये विरोधाभासाचे दोन मुख्य दावे आहेत. पहिला वनस्पतींच्या जीवनाच्या संदर्भात आहे. उत्पत्ती 1:11 अशी नोंद देते की, देवाने वनस्पतींची निर्मिती तिसऱ्या दिवशी केली. उत्पत्ती 2:5 असे सांगते की, मनुष्याच्या निर्मितीच्या अगोदर “परमेश्वर देवाने आकाश व पृथ्वी ही केली तेंव्हा शेतातले कोणतेही उदभिज्ज पृथ्वीवर नव्हते आणि शेतातली कोणतीही वनस्पती अद्याप उगवली नव्हती कारण परमेश्वर देवाने अजून पृथ्वीवर पाऊस पाडीला नव्हता, आणि जमिनीची मशागत करण्यास कोणी मनुष्य नव्हता.” तर, मग हे काय आहे? देवाने वनस्पतींची निर्मिती तिसऱ्या दिवशी त्याने मनुष्याची निर्मिती करण्याच्या आधी केली (उत्पत्ती 1), किंवा मनुष्याला निर्माण केल्यानंतर केली (उत्पत्ती 2)? दोन परिच्छेदामध्ये “वनस्पती” यासाठी दोन वेगवेगळे इब्री शब्द आहेत. उत्पत्ती 1:11 अशा संज्ञेचा उपयोग करते जे सर्वसाधारणपणे वनस्पतीला संदर्भित करते. उत्पत्ति 2 एक अधिक विशिष्ट संज्ञेचा वापरते ज्यामध्ये शेतीची आवश्यकता असलेल्या वनस्पतीला संदर्भित केले जाते, उदा., एखाद्या व्यक्तीने त्याचा सांभाळ करणे, एक माळी. हि वचने विरोधाभास देत नाहीत. उत्पत्ति 1:11 मध्ये देव वनस्पती उत्पन्न करण्याविषयी बोलतो, आणि उत्पत्ति 2 मध्ये देवाने मनुष्य निर्माण केल्याशिवाय “शेतीयोग्य” वनस्पती वाढू दिली नाहीत असे म्हटले आहे.

दुसरा दावा केलेला विरोधाभास हा प्राण्यांच्या जीवनाच्या संदर्भात आहे. उत्पत्ती 1:24-25 देवाने प्राण्यांची निर्मिती सहाव्या दिवशी, मनुष्याची निर्मिती करायच्या आधी केली अशी नोंद देते. काही भाषांतरात, उत्पत्ती 2:19 मध्ये, देवाने मनुष्याची निर्मिती केल्यानंतर त्याने प्राण्यांची निर्मिती केली असे नोंद केल्याचे दिसते. तथापि, उत्पत्ती 2:19-20 च्या एका चांगल्या आणि प्रशंसनीय भाषांतराला “परमेश्वर देवाने सर्व वनपशु आणि आकाशातील सर्व पक्षी हे मातीचे घडिल्यावर आदाम त्यांस कोणती नावे देतो हे पहावे म्हणून त्याजकडे त्याने नेले; तेंव्हा आदामाने प्रत्येक सजीव प्राण्याला जे नाव दिले तेच त्याचे नाव पडले. आदामाने सर्व ग्रामपशु, आकाशातील पक्षी व सर्व वनपशु यांस नावे दिली.” हा मजकूर असे सांगत नाही की, देवाने मनुष्य निर्माण केला, नंतर त्याने प्राण्यांची निर्मिती केली आणि नंतर त्याने प्राण्यांना मनुष्याकडे आणले. त्याऐवजी मजकूर असा सांगतो की, “परमेश्वर देवाने सर्व वनपशूंची [आधीच] निर्मिती केली.” यामध्ये कोणताही विरोधाभास नाही. सहाव्या दिवशी, देवाने प्राण्यांची निर्मिती केली, नंतर मनुष्याची निर्मिती केली, आणि नंतर प्राण्यांना मनुष्याकडे त्याने त्यांना नावे देण्यासाठी आणले.

निर्मितीच्या दोन अहवालांचा स्वतंत्रपणे विचार करून आणि नंतर त्यांना एकत्रित करून, आपण असे पाहू शकतो की, देवाने उत्पत्ती 1 मध्ये निर्मितीच्या क्रमवारीचे वर्णन केले आहे, आणि नंतर उत्पत्ती 2 मध्ये विशेषकरून सहाव्या दिवसाच्या, अतिशय महत्वाच्या तपशिलांचे स्पष्टीकरण दिले आहे. येथे कोणताही विरोधाभास नाही, केवळ सामान्यापासून विशिष्टपर्यंतचे वर्णन करणारे सामाईक साहित्यिक उपकरण आहे.

Englishमराठीच्या पहिल्या पानावर वापस या

उत्पत्ती अधिकार 1 आणि 2 मध्ये निर्मितीचे दोन वेगवेगळे अहवाल का आहेत?
© Copyright Got Questions Ministries