settings icon
share icon
प्रश्नः

पवित्रशास्त्र डायनासोअर विषयी काय सांगते?

उत्तरः


जीवनाचा उगम याच्या तीन महत्वाच्या जागतिक दृष्टीकोनापैकी दैवीय उत्क्रांती हा एक आहे, बाकीचे दोन हे निरीश्वरवादी उत्क्रांती (ज्यांना सामान्यपणे डार्विनचा उत्क्रांतवाद आणि निसर्गवादी उत्क्रांतवाद असे ओळखले जाते) आणि विशिष्ठ निर्मिती आहेत.

अदैवीय उत्क्रांती असे सांगते की देव नाहीच आणि जीवनाचा उगम नैसर्गिकपणे जरी त्या नैसर्गिक नियमांचे स्पष्टीकरण दिले नसले तरी, आधीच अस्तित्वात असलेल्या निर्जीव खडकांमधून नैसर्गिक नियमांच्या (जसे की, गुरुत्वाकर्षण इत्यादी) प्रभावाखाली झाला. विशिष्ठ निर्मिती असे सांगते की, देवाने जीवनाला एकतर काहीच नव्हते त्यापासून किंवा ज्या गोष्टी आधीच अस्तित्वात होत्या त्यापासून प्रत्यक्ष निर्माण केले.

दैवीय उत्क्रांती दोन्हींपैकी एक गोष्ट सांगते: पहिला पर्याय हा आहे की, देव आहे, परंतु तो जीवनाच्या उगमामध्ये प्रत्यक्ष सहभागी नाही. त्याने कदाचित खडकांची निर्मिती केली असेल, कदाचित त्याने नैसर्गिक नियामंना बनवले असेल, कदाचित त्यानेच अखेरीस जीवनाच्या उगमाचा विचार डोक्यात ठेऊन काही गोष्टींची सुद्धा निर्मिती केली, परंतु थोडा वेळ आधीच तो मागे सरकला आणि त्याच्या निर्मितीला नियंत्रण घेऊ दिले. तिला जे काही करायचे ते त्याने करू दिले, मग ते काहीही असो, आणि अखेरीस जीवनाचा उगम निर्जीव वस्तूंपासून झाला. हा दृष्टीकोन निरीश्वरवादी उत्क्रांती सारखाच आहे ज्यामध्ये ते जीवनाच्या नैसर्गिक उगमाला गृहीत धरते.

दैवीय उत्क्रांतीचा दुसरा पर्याय असा आहे की, जसे आपण जाणतो तसे जीवनाच्या उगमाबद्दल देवाने फक्त एक किंवा दोन चमत्कार केलेले नाहीत. त्याचे चमत्कार सतत होते. त्याने जीवनाला एक एक पायरी असे करून अशा मार्गावर नेले जो प्राचीन साधेपणापासून समकालीन जटीलतेपर्यंत अगदी डार्विनच्या जीवनाच्या उत्क्रांतीच्या झाडासारखे (मास्यापासून उभयचर उत्पन्न झाले त्यांच्यापासून सरपटणारे प्राणी उत्पन्न झाले त्यांच्यापासून पक्षी आणि सस्तन प्राणी उत्पन्न झाले, इत्यादी) जातो. जेथे जीवनाचा उगम नैसर्गिकपणे होण्यास सक्षम नव्हता (सरपटणाऱ्या प्राण्याच्या अवयवाची उत्क्रांती पक्षाच्या पंखामध्ये नैसर्गिकपणे कशी होऊ शकेल?), देव त्यामध्ये आला. हा दृष्टीकोन विशिष्ठ निर्मितीसारखा आहे, ज्यामध्ये जसे आपण जाणतो की, जीवनाला आणण्यासाठी काही ठिकाणी देवाने अलौकिकदृष्ट्या कार्य केले.

पवित्रशास्त्रातील विशिष्ठ निर्मितीचा दृष्टीकोन आणि दैवीय उत्क्रांतीचा दृष्टीकोन यामध्ये पुष्कळ फरक आहेत.

