settings icon
share icon
प्रश्नः

ख्रिस्ती लोकांनी इतर लोकांच्या धर्मश्रद्धांविषयी सहिष्णू असले पाहिजे का?

उत्तरः


आमच्या "सहिष्णूतेच्या" युगात, नैतिक सापेक्षतावादास श्रेष्ठ गुण म्हणून समजाविण्याचा प्रयत्न केला जातो. प्रत्येक तत्वज्ञान, कल्पना, आणि विश्वास प्रणालीत समान गुण आहेत, आणि ते समान आदरास पात्र आहेत, असे सापेक्षवाद्यांचे मत आहे. जे एका विश्वास प्रणालीपेक्षा दुसर्या विश्वास प्रणालीस पसंत करतात अथवा — त्याहीपेक्षा वाईट — पूर्ण सत्याचे ज्ञान असल्याचे प्रतिपादन करतात, त्यांस संकुचित मनोवृत्तीचे अज्ञानी, आणि धर्मांध समजले जाते.

अर्थात, विभिन्न धर्म परस्पर विशिष्ट दावा करतात, आणि सापेक्षवादी स्पष्टपणे विरोधाभासी गोष्टींत तार्किकदृष्ट्या मेळ बसविण्यास असमर्थ असतो. उदाहरणार्थ, बायबल असे प्रतिपादन करते की, "माणसाने एकदाच मरणे व त्यानंतर न्याय होणे नेमून ठेवले आहे" (इब्री लोकांस पत्र 9:27), तर काही पौर्वात्य धर्म पुनर्जन्म शिकवितात. म्हणून, आपण एकदा मरतो अथवा अनेकदा? दोन्ही शिकवणी खर्या असू शकत नाहीत. सापेक्षवादी मुख्यत्वेकरून विरोधाभासयुक्त जग निर्माण करण्यासाठी सत्यास पुन्हा परिभाषित करते जेथे असंख्य, विरोधाभासी "सत्ये" एकत्र राहू शकतात.

येशू म्हणाला, "मार्ग, सत्य व जीवन मीच आहे; माझ्याद्वारे आल्यांवाचून पित्याकडे कोणी येत नाही" (योहान 14:6). ख्रिस्ती व्यक्तीने सत्य स्वीकारले आहे, केवळ संकल्पना नाही, पण व्यक्ती म्हणून. सत्याचा हा अंगीकार ख्रिस्ती व्यक्तीला तथाकथित आजच्या दिवसातील "खुल्या विचारसरणीपासून" दूर करतो. ख्रिस्ती व्यक्तीने सार्वजनिकरित्या हे कबूल केले आहे की येशू मेलेल्यांतून जीवंत झाला (रोमकरांस पत्र 10:9-10). जर तो खरोखर पुनरुत्थानात विश्वास करीत असेल, तर तो विश्वास न धरणार्या व्यक्तीच्या ह्या ठाम मतासंबंधाने "खुली विचारसरणी" कशी बाळगू शकतो की येशू कधीही पुन्हा जीवंत झाला नाही? ख्रिस्ती व्यक्तीसाठी देवाच्या वचनाच्या स्पष्ट शिकवणीचा नाकार करणे म्हणजे खरोखर देवाचा विश्वासघात करणे होय.

लक्षात घ्या की आपण आतापर्यंत आपल्या उदाहरणार्थ विश्वासाच्या मूलभूत गोष्टींचा उल्लेख केला आहे. काही गोष्टींबाबत (जसे की ख्रिस्ताचे सदेह पुनरुत्थान) तडजोड करता येत नाही. इतर गोष्टींसंबंधाने चर्चा करता येईल, जसे इब्री लोकांस पत्र कोणी लिहिले अथवा पौलाच्या "शरीरातील काट्याचे" स्वरूप. आपण दुय्यम महत्वाच्या गोष्टींविषयी वाद घालण्यात फसता कामा नये (तीमथ्याला 2 रे पत्र 2:23; तीताला पत्र 3:9).

महत्वपूर्ण सिद्धांतांविषयी वाद/संवाद घालत असतांना, ख्रिस्ती व्यक्तीने संयम बाळगावा आणि आदर व्यक्त करावा. एखाद्या मताशी असहमत होणे हे वेगळे; आणि त्या इसमाचा अवमान करणे वेगळे. आपण सत्यावर शंका व्यक्त करणार्यावर करूणा केली पाहिजे. येशूप्रमाणे, आपण कृपा आणि सत्य यांनी युक्त असावे (योहान 1:14). पेत्र उत्तर असणे आणि नम्रता असणे यात उत्तम संवाद साधतो: "तुमच्याठायी जी आशा आहे तिच्याविषयी विचारपूस करणार्या प्रत्येकाला उत्तर देण्यास नेहमी सिद्ध असा. तरी ते सौम्यतेने आणि भीडस्तपणाने द्या" (पेत्राचे 1 ले पत्र 3:15).

English



मराठीच्या पहिल्या पानावर वापस या

ख्रिस्ती लोकांनी इतर लोकांच्या धर्मश्रद्धांविषयी सहिष्णू असले पाहिजे का?
© Copyright Got Questions Ministries