प्रश्नः
देव आत्मिक कृपादाने कशा वितरीत करतो? मी मागितलेले आत्मिक कृपादान देव मला देईल काय?
उत्तरः
रोम 12:3-8 आणि 1 करिंथ अध्याय 12 हे स्पष्ट करते की प्रत्येक खिस्ती व्यक्तीला प्रभूच्या निवडीनुसार आत्मिक कृपादाने दिली जातात. ख्रिस्ताच्या देहाच्या म्हणजे मंडळीच्या वाढीसाठी आत्मिक कृपादाने दिल्या जातात (1 करिंथ 12:7, 14:12). ही कृपादाने देण्याच्या अचूक वेळेचा उल्लेख केलेला नाही. बहुतेक असे गृहीत धरते की आत्मिक जन्माच्या वेळी आत्मिक कृपादाने दिली जातात (तारणाच्या क्षणी). तथापि, अशी काही वचने आहेत जी सूचित करतात की देव नंतर देखील आत्मिक कृपादाने देतो. 1 तीमथ्य 4:14 आणि 2 तीमथ्य 1:6 या पत्रांत तीमथ्याला त्याच्या नियुक्तिच्या वेळी “भविष्यवाणीद्वारे” मिळालेल्या कृपादानाचा उल्लेख आहे. याचा अर्थ असा होतो की तीमथ्याच्या नियुक्तिच्या वेळी वडिलांपैकी एक आत्मिक कृपादानाविषयी बोलला जे तीमथ्याला त्याच्या भावी सेवाकार्यासाठी सक्षम करणार होते.
आम्हाला 1 करिंथ. 12:28-31 आणि 1 करिंथ 14:12-13 मध्ये सांगितले आहे की देव (आपण नाही) कृपादाने निवडतो. या परिच्छेदांमधून हे देखील सूचित होते की प्रत्येकाला विशिष्ट कृपादान दिले जाणार नाही. पौलाने करिंथच्या विश्वासणार्यांना सांगितले की जर ते आत्मिक कृपादानांची अभिलाषा किंवा इच्छा धरतील, तर त्यांनी अधिक प्रगती करणाऱ्या कृपादानांसाठी प्रयत्न केला पाहिजे, जसे भविष्यवाणी करणे (इतरांची प्रगती व्हावी म्हणून देवाच्या वचनाचा संदेश देणे). आता, पौलाने त्यांना “मोठ्या” कृपादानांची अभिलाषा धरण्यास का सांगितलेे, जर त्यांना आधीच या गोष्टी देण्यात आल्या होत्या, आणि ही मोठी कृपादाने मिळवण्याची आणखी संधी नव्हती? एखाद्याचा असा विश्वास असू शकेल की जसे शलमोनाने देवाच्या लोकांवर राज्य करण्यासाठी बुद्धीची मागणी केली, तसाच आपल्या मंडळीला अधिक फायदा व्हावा म्हणून देव आपल्याला ती कृपादाने देईल.
असे म्हटल्यानंतर, अजूनही ही कृपादाने आपल्या स्वतःच्या नव्हे तर देवाच्या निवडीनुसार वितरित केली जातात. जर प्रत्येक करिंथकरास भविष्य सांगण्यासारख्या एखाद्या विशिष्ट कृपादानाची इच्छा असेल तर देव त्या प्रत्येकाला त्यांची इच्छा असल्यामुळे केवळ ते देणार नाही. जर त्याने तसे केले असते तर ख्रिस्ताच्या देहाच्या इतर सर्व कामांमध्ये कोण सेवा दिली असती?
