settings icon
share icon
प्रश्नः

देवाने बर्‍या वाईटाच्या ज्ञानाचे झाड एदेन बागेत का ठेविले?

उत्तरः


देवाने आदाम आणि हव्वेस त्याच्या आज्ञेचे पालन करण्याची अथवा त्याच्या आज्ञेचे उल्लंघन करण्याची निवड देण्यासाठी बर्‍या वाईटाच्या न्यायाचे झाड एदेन बागेत ठेविले. आदाम आणि हव्वा वाटेल ते करावयास स्वतंत्र होते, फक्त त्यांना बर्‍या व वाईटाच्या ज्ञानाच्या झाडाचे फळ खाण्याची परवानगी नव्हती. उत्पत्ती 2:16-17, "तेव्हा परमेश्वर देवाने आदामाला अशी आज्ञा दिली की बागेतील वाटेल त्या झाडाचे फल यथेच्छा खा; पण बर्‍यावाइटाचे ज्ञान करून देणार्‍या झाडाचे फळ खाऊ नको; कारण ज्या दिवशी त्याचे फळ तू खाशील त्या दिवशी तू खास मरशील." जर देवाने आदाम आणि हव्वेस निवड दिली नसती, तर ते रोबोटसारखे झाले असते, जे करण्यासाठी त्यांना कार्यक्रमित करण्यात आले होते तेवढेच त्यांनी केले असते. देवाने आदाम आणि हव्वेस "स्वतंत्र" प्राणी म्हणून उत्पन्न केले होते, ते निर्णय घ्यावयास, बर्‍या व वाईटाची निवड करावयास समर्थ होते. आदाम आणि हव्वेस खरोखर स्वतंत्र राहण्यासाठी, एक निवड करण्याची गरज होती.

झाडात अथवा त्या झाडाच्या फळात खरोखर वाईट असे काहीही नव्हते. हे अशक्य आहे की फळाने, स्वतःठायी, आदाम आणि हव्वेस आणखी पुढे काही ज्ञान दिले असेल. अर्थात, भौतिक फळात काही जीवनसत्व क आणि काही गुणकारक तंतू समाविष्ट असतील, पण ते आध्यात्मिकरित्या पोषक नव्हते. तथापि, आज्ञा उल्लंघनाचे हे कृत्य आध्यात्मिकरित्या अपायकारक होते. त्या पापाने आदाम आणि हव्वेचे डोळे वाईटाप्रत उघडले. पहिल्यांदा, वाईट काय आहे, लाज वाटणे म्हणजे काय, आणि देवापासून लपण्याची इच्छा धरणे काय असते ते त्यांस कळून आले. देवाच्या आज्ञेचे उल्लंघन करण्याच्या त्यांच्या पापाने त्यांच्या जीवनात आणि जगात भ्रष्टता आणली. देवाविरुद्ध आज्ञाभंगाचे कृत्य म्हणून, फळ खाल्ल्याने, आदाम आणि हव्वेस वाईटाचे ज्ञान प्राप्त झाले — आणि त्यांच्या नग्नतेचे ज्ञान (उत्पत्ती 3:6-7).

आदाम आणि हव्वेने पाप करावे अशी देवाची इच्छा नव्हती. देवाला आधीच माहीत होते की पापाचे परिणाम काय असतील. देवाला माहीत होते की आदाम आणि हव्वा पाप करतील आणि त्याद्वारे वाईट, दुःख, मृत्यू जगात आणतील. तर मग, का म्हणून, देवाने सैतानाला आदाम आणि हव्वेची परीक्षा घेण्याची परवानगी दिली? त्यांस निवड करण्याची बळजबरी करण्यासाठी देवाने सैतानास आदाम आणि हव्वेची परीक्षा घेण्याची परवानगी दिली. आदाम आणि हव्वेने, त्यांच्या स्वतंत्र इच्छेने, देवाच्या आज्ञेचे उल्लंघन केले आणि वज्र्य केलेले फळ खाल्ले. तेव्हापासून त्यांच्या परिणामांनी — वाईट, पाप, क्लेश, रोग, आणि मृत्यू यांनी — जगास गांजून सोडले आहे. आदाम आणि हव्वेच्या निर्णयाचा परिणाम म्हणून प्रत्येक व्यक्ती पापमय स्वभाव, पाप करण्याची प्रवृत्ती घेऊन जन्मास येतो. आदाम आणि हव्वेच्या निर्णयामुळेच शेवटी येशू ख्रिस्ताला आमच्या वतीने वधस्तंभावर मरण्याची व त्याचे रक्त वाहण्याची गरज भासली. ख्रिस्तावरील विश्वासाद्वारे, आपण पापाच्या परिणामापासून मुक्त होऊ शकतो, आणि शेवटी पापापासूनही मुक्त होऊ शकतो. रोमकरांस पत्र 7:24-25 मधील प्रेषित पौलाचे शब्द आम्हास प्रतिध्वनित करता यावे, "किती मी कष्टी माणूस! मला ह्या मरणाधीन असलेल्या देहापासून कोण सोडवील? आपला प्रभु येशू ख्रिस्त ह्याच्या द्वारे मी देवाचे आभार मानितो. तर मग मी स्वतः मनाने देवाच्या नियमाचे दास्य करितो पण देहाने पापाच्या नियमाचे करितो."

Englishमराठीच्या पहिल्या पानावर वापस या

देवाने बर्‍या वाईटाच्या ज्ञानाचे झाड एदेन बागेत का ठेविले?
© Copyright Got Questions Ministries