settings icon
share icon
प्रश्नः

उत्पाती 6:1-4 मध्ये देवाचे पुत्र आणि मनुष्यांच्या कन्या कोण होते?

उत्तरः


उत्पती 6:1-4 चा संदर्भ देवाचे पुत्र आणि मनुष्यांच्या कन्या ह्यांच्याशी आहे. तेथे अश्या अनेक सूचना आहेत की देवाचे पुत्र कोण होते आणि मनुष्यांच्या कन्यांपासून त्यांना जी लेकेरे झाली त्यांची वाढ का एका महाकायांच्या एका वंशात झाली. (नफिली हा शब्द तसेच काही दर्शवितो असे दिसून येते).

देवाच्या पुत्रांची ओळख हयाविषयी तीन प्राथमिक दृष्टीकोण असे आहे, 1) ते पतन पावलेले देवदूत होते, 2) ते शक्तीशाली मानवी शासक होते, किवा 3) ते शेथ ह्याचे धार्मिक वृत्तीचे वंशज होते ज्यांनी काइनाच्या दुष्ट वृत्तीच्या वंशजासोबत आंतरवंशीय विवाह केले. पहिल्या सिद्धांताला महत्व दिले तर हे सत्य आहे की जुन्या करारात 'देवाचे पुत्र' ह्या वाक्यांशाचा संदर्भ नेहमी देवदुतांशीच आहे. परंतु ह्या सिद्धांतासोबत संभावणीय समसया मत्तय 22:30 मध्ये आहे जी दर्शविते की देवदूत लग्न करीत नाही. पवित्र शास्त्र असा विश्वास ठेवण्यासाठी कोणतेही कारण देत नाही की देवदूताना लिंग आहे किवा ते पुन्हा प्रजनन करू शकतात. इतर दोन दृष्टीकोनात ही समस्या उपस्थित नाही.

2) आणि 3) दृष्टीकोणांची कमजोर बाब ही आहे की, सामान्य मानवी पुरुष सामान्य मानवी स्त्रियांसोबत लग्न करून समाधानकारकपणे स्पष्टीकरण देवू शकत नाही की का त्यांची संताने "महाकाय" किवा "प्राचीन काळचे महावीर, नामांकित पुरुष" होते. ह्याशिवाय देवाने पृथ्वीवर प्रलय आणण्याचा निर्णय का घेतला (उत्पत्ति 6:5-7) जेव्हा देवाने कधीही शक्तीशाली मानवी पुरूषांना किवा शेथच्या वंशजांना सामान्य मानवी स्त्रियांशी किवा काइनाच्या वंशजाशी लग्न करण्यास मना केले नाही? उत्पत्ति 6:5-7 चा येणारा न्याय उत्पत्ति 6:1-4 मध्ये जे घडले हयासोबत जोडला गेला आहे. केवळ पतन पावलेल्या देवदूतांचे मानवी स्त्रियांसोबत केलेले अश्लील व विकृत विवाह अशा कठोर न्यायाचे समर्थन करू शकतात असे दिसून येते.

अगोदर नमूद केल्याप्रमाणे पहिल्या दृष्टीकोणाची कमजोर बाब ती आहे जी मत्तय 22:30 जाहिर करते, "कारण पुनरुत्थान झाल्यावर ते लग्न करून घेत नाहीत व त्या लग्नात दिल्या जात नाहीत; तर स्वर्गातील देवदूतांप्रमाणे असतात". तथापि पवित्र शास्त्र असे म्हणत नाही की "देवदूत लग्न करू शकत नाही". खरे म्हणजे देवदूत लग्न करीत नाहीत असे ते केवळ दर्शविते. दुसरे असे की मत्तय 22:30 चा संदर्भ स्वर्गातील देवदूतांशी" आहे. त्याचा संदर्भ पतन पावलेल्या देवदूतांशी नाही जे देवाच्या निर्मितीच्या आज्ञेची पर्वा करीत नाहीत आणि देवाची योजना मोडण्यासाठी सक्रियपणे मार्ग शोधतात. सत्यस्थिति ही आहे की, देवाचे पवित्र देवदूत लग्न करीत नाहीत किवा लैंगिक संबंधात गुंतत नाहीत परंतु याचा अर्थ असा नाही की सैतान आणि त्याच्या भूतांच्या बाबत ही गोष्ट खरी आहे.

दृष्टीकोण 1) सर्वात जास्त शक्यतेची स्थिति आहे. होय असे म्हणणे एक मनोरंजक 'खंडन' (खोटे आहे असे प्रतिपादन) आहे की देवदूताना लिंग नाही आणि नंतर असे म्हणणे की पतन पावलेले देवदूत ज्यांनी मानवी स्त्रियांसोबत अपत्यांना जन्म दिला ते "देवाचे पुत्र" होते. तथापि जारी देवदूत आत्मिक स्वरुपात आहेत (इब्री 1:14) तरी ते मानवी शररिक स्वरुपात दिसू शकतात (मार्क 16:5). लोटासोबत जे दोन देवदूत होते त्यांच्याशी समागम करण्याची सदोम आणि गमोरा येथील माणसांची इच्छा होती (उत्पत्ति 19:1-5). हे दिसावयास वाजवी आहे की मानवी कामुक्तेची प्रतिकृती तयार करण्याच्या क्षणापर्यंत सुद्धा आणि शक्यतो नवीन पैदास करण्यापर्यन्त सुद्धा देवदूत मानवी स्वरूप घेण्यासाठी समर्थ आहेत. मग पतन पावलेले देवदूत हे कृत्य वारंवार का करणार नाही? असे दिसून येते की, देवाने त्या पतन पावलेल्या देवदुतांना बंदिस्त केले ज्यांनी असे दुष्ट पाप केले, जेणेकरून इतर पतन पावलेले देवदूत तसेच कृत्य करू शकणार नाही (जसे यहुदाचे पत्र वचन 6 मध्ये वर्णन केलेले आहे). उत्पत्ति 6:1-4मध्ये नमूद केल्याप्रमाणे पतन पावलेले देवदूत हे "देवाचे पुत्र " आहेत असा दृष्टीकोण उचलून धरण्यात आरंभीचे इब्री विद्वान आणि संशयास्पद व पवित्र शास्त्रातील पात्रांशी चुकीचे संबंध जोडण्याविषयक केलेले लिखाण अनेक आहेत, ह्यामुळे कोणत्याही अर्थाने ही चर्चा बंद होत नाही. तथापि उत्पत्ति 6:1-4 ह्या दृष्टीकोणातून पतन पावलेल्या देवदूतांचे मानवी स्त्रियांसोबत गुंतून राहणे ह्याला एक भक्कम संदर्भासंबंधी, व्याकरण विषयक आणि इतिहास विषयक आधार आहे.

Englishमराठीच्या पहिल्या पानावर वापस या

उत्पाती 6:1-4 मध्ये देवाचे पुत्र आणि मनुष्यांच्या कन्या कोण होते?
© Copyright Got Questions Ministries