एक महत्वाचा फरक हा त्यांचा मृत्यूबद्दल असलेला दृष्टीकोन याच्या संदर्भात आहे. दैवीय उत्क्रांतीवाल्यांचे असे मानणे आहे की, पृथ्वी ही कोट्यावधी वर्षे जुनी आहे, आणि भौगोलिक रकाना ज्यामध्ये जीवाष्मांच्या नोंदी आहेत तो वेळेच्या लांब युगांचे प्रतिनिधित्व करतो. ज्या अर्थी मनुष्य जीवाष्मांच्या नोंदींमध्ये बऱ्याच काळापर्यंत प्रकट होत नाही, दैवीय उत्क्रांतीवाले यावर विश्वास ठेवतात की, अनेक प्राणी मनुष्याचे उशिरा आगमन होण्याच्या आधी जगले, मेले आणि त्यांचे अस्तित्व खूप आधी नाहीसे झाले. याचा अर्थ असा होतो की, आदम आणि त्याचे पाप याच्या आधी मृत्यू अस्तित्वात होता.

पवित्रशास्त्रीय निर्मितीवाले असा विश्वास ठेवतात की, पृथ्वी त्या तुलनेने नवीन आहे, आणि जीवाष्मांच्या नोंदी नोहाच्या पुराच्या दरम्यान किंवा पुरानंतर करण्यात आल्या. असे मानले जाते की, थरांचे स्तरीकरण जलविज्ञानाचे वर्गीकरण आणि द्रवीकरण यांच्यामुळे झाले आहे, ज्या दोन्हीही बघितलेल्या घटना आहेत. हे जीवाष्मांच्या नोंदी आणि मृत्यू आणि नरसंहार यांना मांडतो, जे त्याचे वर्णन आदमने पाप केल्यानंतर शेकडो वर्षानंतर करते.

या दोन मनोभूमिकांमधील अजून एक महत्वाचा फरक हा आहे की, ते उत्पत्ती कसे वाचतात. दैवीय उत्क्रांतीवाल्यांचा कल एकतर दिवस-युग सिद्धांत किंवा रचनात्मक सिद्धांत यांकडे जास्त दिसून येतो, ज्यापैकी दोन्हीही उत्पत्ती 1 च्या निर्मिती आठवड्याचे रूपात्मक स्वरुपाचे अर्थ आहेत. नवीन पृथ्वी निर्मितीवाले जेंव्हा ते उत्पत्ती वाचतात तेंव्हा ते प्रत्यक्ष 24-तासांच्या दिवसाला चिटकून राहतात. दैवीय उत्क्रांतीवाल्यांचे दोन्ही दृष्टीकोन ख्रिस्ती दृष्टिकोनापासून सदोष असे आढळून येतात ज्यामध्ये ते उत्पत्तीच्या निर्मिती अहवालाबरोबर जुळत नाहीत.

दैवीय उत्क्रांतीवाल्यांनी डार्विनच्या परिस्थितीची कल्पना केली ज्यामध्ये ताऱ्यांची उत्क्रांती झाली, मग आपली सौर यंत्रणा, मग पृथ्वी, मग वनस्पती आणि प्राणी, आणि शेवटी मनुष्य. घटनांचा उलगडा करण्यामध्ये देवाने बजावलेल्या भूमिकेच्या बाबतीत दोन दैवीय उत्क्रांतीचे दृष्टीकोन असहमत आहेत, परंतु सामान्यपणे ते डार्विनच्या कालबद्धतेशी सहमत होतात. या कालबद्धतेचा उत्पत्तीच्या निर्मिती अहवालाबरोबर संघर्ष आहे. उदाहरणार्थ, उत्पत्ती 1 असे सांगते की, पृथ्वीची निर्मिती पहिल्या दिवशी झाली, आणि सूर्य, चंद्र आणि तारे यांची निर्मिती चौथ्या दिवसापर्यंत झाली नव्हती. काही असा वाद करतात की, उत्पत्तीचे शब्द असे सुचवतात की, सूर्य, चंद्र आणि तारे यांना प्रत्यक्षात पहिल्या दिवशी बनवले होते, परंतु ते पृथ्वीच्या वातावरणामुळे चौथ्या दिवसापर्यंत दिसू शकले नाहीत, ज्यामुळे त्यांची नेमणूक चौथ्या दिवशी होण्याकडे गेले. हे थोडे ताणले गेले आहे, कारण उत्पत्तीचा अहवाल हे खूपच स्पष्ट करतो की, पृथ्वीभोवती दुसऱ्या दिवसापर्यंत वातवरण नव्हते. जर सूर्य, चंद्र, आणि तारे यांना पहिल्या दिवशी बनवले गेले असते, तर ते पहिल्या दिवशीच दृश्यमान झाले असते.

