settings icon
share icon
प्रश्नः

कोणाच्यातरी बदल्यामध्ये देण्यात येणारे प्रायश्चित्त काय आहे?

उत्तरः


कोणाच्यातरी बदल्यामध्ये देण्यात येणारे प्रायश्चित्त हे प्रभू येशू ख्रिस्ताला दर्शविते. जे की तो पापी व्यक्ती साठी मरण पावला असे पवित्र शास्त्रातील वचने शिकवितात.सर्व मानव पापी आहेत. (रोम करास पत्र 3:9-18:23). पापाची मजूरी हे मरण आहे. रोम करास पत्र 6:23 वचन, “पापाचे वेतन मरण आहे पण देवाचे कृपादान आपल्या प्रभु येशू ख्रिस्तामध्ये सर्वाकालिक जीवन आहे.”

हे वचन आपणाला पुष्कळ गोष्टी शिकविते. ख्रिस्ताशिवाय मरणे म्हणजे सार्वकालिक नरकामध्ये जाणे आमच्या पापची मजूरी नरक आहे. मृत्यू हे विष्य पवित्र शास्त्र सांगते देवापासून “वेगळे होणे.” सर्वजण मरणार आहोत. परंतू काही लोक स्वर्गामध्ये प्रभुसंगती सदा सर्वकाळसाठी असणार व काही लोक नरकामध्ये आपले जीवन सदा सर्वकाळ साठी घालविणार. मृत्यू या ठिकाणी आपणाला नरकाविषयी सांगते. असो, दुसरी गोष्ट हे वचन आम्हाला सार्वकालिक जीवनाविषयी देखील शिकवीते. जे की येशूख्रिस्ताद्वारे उपलब्ध आहे. आणि हेच आहे. की ते कोणाला बदलता येणार नाही. त्यालाच प्रायश्चित्त असे म्हणावे.

ख्रिस्त येशू आमच्या जागी मरण पावला. जेव्हा तो वधस्तंभावर होता. आम्हाला ती पापाची शिक्षा होणे गरजेचे होते. कारण आम्ही पापी होतो. आम्ही पापमय जीवन जगलो. परंतू ख्रिस्ताने आमची शिक्षा स्वत:वर- घेतली व तो आमच्याठिकाणी मरण पावला. ज्यासाठी आम्ही खऱ्या अर्थाने योग्य होतो. “ज्याला पाप ठाऊक नव्हते. त्याला त्याने तुमच्या आमच्याकरीता पाप केले. यासाठी की, आपण त्याच्याठायी देवाचे नितीमत्व असे व्हावे.” (I I करी 5:21).

“त्याने तुमचे आमची पापी स्वदेहोने वाहून खांबावर नेली, यासाठी की आपण पापाचरणासबंधाने मृत होऊन धार्मिक आचरणासाठी जीवंत रहावे. त्याला बसलेल्या माराच्या वळांनी तुम्ही निरोगी व्हावे.” (I पेत्र 2:24). या ठिकाणी पुन्हा आपण पाहतो. ख्रिस्ताने आपले पाप घेतले त्याने त्याची पूर्ण किंमत आमच्यासाठी भरली काही वचने आम्ही वाचणार आहोत, “कारण आपल्याला देवाजवळ नेण्यासाठी ख्रिस्तांनी ही पापाबद़दल म्हणजे धार्मिक पुरूषाने व अधार्मिक लोकांकरिता एकदा दु:ख सोशिले तो देरुपे जीवे मारल्या गेला आणि अध्यात्मिक रित्या जीवंत केला गेला.” (I पेत्र 3:18). हे वचन आम्हाला शिकवीते ख्रिस्ताने आमचे स्थान घेतले एवढेच नव्हे, तर तो आमच्यासाठी प्रायश्चित्त असा झाला त्याने सर्वकाही मनुष्याच्या पापाकरीता किंमत चुकवीली!

अजन एक संदर्भ आम्हाला कोणाच्यातरी बदल्यामध्ये दिलेजाणाऱ्या प्रायश्चित्ताविषयी यशया 53:5 सांगते. मध्ये सांगते हे वचन ख्रिस्ताच्या येण्याविषयी सांगते तो आमच्या पापासाठी मरणार होता. भविष्यवाणी पुष्कळ सविस्तरपणे देण्यात आली आहे ,जी त्याप्रकरे घडली “खरे पाहिले असता तो आमच्या आपराधामुळे घायाळ झाला आमच्या दुष्कर्मामुळे ठेचला गेला आम्हास शांती देणारी अशी शिक्षा त्यास झाली त्यास बसलेल्या फटक्यांनी आम्हास आरोग्य प्राप्त झाले” या ठिकाणी कोणाच्या वर मोबदल्यात मरणाच्या गोष्टीकडं लक्ष दया. पुन्हा आपण या ठिकाणी पाहतो. ख्रिस्ताने आमच्यासाठी किंमत चुकवली! आम्ही ही पापाची किंमत स्वत: शिक्षा भोगून सार्वकालीक नरकात सदासर्वकाळ साठी भरु शकलो असतो. परंतू देवाचा पुत्र ,प्रभु येशू ख्रिस्त ,यांनी आमच्या पापाची किंमत चुकवण्यासाठी या जगात आला. त्याने सर्व काही आमच्यासाठी केले, याद्वारे आम्हाला त्याच्याजवळ पापक्षमा मिळाविणे एवढेच नव्हे ,तर सदासर्वकाळ साठी त्याच्या जवळ जीवन जगण्याची संधी दिली. आमच्यासाठी अशाप्रकारे हे घडले जे काही ख्रिस्तासंगती वधस्तंभावर घडले त्यावर विश्वास ठेवण्याची आवश्यकता आहे. त्या व्यतिरिक्त आम्ही स्वत:ला वाचू शकत नाही. आम्हाला अशा व्यक्तीची आवश्यकता आहे की, जो आमची जागा घेऊल येशू ख्रिस्ताचे मरणच आमच्यासाठी दिले जाणारे प्रायश्चित्त आहे.

English



मराठीच्या पहिल्या पानावर वापस या

कोणाच्यातरी बदल्यामध्ये देण्यात येणारे प्रायश्चित्त काय आहे?
© Copyright Got Questions Ministries