धूम्रपानाविषयी ख्रिस्ती मत काय आहे? धूम्रपान करणे चुकीचे का आहे?


प्रश्नः धूम्रपानाविषयी ख्रिस्ती मत काय आहे? धूम्रपान करणे चुकीचे का आहे?

उत्तरः
बायबल कधीही धूम्रपानाचा प्रत्यक्ष उल्लेख करीत नाही. परंतु काही सिद्धांत आहेत जे निश्चितपणे धूम्रपानास लागू पडतात. पहिले म्हणजे, बायबल आज्ञा देते की आम्ही आपल्या शरीरांवर कुठल्याही गोष्टींचे "प्रभुत्व" होऊ देता कामा नये. "सर्व गोष्टींची मला मोकळीक आहे — तरी सर्व गोष्टी हितकारक असतातच असे नाही. सर्व गोष्टींची मोकळीक आहे — तरी मी कोणत्याही गोष्टीच्या आहारी जाणार नाही" (करिंथकरांस 1 ले पत्र 6:12). हे नाकारता येत नाही की धूम्रपान हे अत्यंत व्यसनकारी आहे. नंतर आम्हाला याच परिच्छेदात सांगण्यात आले आहे, "तुमचे शरीर तुम्हामध्ये वसणारा, जो पवित्र आत्मा, देवापासून मिळाला आहे त्याचे मंदिर आहे हे तुम्हाला ठाऊक नाही काय? आणि तुम्ही स्वतःचे मालक नाही, कारण तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहा. म्हणून आपल्या शरीराने देवाचे गौरव करा" (करिंथकरांस 1 ले पत्र 6:19-20). यात शंका नाही की धूम्रपान आपल्या आरोग्यासाठी फार हानीकारक आहे. हे सिद्ध झाले आहे की धूम्रपानामुळे फुफ्फुस व हृदयास इजा पोहोचते.

धूम्रपानास "लाभदायक" मानता येते काय (करिंथकरांस 1 ले पत्र 6:12)? असे म्हणता येते का की धूम्रपानाद्वारे खरोखर आपल्या शरीराद्वारे देवाचे गौरव करणे होय (करिंथकरांस 1 ले पत्र 6:20)? व्यक्ती प्रामाणिकपणे "देवाच्या गौरवासाठी" धूम्रपान करू शकतो काय (करिंथकरांस 1 ले पत्र 10:31)? आमचा विश्वास आहे की ह्या तिन्ही प्रश्नांचे उत्तर निश्चितपणे "नाही" असे आहे. परिणामतः, आमचा असा विश्वास आहे की धूम्रपान हे पाप होय आणि म्हणून येशू ख्रिस्ताच्या अनुयायांनी त्याचा उपयोग करता कामा नये.

काही जण हे तथ्य दाखविण्याद्वारे ह्या मताविरुद्ध वाद घालतील की अनेक लोक आरोग्यास हानीकारक अन्न सेवन करतात, ते सुद्धा तितकेच व्यसनकारी आणि शरीरासाठी वाईट ठरू शकते. याचे उदाहरण म्हणून, काही लोकांस कॉफीची इतकी सवय असते की सकाळी कॉफीचा पहिला प्याला घेतल्यावाचून त्यांना काहीच करता येत नाही. हे जरी खरे असले, तरीही त्यामुळे आपण धूम्रपानास कसे योग्य ठरवू शकतो? आमचा युक्तिवाद हा आहे की ख्रिस्ती लोकांनी खादाडपणा आणि आरोग्यास अतिशय हानीकारक ठरणारे अन्न टाळावे. होय, कधी कधी ख्रिस्ती लोक एका पापाचे खंडन करून आणि दुसर्‍या पापाकडे डोळेझाक करून ढोंग माजवितात, पण, पुन्हा यामुळे धूम्रपान हे देवाचा आदर करणारे ठरू शकत नाही.

धूम्रपानाच्या ह्या मताविरुद्ध दुसरे मत हे आहे की अनेक धार्मिक पुरुष धूम्रपान करीत, जसे की सुप्रसिद्ध ब्रिटिश सुवार्तिक सी. एच. स्पर्जन, जे सिगार फुकत असल्याचे ज्ञात आहे. पुन्हा, ह्या वादास काही महत्व आहे असे आम्ही मानत नाही. आमचा विश्वास आहे की स्पर्जनचे धूम्रपान करणे चूक होते. अन्यथा ते भक्तिमान आणि देवाच्या वचनाचे उत्तम शिक्षक होते काय? अगदी होते! यामुळे त्यांच्या सर्व कार्यांद्वारे आणि सवयींद्वारे देवास गौरव मिळत होता असे आहे काय? नाही.

धूम्रपान हे पाप आहे असे म्हणण्याद्वारे, आम्ही हे म्हणत नाही की सर्वच धूम्रपान करणारे तारण पावलेले नाहीत. येशू ख्रिस्ताठायी विश्वास ठेवणारे अनेक खरे विश्वासणारे आहेत जे धूम्रपान करतात. धूम्रपान व्यक्तीस तारण पावण्यापासून रोखत नाही. त्यामुळे व्यक्तीस आपले तारणही गमवावे लागत नाही. इतर कोणत्याही पापापेक्षा धूम्रपान हे कमी क्षमनीय नाही, मग ते ख्रिस्ती बनणार्‍या व्यक्तीसाठी असो वा देवासमोर आपले पाप कबूल करणार्‍या ख्रिस्ती व्यक्तीसाठी असो (योहानाचे 1 ले पत्र 1:9). त्याचवेळी, आमचा असा दृढ विश्वास आहे की धूम्रपान हे पाप आहे ज्याचा त्याग केला पाहिजे आणि, देवाच्या मदतीने, त्यावर विजय मिळविला पाहिजे.

English
मराठीच्या पहिल्या पानावर वापस या
धूम्रपानाविषयी ख्रिस्ती मत काय आहे? धूम्रपान करणे चुकीचे का आहे?