आणखी, उत्पत्तीचा अहवाल स्पष्टपणे सांगतो की, पक्षांची निर्मिती समुद्रातील प्राण्यांच्याबरोबर पाचव्या दिवशी झाली, तर जमिनीवरील प्राण्यांना सहाव्या दिवसापर्यंत निर्माण केले गेले नव्हते. पक्षांची उत्क्रांती जमिनीवरील प्राण्यांपासून झाली या डार्विनच्या दृष्टीकोनाच्या हे थेट विरुध्द आहे. पवित्रशास्त्राचा अहवाल असे सांगतो की, पक्षी हे जमिनीवरील प्राण्यांच्या आधी आले. दैवीय उत्क्रांतीवाल्यांचा दृष्टीकोन नेमका याच्या विरुद्धमध्ये सांगतो.

आधुनिक ख्रिस्ती लोकांचा सर्वात दुर्दैवी कल हा आहे की, ते उत्क्रांतीविषयक सिद्धांताला सामावून घेण्यासाठी उत्पत्तीचा पुन्हा नव्याने अर्थ लावतात. अनेक प्रसिद्ध पवित्र शास्त्राचे शिक्षक आणि खेदपूर्वक क्षमायाचक उत्क्रांतीवाल्यांकडे वळले आहेत आणि या विश्वासापर्यंत पोचले आहेत की उत्पत्तीच्या प्रत्यक्ष अर्थाला चिटकून राहणे हे ख्रिस्ती लोकांच्या विश्वासार्हततेला कुठेतरी हानिकारक आहे. काहीही असल्यास, उत्क्रांतीवाल्यांच्या नजरेतून अशा लोकांचा आदर निघून जातो, ज्यांचा पवित्रशास्त्रावरील विश्वास इतका नाजूक आहे की ते त्याबद्दल लगेच तडजोड करण्यास तयार होतात. जरी शिक्षणसंस्थेमध्ये खऱ्या निर्मितीवाल्यांची संख्या कमी होत असली तरी, अनेक विश्वासू संस्था जसे की, आन्सर्स इन जेनेसिस, क्रिएशन रिसर्च सोसाईटी, आणि इन्स्टीटूट फॉर क्रिएशन रिसर्च यांनी पुष्टी केली आहे की, पवित्र शास्त्र हे फक्त वास्तविक विज्ञानाबरोबर सुसंगत आहे इतकेच नाही तर याची सुद्धा पुष्टी केली आहे की पवित्र शास्त्रातील एकाही शब्दाला सुद्धा वास्तविक विज्ञानाने कधीही नाकारले नाही. पवित्र शास्त्र हे देवाचा जिवंत शब्द आहे, ज्याला सृष्टीच्या निर्मात्याने आपल्याला दिले आहे, आणि त्याने सृष्टीची निर्मिती कशी केली याचे केलेले वर्णन उत्क्रांतीच्या सिद्धांताबरोबर, अगदी “दैवीय” उत्क्रांतीच्या समजुतीशीसुद्धा सुसंगत नाही.

Englishमराठीच्या पहिल्या पानावर वापस या

दैवीय उत्क्रांती म्हणजे काय?
© Copyright Got Questions Ministries