प्रश्नः
अन्य भाषा बोलणे पवित्र आत्मा प्राप्त झाल्याचा पुरावा आहे काय?
उत्तरः
प्रे. कृत्यांमध्ये तीन असे प्रसंग आहेत जेथे अन्य भाषेत बोलण्यासोबत पवित्र आत्मा प्राप्त करणे झाले - प्रे. कृत्ये 2:4; 10:44, आणि 19:6. तथापि, हे तीन प्रसंग बायबलमधील एकमेव स्थाने आहेत जेथे अन्य भाषेत बोलणे पवित्र आत्मा प्राप्त करण्याचे पुरावे आहेत. प्रे. कृत्यांच्या संपूर्ण पुस्तकात हजारो लोक येशूमध्ये विश्वास ठेवतात आणि त्यांनी अन्य भाषा बोलल्याविषयी काहीही महटलेले नाही (प्रे. कृत्ये 2:41; 8:5-25; 16:31-34; 21:20). नव्या करारात कोठेही असे शिकविण्यात आलेले नाही की अन्य भाषा बोलणे हा व्यक्तीने पवित्र आत्मा प्राप्त केल्याचा एकमेव पुरावा आहे. खरे म्हणजे नवा करार या उलट शिकवितो. आम्हास असे सांगण्यात आले आहे की ख्रिस्तारील प्रत्येक विश्वासणाऱ्या पवित्र आत्मा मिळाला आहे (रोम 8:9; 1 करिंथ 12:13; इफिस 1:13-14), पण प्रत्येक विश्वासणारा अन्य भाषा बोलत नाही (1 करिंथ 12:29-31).
तर मग प्रे. कृत्यांच्या त्या तीन उतार्यांत अन्य भाषा बोलणे पवित्र आत्म्याचा पुरावा का होता? प्रे. कृत्ये 2 लिहिते की प्रेषित पवित्र आत्म्याने परिपूर्ण होत होते आणि सुवार्ता सांगण्यासाठी त्याच्याद्वारे सामथ्र्य प्राप्त करीत होते. प्रेषित इतर भाषा (अन्य भाषा) बोलण्यास सक्षम झाले यासाठी की त्यांना लोकांस त्यांच्या भाषांत सत्य सांगता यावे. प्रे. कृत्ये 10 लिहिते की प्रेषित पेत्रास गैरयहूदियांस सुवार्ता सांगण्यासाठी पाठविण्यात येत होते. पेत्र आणि इतर प्रारंभिक ख्रिस्ती यहूदी असल्याने अन्यजातियांस (गैरयहूदियांस) मंडळीत स्वीकार करणे त्यांस कठीण झाले असते. देवाने अन्यजातियांस अन्य भाषा बोलण्याचे सामथ्र्य दिले हे दाखविण्यासाठी की त्यांना तोच पवित्र आत्मा मिळाला होता जो प्रेषितांस मिळाला होता (प्रे. कृत्ये 10:47, 11:17).
प्रे. कृत्ये 10:44-47 याचे वर्णन करते, “पेत्राचे हे भाषण चालू असतानाच वचन ऐकणाऱ्या सर्वांवर पवित्र आत्मा उतरला. मग परराष्ट्रीयांवरही पवित्र आत्म्याच्या दानाचा वर्षाव झाला आहे असे पाहून पेत्राबरोबर आलेल्या विश्वास ठेवणाऱ्या व सुंता झालेल्या सर्व लोकांना आश्घ्चर्य वाटले. कारण त्यांनी त्यांना अनेक भाषांतून बोलताना व देवाची थोरवी गाताना ऐकले. तेव्हा पेत्राने म्हटले, “आम्हांला मिळाला तसा पवित्र आत्मा ज्यांना मिळाला आहे त्यांचा बाप्तिस्मा होऊ नये म्हणून कोणाच्याने पाण्याची मनाई करवेल?”” पेत्र नंतर या घटनेचा उल्लेख या गोष्टीचा पुरावा म्हणून करतो की परमेश्वर खरोखर अन्यजातियांचे तारण करीत होता. (प्रे. कृत्ये 15:7-11).
कोठेही असे लिहिलेले नाही की जेव्हा ख्रिस्ती लोक येशू ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून ग्रहण करतात आणि म्हणून पवित्र आत्म्याचा बापतिस्मा प्राप्त करतात, तेव्हा त्यांनी अन्य भाषा बोलण्याची अपेक्षा केली पाहिजे. खरे म्हणजे, नव्या करारातील विश्वास परिवर्तनाच्या सर्व वर्णनांमधून केवळ दोन त्या संदर्भात अन्य भाषा बोलण्याची नोंद करतात. अन्य भाषा चमत्कारिक कृपादान आहे ज्याचा विशिष्ट समयासाठी विशिष्ट हेतू होता. हा पवित्र आत्मा प्राप्त करण्याचा एकमेव पुरावा नव्हता, कधीही नव्हता.
English
अन्य भाषा बोलणे पवित्र आत्मा प्राप्त झाल्याचा पुरावा आहे काय?