येथे एक गोष्ट अत्यंत स्पष्ट आहे - देवाची आज्ञा ही देवाची क्षमता आहे. जर देवाने आम्हाला काहीतरी करण्याची आज्ञा दिली असेल (जसे की साक्ष, अशा लोकांवर प्रेम करणे जे प्रेमास पात्र नाहीत, राष्ट्रांना शिष्य बनविणे इ.), तर तो आपल्याला ते करण्यास सक्षम करेल. काहीजण इतरांसारखे सुवार्तिक म्हणून कृपादान प्राप्त झालेले नसतील, परंतु देव सर्व ख्रिस्ती विश्वासणार्यांना साक्ष देण्याची व शिष्य होण्याची आज्ञा देतो (मत्तय 28:18-20; प्रे. कृत्ये 1:8). आपल्या सर्वांना सुवार्ता सांगण्यासाठी पाचारण करण्यात आले आहे, मग आम्हास ते आत्मिक कृपादान लाभले असो किंवा नसो. वचन शिकण्याचा आणि त्याची शिकवण्याची क्षमता विकसित करण्याचा प्रयत्न करणारा एक दृढ ख्रिस्ती, शिकविण्याचे आत्मिक कृपादान असलेल्यांपेक्षा, पण त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्यापेक्षा श्रेष्ठ शिक्षक होऊ शकतो.
जेव्हा आपण ख्रिस्ताला स्वीकारतो तेव्हा आपल्याला आत्मिक कृपादाने दिली जातात का, किंवा देवाबरोबर चालत असताना ती आमच्यात रोपली जातात? उत्तर दोन्ही आहे. सामान्यतः तारणाच्या वेळी आत्मिक कृपादाने दिली जातात, परंतु आत्मिक वाढीद्वारेही त्यांचा विकास करणे आवश्यक आहे. आपल्या अंतःकरणातील इच्छेचा पाठपुरावा करून आपल्या आत्मिक कृपादानाचा विकास होऊ शकतो का? आपण विशिष्ट आत्मिक कृपादाने मागू शकता का? 1 करिंथ. 12:31 हे असे दर्शवित असल्याचे वाटते की, हंे शक्य आहे: “श्रेष्ठ कृपादानांची उत्कंठा बाळगणे.” आपण देवाकडून आत्मिक कृपादान मागू शकता आणि त्याचा विकास करण्याचा प्रयत्न करून त्याविषयी उत्साही होऊ शकता. त्याचवेळी, जर ती परमेश्वराची इच्छा नसेल तर आपण त्यास कितीही आग्रहाने ते मागितले तरी आपणास एखादे विशिष्ट आत्मिक कृपादान मिळणार नाही. देव अत्यंत बुद्धिमान आहे, आणि त्याच्या राज्यासाठी कोणती कृपादाने सर्वात फलदायी ठरतील हे त्याला ठाऊक आहे.
एखादे कृपादान किंवा दुसरे कृपादान आम्हाला कितीही प्रमाणात दिले गेले असेल हे महत्त्वाचे नाही, परंतु आपल्या सर्वांना आत्मिक कृपादानांच्या याद्यांमध्ये उल्लेखित असंख्य क्षेत्रांत प्रगती करण्यासाठी पाचारण करण्यात आले आहे: आदरातिथ्य करणे, दया दाखवणे, एकमेकांची सेवा करणे, सुवार्ता सांगणे, इत्यादी. जेव्हा आपण त्याच्या गौरवासाठी इतरांची प्रगती करण्याच्या हेतूने प्रेमापोटी देवाची सेवा करण्याचा प्रयत्न करू, तेव्हा तो आपल्या नावाचे गौरव करेल, त्याची मंडळी वाढवेल आणि आपल्याला प्रतिफळ देईल (1 करिंथ. 3:5-8, 12:31-14:1). देव अभिवचन देतो की जेव्हा आपण त्याला आपल्या आनंदाचे कारण बनवू, तेव्हा तो आपल्या अंतःकरणाच्या इच्छा पूर्ण करील (स्तोत्र 37:4-5). यामध्ये त्याची सेवा अशाप्रकारे करण्यास आम्हास तयार करणे समाविष्ट असेल ज्याद्वारे आम्हाला हेतू आणि समाधान प्राप्त होईल.
English
देव आत्मिक कृपादाने कशा वितरीत करतो? मी मागितलेले आत्मिक कृपादान देव मला देईल काय?