आध्यात्मिक वाढ काय आहे?


प्रश्नः आध्यात्मिक वाढ काय आहे?

उत्तरः
आध्यात्मिक वाढ ही येशू ख्रिस्तासारखे अधिकाधिक होत जाण्याची प्रक्रिया आहे. जेव्हा आम्ही येशूवर विश्वास ठेवितो, तेव्हा पवित्र आत्मा आम्हाला त्यासारखे अधिकाधिक बनविण्याची, आम्हास त्याच्या प्रतिरूपात घडविण्याची प्रक्रिया सुरू करतो. आध्यात्मिक वाढीचे उत्तम वर्णन कदाचित पेत्राचे 2 रे पत्र 1:3-8 मध्ये करण्यात आले आहे, जे आम्हास सांगते की देवाच्या सामर्थ्याने नीतिमान जीवन जगण्यासाठी, जे आमच्या आध्यात्मिक वाढीचे ध्येय आहे, "आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी" आमच्याजवळ आहेत. लक्षात ठेवा की ज्याची आम्हास गरज आहे ते "त्याच्या ओळखीच्या द्वारे" आम्हास प्राप्त होते, जी आम्हास आवश्यक असलेली प्रत्येक गोष्ट प्राप्त करण्याची किल्ली आहे. त्याच्याविषयीचे आमचे ज्ञान त्या वचनापासून येते, जे आमच्या प्रगतीसाठी आणि आमच्या वाढीसाठी आम्हास देण्यात आले आहे.

गलतीकरांस पत्र 5:19-23 यांत दोन याद्या आहेत. 19-21 वचनांत "देहाची कर्मे" यादीबद्ध करण्यात आली आहेत. ह्या गोष्टी तारणासाठी ख्रिस्ताजवळ येण्यापूर्वी आमच्या ठायी दिसून येत होत्या. देहाची कर्मे ती कार्ये आहेत जी आम्हास कबूल करावयाची आहेत, त्यांच्याबद्दल पश्चाताप करावयाचा आहे, आणि, देवाच्या मदतीने, त्याच्यावर विजय मिळवावयाचा आहे. जेव्हा आम्ही आध्यात्मिक वाढीचा अनुभव घेऊ, तेव्हा कमीत कमी "देहाची कर्मे" आमच्या जीवनांत दिसून येतील. दुसरी यादी "आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारे फळ" आहे (वचने 22-23). आता आम्ही येशू ख्रिस्ताठायी तारणाचा अनुभव घेतला आहे म्हणून ही आमच्या जीवनाची वैशिष्ट्ये असली पाहिजेत. आध्यात्मिक वाढ ही विश्वासणार्याच्या जीवनात वाढत्या प्रमाणात प्रकट होणा्या आत्म्याच्या फळाद्वारे दिसून येते.

जेव्हा तारणाचा बदल घडून येतो, तेव्हा आध्यात्मिक वाढीस सुरूवात होते. पवित्र आत्मा आमच्या ठायी वस्ती करतो (योहान 14:16-17). आम्ही ख्रिस्ताठायी नवीन उत्पत्ती आहोत (करिंथकरांस 2रे पत्र 5:17). जुन्या, पापमय स्वभावाची जागा नवीन, ख्रिस्तासमान स्वभाव घेऊ लागतो (रोमकरांस पत्र 6-7). आध्यात्मिक वाढ ही आजीवन प्रक्रिया आहे जी आमच्या अभ्यासावर आणि देवाच्या वचनाच्या लागूकरणावर (तीमथ्यास 2रे पत्र 3:16-17) आणि आणि पवित्र आत्म्यात आमच्या चालीवर अवलंबून आहे (गलतीकरांस पत्र 5:16-26). जेव्हा आम्ही आध्यात्मिक वाढीचा शोध घेत असतो, तेव्हा आम्हास त्या गोष्टींबाबत देवाजवळ प्रार्थना केली पाहिजे आणि बुद्धी मागितली पाहिजे ज्यांत आमची वाढ व्हावी अशी त्याची इच्छा आहे. आम्ही देवाजवळ विनंती करू शकतो की त्याने आमचा विश्वास आणि त्याच्या विषयीच्या ज्ञानात आमची वाढ करावी. आमची आध्यात्मिकरित्या वाढ व्हावी अशी देवाची इच्छा आहे, आणि आध्यात्मिक वाढीचा अनुभव करण्यासाठी आम्हास ज्या गोष्टींची गरज आहे ते सर्व त्याने आम्हास दिले आहे. पवित्र आत्म्याच्या मदतीने, आपण पापावर विजय मिळवू शकतो आणि स्थिरपणे आमचा तारणकर्ता, प्रभु येशू ख्रिस्त याच्यासारखे अधिकाधिक बनू शकतो.

English
मराठीच्या पहिल्या पानावर वापस या
आध्यात्मिक वाढ काय आहे?