प्रश्नः
बायबल गुलामगिरीस क्षमा करते काय?
उत्तरः
गुलामगिरीकडे भूतकाळातील एखादी गोष्ट म्हणून पाहण्याची प्रवृत्ती आहे. पण असा अंदाज आहे की आज जगात 270 लाखांपेक्षा अधिक लोक आहेत जे गुलाम म्हणून राबत आहेत: बळजबरीने श्रम करवून घेणे, लैंगिक व्यापार, वारसाने मिळू शकणारी मालमत्ता, इत्यादी. पापाच्या गुलामगिरीतून मुक्त झालेले लोक, येशू ख्रिस्ताचे अनुयायी म्हणून आज जगातील मानव गुलामगिरीचा शेवट करण्याबाबत आम्ही सर्वात मुख्य कैवारी म्हणून उभे ठाकले पाहिजे. तरीही, प्रश्न उठतो की, बायबल गुलामगिरीविरुद्ध ठामपणे का बोलत नाही? खरे म्हणजे, बायबल का म्हणून, मानव गुलामगिरीच्या प्रथेचे समर्थन करीत असल्याचे दिसून येते.
बायबल विशिष्टरित्या गुलामगिरीच्या प्रथेचे खंडन करीत नाही. गुलामांशी कसे वागले पाहिजे याविषयी ते आज्ञा देते (अनुवाद 15:12-15; इफिसकरांस पत्र 6:9; कलस्सैकरांस पत्र 4:1), पण गुलामगिरीचा पूर्णपणे बहिष्कार करीत नाही. अनेक जण यास बायबल गुलामगिरीच्या स्वरूपांस क्षमा करीत असल्याचे समजतात. अनेक जण हे समजत नाहीत की जगाच्या अनेक भागांत मागील काही शतकांत ज्याप्रकारे गुलामांस राबविण्यात येत असे त्यापेक्षा बायबलच्या दिवसांतील गुलामगिरी अत्यंत वेगळी होती. बायबलमधील गुलामगिरी ही केवळ वंशभेदावर आधारित नव्हती. लोक त्यांच्या राष्ट्रीयत्वामुळे अथवा त्यांच्या त्वचेच्या वर्णमुळे गुलाम केले जात नसत. बायबलच्या काळात, गुलामगिरी अर्थशास्त्रावर अधिक आधारित होती, ती सामाजिक प्रतिष्ठेची बाब होती. लोक जेव्हा त्यांचे कर्ज चुकवू शकत नसत अथवा आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करू शकत नसत, तेव्हा ते स्वतःस गुलाम म्हणून विकून टाकत. नव्या करारातील काळांत, कधी कधी डाॅक्टर, वकील, आणि राजकारणी पुढारी देखील आणखी कोणाचे गुलाम असत. काही लोक खरोखर त्यांच्या स्वामींद्वारे सर्व गरजा पुरविल्या जाव्यात म्हणून गुलाम बनण्याची निवड करीत.
मागील काही शतकांतील गुलामगिरी बरेचदा केवळ त्वचेच्या वर्णावर आधारित होती. संयुक्त राष्ट्रात, अनेक काळ्या लोकांस त्यांच्या राष्ट्रीयत्वामुळे गुलाम समजले जाईल; गुलामांच्या अनेक मालकांस असे खरोखर वाटत असे की काळे लोक कनिष्ठ दर्जाचे मानव आहेत. बायबल वशांवर आधारित गुलामगिरीचे खंडन करते आणि शिकविते की सर्व मनुष्यांस देवाने उत्पन्न केले आहे आणि त्याने त्यांस आपल्या स्वरूपात घडविले आहे (उत्पत्ति 1:27). त्याचवेळी, जुना करार अर्थव्यवस्थेवर आधारित गुलामगिरीस परवानगी देत असे व तिचे नियमांकरी. मुख्य समस्या ही आहे की बायबल ज्या गुलामगिरीची मोकळीक देत असे ती गुलामगिरी मागील काही शतकांत आमच्या जगास गांजून सोडणार्या वांशिक गुलामगिरीसमान मुळीच नव्हती.
याशिवाय, जुना करार आणि नवा करार दोन्हीं "मानव-तस्करीच्या," प्रथेचे खंडन करते, जी 19व्या शतकांत आफ्रिकेत घडली. गुलामांचा शोध घेण्यार्यांनी आफ्रिकन लोकांना घेरले, त्यांस गुलामांच्या व्यापार्यांस विकले, जे त्यांस मळ्यांवर आणि शेतांत काम करण्यासाठी नव्या जगात घेऊन आले. ही प्रथा परमेश्वर देवास घृणास्पद वाटते. खरे म्हणजे, मोशेच्या नियमशास्त्रात अशा अपराधाची शिक्षा मृत्यू होती: "एखाद्या मनुष्याला चोरून नेऊन त्याला विकील किंवा चोरलेला त्यांच्यापाशी सापडेल तर त्याला अवश्य जिवे मारावे" (निर्गम 21:16). त्याचप्रमाणे, नव्या करारात, गुलामांच्या व्यापार्यांस "भक्तीहीन व पापी" लोकांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे आणि ते त्याच वर्गात मोडतात ज्यात आपल्या आईबापाचा खून करणारे, मनुष्य हत्या करणारे, व्यभिचारी आणि पुमैथूनी, लबाड व खोटी शपथ वाहणारे यांचा समावेश आहे (तीमथ्याला 1 ले पत्र 1:8-10).
दुसरा महत्वाचा मुद्दा हा आहे की बायबलचा हेतू तारणाच्या मार्गाकडे अंगुलीनिर्देश करणे होय, समाजसुधारणा करणे नव्हे. बायबल बरेचदा समस्यांकडे आतून बाहेर उपाय शोधते. जर व्यक्ती देवाचे तारण प्राप्त करण्याद्वारे देवाच्या प्रीतीचा, दयेचा, आणि कृपेचा अनुभव करीत असेल, तर देव त्याचा प्राण सुधारील, त्याची विचार करण्याची व कार्य करण्याची पद्धत बदलून टाकील. ज्या व्यक्तीने देवाच्या तारणाच्या देणगीचा आणि पापाच्या गुलामगिरीतून मुक्ततेचा अनुभव केला आहे, आणि जेव्हा देव त्याच्या प्राणात सुधारणा घडवून आणतो, तेव्हा त्याला कळून येईल की दुसर्या मानवप्राण्यास गुलाम बनविणे चुकीचे आहे. त्याला, पौलासोबत, हे दिसून येईल की गुलाम हा "प्रभुमधील बंधु" असू शकतो (फिलेमोनाला पत्र 1:16). ज्या इसमाने खरोखर देवाच्या कृपेचा अनुभव घेतला आहे तो त्याऐवजी इतरांशी कृपाळूपणे वागेल. गुलामगिरीचा अंत करण्यासाठी हा बायबलचा उपाय ठरेल.
English
बायबल गुलामगिरीस क्षमा करते काय?