settings icon
share icon
प्रश्नः

आपल्याला सक्रियपणे जोडीदाराला शोधण्याची गरज आहे काय, किंवा देव आपल्यापाशी योग्य जोडीदाराला घेऊन येण्याची वाट बघितली पाहिजे काय?

उत्तरः


दोन्ही प्रश्नांचे उत्तर “होय” असे आहे. त्या दोन्हींमध्ये एक महत्वाचा समतोल आहे. आपण अगदी वेडेपिसे होऊन जोडीदाराचा शोध घेणे गरजेचे नाही जसे की हे पूर्णपणे आपल्या स्वतःच्या प्रयत्नांवर अवलंबून आहे. देव एक दिवस आपल्या होणाऱ्या जोडीदाराला आपल्या दरवाजाजवळ घेऊन येईल असा विचार करत आपण निष्क्रिय सुद्धा असू नये. एक ख्रिस्ती म्हणून एकदा का आपण ठरवले की आता जोडीदाराला शोधण्याची ही योग्य वेळ आहे, तेंव्हा त्या प्रक्रियेची सुरवात आपण प्रार्थनेने केली पाहिजे. आपल्या जीवनासाठी देवाच्या असणाऱ्या इच्छेनुसार स्वतःला वचनबद्ध करणे हे पहिले पाऊल आहे. “परमेश्वराच्या ठायी तुला आनंद होऊ दे, म्हणजे तो तुझे मनोरथ पूर्ण करील” (स्तोत्र 37:4). परमेश्वरामध्ये सुखावणे म्हणजे आपल्याला त्याला जाणण्यात आनंद होतो आणि आपण हा विश्वास ठेवतो की त्याच्या बदल्यात तो आपल्याला आनंद देईल. जोडीदाराला शोधण्याच्या संदर्भात, तो आपल्या मनामध्ये त्याच्या इच्छा घालतो, त्याचा अर्थ असा की, आपल्यासाठी ज्या प्रकारच्या जोडीदाराची त्याची इच्छा आहे तशी इच्छा आपण स्वतः करतो आणि त्याला हे ठाऊक आहे की पुढे यामुळे आपल्याला आनंद होईल. नितीसुत्रे 3:6 आपल्याला सांगते की, “तु आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल.” जोडीदाराला शोधताना त्याचा आदर करणे म्हणजे त्याच्या सार्वभौम इच्छेला समर्पित होणे आणि त्याला असे सांगणे की तो जे काही निर्णय घेईल तो तुम्हाला हवे असलेल्यांमध्ये सर्वोत्तम आहे.

स्वतःला देवाच्या इच्छेशी वचनबद्ध केल्यानंतर, आपण दैवी पती किंवा दैवी पत्नी यांच्या गुणांबद्दल स्पष्ट असणे गरजेचे आहे आणि अशा एकाचा शोध घेत राहिले पाहिजे जो आत्मिक स्तरावर पात्र असेल. पहिल्यांदा या गुणांबद्दल स्पष्ट समज असणे महत्वाचे आहे, आणि मग जो त्यामध्ये व्यवस्थित बसेल अशाचा शोध घेतला पाहिजे. एखाद्याच्या “प्रेमात पडणे” आणि नंतर तो/ती अत्मिकरित्या आपला जोडीदार बनण्याच्या पात्र नाही याचा शोध घेणे म्हणजे हृदय यातनांना आमंत्रण देणे आणि स्वतःला अतिशय अवघड परिस्थितीमध्ये टाकण्यासारखे आहे.

आपण ज्याचा शोध घेत आहोत त्याबद्दल पवित्र शास्त्र काय सांगते हे एकदा आपल्याला कळल्यानंतर, आपण सक्रियपणे जोडीदाराचा शोध घेण्यास सुरवात हे समजून करू शकतो की, जसे आपण जोडीदार शोधण्याच्या प्रक्रियेमध्ये आहोत तर देव तिला/त्याला त्याच्या परिपूर्ण इच्छा आणि वेळेनुसार आपल्या जीवनामध्ये घेऊन येईल. जर आपण प्रार्थना केली, तर देव आपल्याला अशा व्यक्तीपर्यंत घेऊन जाईल जिला त्याने आपल्याल्साठी निवडले आहे. जर आपण देवाची योग्य वेळ येण्याची वाट बघत राहिलो, तर आपल्याला आपल्या पार्श्वभूमीशी, व्यक्तिमत्वाशी आणि इच्छांशी उत्तमप्रकारे मेळ खाणाऱ्या जोडीदाराला दिले जाईल. जरी त्याची योग्य वेळ आपल्या वेळेशी मिळत नसली तरीही आपल्याला त्याच्यावर आणि त्याच्या वेळेवर विश्वास ठेवणे गरजेचे आहे (नितीसुत्रे 3:5). काहीवेळेस देव लोकांचे पाचारण कधीही लग्न न करण्यासाठी करतो (1 करिंथ 7), परंतु अशा परिस्थितीमध्ये, तो लग्नाच्या इच्छांना आपल्यामधून काढून हे स्पष्ट करतो. देवाची वेळ ही परिपूर्ण आहे, आणि विश्वास आणि संयम यासहीत, आपण त्याच्या अभिवचनांना प्राप्त करू शकतो (इब्री 6:12).

Englishमराठीच्या पहिल्या पानावर वापस या

आपल्याला सक्रियपणे जोडीदाराला शोधण्याची गरज आहे काय, किंवा देव आपल्यापाशी योग्य जोडीदाराला घेऊन येण्याची वाट बघितली पाहिजे काय?
© Copyright Got Questions Ministries