settings icon
share icon
प्रश्नः

बायबल वाचन सुरू करण्यासाठी चांगली जागा कोणती आहे?

उत्तरः


प्रारंभ करणार्‍याना हे लक्षात घेणे आवश्यक आहे की बायबल हे सर्वसाधारण पुस्तक नाही जे एका आवरणापासून दुसर्यापर्यंत भरभर वाचावे. हे 1,500 वर्षांहून अधिक समयांत कित्येक भाषांमध्ये वेगवेगळ्या लेखकांनी लिहिलेल्या पुस्तकांचे वाचनालय किंवा संकलन आहे. मार्टिन लूथर म्हणाले की बायबल हे “ख्रिस्ताचा पाळणा” आहे कारण बायबलमधील सर्व इतिहास व भविष्यवाण्या शेवटी येशूकडे अंगुलीनिर्देश करतात. म्हणूनच, बायबलचे कोणतेही पहिले वाचन कदाचित शुभवर्तमानांमधूनच झाले पाहिजे. मार्कचे शुभवर्तमान जलद आणि वेगवान आहे आणि प्रारंभ करण्यासाठी चांगली जागा आहे. मग कदाचित तुम्हाला योहानाच्या सुवार्तेकडे जाण्याची इच्छा असू शकेल जी गोष्टींवर लक्ष केंद्रित करते ज्याचा येशूने स्वतःविषयी दावा केला. येशूने काय केले याबद्दल मार्क सांगतो तर योहान येशू काय म्हणाला आणि येशू कोण होता याबद्दल सांगतो. योहानाच्या शुभवर्तमानात काही सोपे आणि सुस्पष्ट परिच्छेद आहेत, परंतु काही गहन आणि गंभीर परिच्छेद देखील आहेत. शुभवर्तमानाचे वाचन (मत्तय, मार्क, लूक आणि योहान) आपल्याला ख्रिस्ताचे जीवन आणि सेवेशी परिचित करेल.

त्यानंतर, काही पत्रे वाचा (उदा. इफिस, फिलिप्पै, 1 योहान). ही पुस्तके आपल्याला शिकवतात की जी देवाचा आदर करणारे जीवन कसे जगावे. जेव्हा आपण जुना करार वाचण्यास प्रारंभ करता तेव्हा उत्पत्तिचे पुस्तक वाचा. हे आपल्याला सांगते की देवाने जगाची निर्मिती कशी केली आणि मानवजात पापात कशी पडली, तसेच त्या पतनाचा जगावर काय परिणाम झाला. निर्गम, लेवीय, गणना आणि अनुवाद वाचणे कठीण आहे कारण ते सर्व नियमांविषयी सांगतात ज्यांचे पालन करणे यहूदी लोकांस अगत्याचे होते. आपण ही पुस्तके टाळू नयेत तरी ती नंतरच्या अभ्यासासाठी ठेवलेली बरी. काहीही झाले तरी त्यांच्यात अडकून न पडण्याचा प्रयत्न करा. इस्राएलचा चांगला इतिहास जाणून घेण्यासाठी यहोशवा ते इतिहास वाचा. स्तोत्रसंहिता ते शलमोनाने लिहिलेले गीतरत्न वाचल्यामुळे आपल्याला इब्री कविता आणि बौद्धिक ग्रंथांविषयी उत्तम माहिती मिळेल. यशया ते मलाखीपर्यंत भविष्यवाणीची पुस्तके देखील समजणे कठीण असू शकते. लक्षात ठेवा, बायबल समजून घेण्याची गुरुकिल्ली देवाकडे बुद्धिमत्तेची मागणी करणे आहे (याकोब 1:5). देव बायबलचा लेखक आहे आणि आपण त्याचे वचन समजावे अशी त्याची इच्छा आहे.

आपण खात्री बाळगू शकता की देव आणि त्याचे वचन जाणून घेण्याच्या आपल्या प्रयत्नांना देव आशीर्वाद देईल, आपण ते कोठे प्रारंभ करता आणि आपली अभ्यासाची पद्धत कोणती आहे ते महत्वाचे नाही. आम्हाला देवाच्या वचनाची गरज आहे: “मनुष्य केवळ भाकरीने नव्हे, तर परमेश्वराच्या मुखातून निघणाघर््या वचनाने जगेल,’ असा शास्त्रलेख आहे” (मत्तय 4:4). देवाचे वचन “परिपूर्ण आहे, मनाचे पुनरुज्जीवन करते...विश्वसनीय भोळ्यांना समंजस करतो...सरळ, हृदयाला आनंदित करतात...चोख,नेत्रांना प्रकाश देते...शुद्ध आहे, सर्वकाळ टिकणारे...सत्य, सर्वथैव न्याय्य...सोन्यापेक्षा...इष्ट...मधापेक्षा, गोड आहेत” (स्तोत्र 19:7-11). देवाचे वचन सत्य आहे आणि सत्य आपणास बंधमुक्त करील (योहान 17:17).

English
मराठीच्या पहिल्या पानावर वापस या

बायबल वाचन सुरू करण्यासाठी चांगली जागा कोणती आहे?
© Copyright Got Questions Ministries