settings icon
share icon
प्रश्नः

इतके धर्म का आहेत? सर्व धर्म देवाकडे नेतात का?

उत्तरः


बर्‍याच धर्माचे अस्तित्व आणि सर्वच धर्म निर्विवादपणे देवाकडे नेतात असा दावा केल्याने बरेच लोक गोंधळात पडतात जे देवाविषयीचे सत्य शोधत आहेत आणि याचा शेवटचा परिणाम कधीकधी या विषयावरील परिपूर्ण सत्यापर्यंत पोहोचेपर्यंत निराशा होते. किंवा ते सार्वभौमत्ववादी दावा स्वीकारतात की सर्व धर्म देवाकडे घेऊन जातात. अर्थात, संशयवादी पुष्कळ धर्मांच्या अस्तित्वाकडे देखील असे दर्शवित आहेत की एकतर तुम्ही देवाला ओळखू शकत नाही किंवा देव अस्तित्वात नाही.

रोमकरांस पत्र 1:19-21 मध्ये असे बरेच धर्म का आहेत याबद्दल पवित्र शास्त्रासंबंधी स्पष्टीकरण दिले आहे. देवाबद्दलचे सत्य प्रत्येक मनुष्याने पाहिले आणि जाणले आहे कारण देवाने त्याला तसे बनवले आहे. देवाबद्दलचे सत्य स्वीकारण्याऐवजी आणि त्याच्या अधीन होण्याऐवजी बहुतेक मनुष्य ते नाकारतात आणि देवाला समजून घेण्यासाठी स्वतःचा मार्ग शोधतात. परंतु हे देवाविषयीच्या ज्ञानाकाडे नाही तर निरर्थक विचारांकडे घेऊन जाते. येथेच आपल्याला "बर्‍याच धर्मांचे" आधार सापडतात.

चांगुलपणा आणि नैतिकतेची मागणी करणाऱ्या देवावर बरेच लोक विश्वास ठेवू इच्छित नाहीत, म्हणून ते अशा देवाची उपासना करतात ज्याच्या अशा प्रकारच्या गरजा नाहीत. बरेच लोक अशा देवावर विश्वास ठेवू इच्छित नाहीत की जो स्वर्गात जाण्यासाठी स्वत: चा मार्ग कमावणे अशक्य आहे असे घोषित करतो. म्हणून त्यांनी अशा देवाचा अविष्कार केला की जो लोकांना स्वर्गात स्वीकारतो जरी त्यांनी काही विशिष्ट चरणे पूर्ण केले असतील, काही नियम पाळले असतील आणि / किंवा काही कायद्यांचे पालन केले असेल किमान त्यांच्या क्षमतेनुसार. अनेक लोक अशा देवाशी संबंध ठेऊ इच्छित नाहीत जो सार्वभौम आणि सर्वशक्तिमानआहे. म्हणून ते देवाची कल्पना एक वैयक्तिक आणि सार्वभौम शासकाच्या तुलनेत रहस्यमय शक्ती असल्यासारखे करतात.

बर्‍याच धर्माचे अस्तित्व हे देवाच्या अस्तित्वाविरुद्ध वाद किंवा देवाबद्दलचे सत्य स्पष्ट नाही असा युक्तिवाद नाही. त्याऐवजी, बर्‍याच धर्मांचे अस्तित्व म्हणजे मानवतेने एकाखऱ्या देवाला नकार दर्शविणे आहे. मानवजातीने त्याच्या ऐवजी अश्या देवतांना निर्माण केले आहे जे त्यांच्या आवडीनुसार अधिक आहेत. हा धोकादायक उपक्रम आहे. आपल्या स्वरुपात देवाला पुन्हा बनविण्याची इच्छा आपल्यातील पापी स्वभावापासून येते – ही एक अशी प्रकृती आहे जी शेवटी "विनाशाची कापणी करेल" (गलतीकरांस पत्र 6:7-8).

सर्व धर्म देवाकडे नेतात का? नाही. सर्व लोक – धार्मिक किंवा अन्य – कोणत्यातरी दिवशी देवासमोर उभे राहतील (इब्रीलोकांस पत्र 9:27), पण धार्मिक संलग्नता आपल्या चिरंतन नशीबला निर्धारित करत नाही. फक्त येशू ख्रिस्तावरील विश्वासच वाचवेल. “ ज्याला तो पुत्र लाभला आहे त्याला जीवन लाभले आहे; ज्याला देवाचा पुत्र लाभला नाही त्याला जीवन लाभले नाही.” (योहानाला पहिले पत्र 5:12). हे इतके सोपे आहे. केवळ ख्रिस्तीत्व - येशू ख्रिस्ताचे मरण आणि पुनरुत्थान वर विश्वास – हे देवाची क्षमा आणि अनंतकाळच्या जीवनाकडे घेऊन जाते. पुत्राशिवाय कोणीही पित्याकडे येऊ शकत नाही (योहान 14:6). याचा आपला जो विश्वास आहे त्यावर फरक पडतो. येशू ख्रिस्ताविषयीचे सत्य स्वीकारण्याचा निर्णय घेणे महत्त्वाचे आहे. अनंतकाळ चुकण्यासाठी एक भयानक काळ आहे.

Englishमराठीच्या पहिल्या पानावर वापस या

इतके धर्म का आहेत? सर्व धर्म देवाकडे नेतात का?
© Copyright Got Questions Ministries