settings icon
share icon
प्रश्नः

अविवाहित ख्रिस्ती राहण्याबद्दल पवित्रशास्त्र काय म्हणते?

उत्तरः


एक ख्रिस्ती विश्वासू अविवाहित राहण्याचा प्रश्न आणि विश्वासणारे जे कधीही लग्न करत नसल्याबद्दल पवित्र शास्त्र काय म्हणते याचा अनेकदा गैरसमज होतो. पौल आपल्याला 1 करिंथ 7:7-8 मध्ये सांगतो: “पण मी जसा आहे तसे सर्व माणसांनी असावे अशी माझी इच्छा आहे; तरी प्रत्येकाला ज्याचे-त्याचे कृपादान देवापासून मिळाले आहे, एकाला एका प्रकारचे व दुसर्‍याला दुसर्‍या प्रकारचे. जे अविवाहित व ज्या विधवा आहेत त्यांना मी म्हणतो की, तुम्ही माझ्यासारखे राहिलात तर ते तुमच्यासाठी बरे.” लक्षात घ्या की तो म्हणतो की काहींना अविवाहित राहण्याची भेट आहे आणि काहींना लग्नाची भेट आहे. जरी असे दिसते की जवळजवळ प्रत्येकजण लग्न करतो, परंतु प्रत्येकासाठी देवाची इच्छा असणे आवश्यक नाही. उदाहरणार्थ, पौलाला विवाह आणि/किंवा कुटुंबासह आलेल्या अतिरिक्त समस्या आणि तणावांबद्दल चिंता करण्याची गरज नव्हती. त्याने आपले संपूर्ण आयुष्य देवाच्या वचनाचा प्रसार करण्यासाठी समर्पित केले. जर त्याचे लग्न झाले असते तर तो इतका उपयुक्त संदेशवाहक बनला नसता.

दुसरीकडे, काही लोक एक जोडपे आणि एक कुटुंब म्हणून देवाची सेवा करत, एक संघ म्हणून चांगले करतात. दोन्ही प्रकारचे लोक तितकेच महत्वाचे आहेत. अगदी आयुष्यभर, अविवाहित राहणे पाप नाही. आयुष्यातील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जोडीदार शोधणे आणि मुले असणे नसून देवाची सेवा करणे हे आहे. आपण आपले पवित्र शास्त्र वाचून आणि प्रार्थना करून स्वतःला देवाच्या वचनावर शिक्षित केले पाहिजे. जर आपण देवाला स्वतःला प्रकट करण्यास सांगितले तर तो उत्तर देईल (मत्तय 7:7), आणि जर आपण त्याला आमची चांगली कामे करण्यासाठी वापरण्यास सांगितले तर तो तेच करेल. “देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे, म्हणून ह्या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वत:चे रूपांतर होऊ द्या” (रोम. 12:2).

एकटेपणाला शाप असे चिन्ह म्हणून पाहिले जाऊ नये कि अविवाहित पुरुष किंवा स्त्रीमध्ये "काहीतरी चुकीचे" आहे. जरी बहुतेक लोक लग्न करतात, आणि पवित्र शास्त्र असे सूचित करते की बहुतेक लोकांनी लग्न करणे ही देवाची इच्छा आहे, एक अविवाहित ख्रिस्ती कोणत्याही प्रकारे "द्वितीय श्रेणी" ख्रिस्ती नाही. 1 करिंथ 7 सूचित करते, अविवाहित असणे, काहीही असल्यास, उच्च पाचारण आहे. जीवनातील प्रत्येक गोष्टीप्रमाणे आपण लग्नासंदर्भात देवाकडून शहाणपण मागितले पाहिजे (याकोब 1:5). देवाच्या योजनेचे पालन केल्याने, विवाहित असो किंवा अविवाहित, देवाला आपल्यासाठी हवी असलेली उत्पादकता आणि आनंद मिळेल.

Englishमराठीच्या पहिल्या पानावर वापस या

अविवाहित ख्रिस्ती राहण्याबद्दल पवित्रशास्त्र काय म्हणते?
© Copyright Got Questions Ministries