प्रश्नः
तारणाप्रत जाणारी कोणती पावले आहेत?
उत्तरः
बरेच लोक “तारणाचे उपाय” शोधत आहेत. लोकांना पाच चरणांची सूचना मॅन्युअलची कल्पना आवडली जीचे अनुसरण केल्यास त्यांचे तारण होईल. याचे एक उदाहरण म्हणजे इस्लामचे पाच खांब आहेत. इस्लामनुसार जर या पाच स्तंभांचे पालन केले तर तारण किंवा नज़ात मिळेल. तारणासाठी चरण-दर-चरण प्रक्रियेची कल्पना आकर्षक आहे, म्हणून ख्रिस्ती समाजातील बरेच लोक चरण-दर-चरण प्रक्रियेचा परिणाम म्हणून तारण सादर करण्याची चूक करतात. रोमन कॅथलिक धर्मात सात संस्कार आहेत. विविध ख्रिस्ती संप्रदाय बाप्तिस्मा, जाहीर कबुलीजबाब, पापांपासून मन फिरविणे, निरनिराळ्या भाषेत बोलणे इ. तारणप्राप्तीची पावले किंवा उपाय म्हणून जोडतात. परंतु बायबलमध्ये तारणासाठी केवळ एक पाऊल सांगितले आहे. जेव्हा फिलिप्पाच्या बंदिगृहाच्या अधिकाऱ्याने पौलाला विचारले, “तारण प्राप्त व्हावे म्हणून मी काय करावे?” पौलाने उत्तर दिले, “प्रभु येशू ख्रिस्तावर विश्वास ठेव, म्हणजे तुझे तारण होईल” (प्रेषितांची कृत्ये 16:30-31).
तारणारा म्हणून येशू ख्रिस्तावर विश्वास ही तारणाची केवळ एक “पायरी” आहे. बायबलचा संदेश भरपूर स्पष्ट आहे. आपण सर्वांनी देवाविरुद्ध पाप केले आहे (रोम 3:23). आमच्या पापामुळे, आम्ही कायमचे देवापासून वेगळे होण्यास पात्र आहोत (रोम 6:23). आमच्यावर त्याच्या प्रेमामुळे (योहान 3:16), देव मानवरूप धारण करून आला आणि त्याने आपल्या जागी मरण पत्करले, ज्या शिक्षेस आपण पात्र आहोत (रोम 5:8; 2 करिंथ 5:21).
विश्वासाद्वारे कृपेने येशू ख्रिस्तास तारणारा म्हणून स्वीकार करणाÚयांस सर्वांना देव क्षमा करतो आणि स्वर्गात सार्वकालिक जीवन देतो. (योहान 1:12? 3:16; 5:24; प्रेषितांची कृत्ये 16:31).
तारण म्हणजे आम्ही ते मिळविण्यासाठी काही विशिष्ट उपायांचे अनुसरण करणे आवश्यक आहे असे नाही. होय, ख्रिस्ती लोकांनी बाप्तिस्मा घेतला पाहिजे. होय, ख्रिस्ती लोकांनी सार्वजनिकपणे ख्रिस्ताला तारणारा म्हणून कबूल केले पाहिजे. होय, ख्रिस्ती लोकांनी पापापासून मन फिरविले पाहिजे. होय, ख्रिस्ती लोकांनी देवाच्या आज्ञेचे पालन करण्यासाठी आपले जीवन अर्पण करावे तथापि, ही तारण प्राप्त करण्याची पावले नाहीत. ते तारणाचे परिणाम आहेत. आपल्या पापामुळे आपण कोणत्याही अर्थाने तारण कमावू शकत नाही. आम्ही 1000 चरणांचे अनुसरण करू शकतो, आणि ते पुरेसे ठरणार नाही. म्हणूनच आपल्या जागी येशूला मरावे लागले. आपण देवाला आपल्या पापांचे ऋण फेडण्यात किंवा पापांपासून स्वतःस साफ करण्यास पूर्णपणे अक्षम आहोत. फक्त देवच आपले तारण साध्य करू शकला आणि म्हणून त्याने ते केले. देवाने स्वतः ती “पावले” पूर्ण केली म्हणून तो अशा कोणालाही तारण देतो जे त्याचा स्वीकार करतात.
तारण आणि पापांची क्षमा त्या चरणांचे अथवा पावलांचे अनुसरण करणे नाही. त्याचा संबंध ख्रिस्ताचा तारणारा म्हणून स्वीकार करण्याशी आहे आणि त्याने आमच्यासाठी सर्व कामे केली आहे हे ओळखण्याशी आहे.
देवाला आपल्याकडून एक पाऊल हवे आहे - येशू ख्रिस्ताला पापांपासून आमचा तारणारा म्हणून स्वीकारणे आणि तारणाचा मार्ग म्हणून त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवणे. हीच गोष्ट खिस्ती विश्वासास जगातील इतर सर्व धर्मांपेक्षा वेगळे करते, ज्यापैकी प्रत्येकाजवळ मोक्ष मिळविण्यासाठी पाळल्या जाणा चरणांची यादी आहे. ख्रिस्ती विश्वास हे ओळखतो की देवाने आधीच ते पाऊल पूर्ण केले आहे आणि पश्चात्ताप करणाऱ्याला पाचारण देतो की त्यांनी त्याला विश्वासाने स्वीकार करावे.
English
तारणाप्रत जाणारी कोणती पावले आहेत?