settings icon
share icon
प्रश्नः

शेवटच्या काळाची चिन्हे कोणती आहेत?

उत्तरः


मत्तय 24:5-8 आपणास काही महत्वाच्या सूचना देतात जेणेकरून शेवटचा काळ जवळ आला आहे, हे आपण ओळखू शकतो, "कारण पुष्कळजण माझ्यानावाने येवून मी ख्रिस्त आहे असे म्हणतील व पुष्कळास फसवितील. तुम्ही लढायांविषयी ऐकाल व लढायांच्या आवाया ऐकाल; घाबरून जाऊ नये म्हणून सांभाळा; कारण असे होणे अवश्य आहे; परंतू तेवढ्यांत शेवट होत नाही, कारण राष्ट्रावर राष्ट्र व राज्यावर राज्य उठेल आणि जागोजागी दुष्काळ व भूमिकंप होतील." खोटयां ख्रिस्तांमध्ये वाढ, युद्धामध्ये वाढ, दुष्काळांमध्ये वाढ, महामारी व नैसर्गिक अनर्थांमध्ये वाढ –ही शेवटच्या काळाची चिन्हे आहेत. ह्या उतार्‍यामध्ये जारी आपणास एक चेतावणी दिली आहे तरी आपण फसविले जाऊ नये कारण ह्या घटना प्रसूतीच्या वेदनांची केवळ सुरवात आहे, शेवट अजून येणार आहे.

काही विद्वान प्रत्येक भूकंप, प्रत्येक राजकीय उलथापालथ, इस्राएलावरील प्रत्येक आक्रमण शेवटचा काळ वेगाने जवळ येत असल्याचे एक विश्वासनिय चिन्ह म्हणून दर्शवितात. जारी घटना शेवटचे दिवस जवळ येत असल्याचे सांकेतिक चिन्ह असू शकतात तरी शेवटचा काळ येवून पोहचल्याचे ते अटळपणे दर्शक नाहीत. प्रेषित पौलाने चेतावणी दिली की शेवटच्या दिवसात खोटे शिक्षण देण्यात अगदी स्पष्ट दिसणारी वाढ होईल. "आत्मा स्पष्ट म्हणतो की, पुढील काळी विश्वासापासून कित्येक लोक भ्रष्ट होतील..... खोटे बोलणार्‍या माणसांच्या ढोंगाने ते फूस लविणार्‍या आत्म्यांच्या व भूतांच्या शिक्षणाच्या नांदी लागतील (1तिमथ्य 4:1-2). शेवटच्या काळी कठीण दिवस येतील असे वर्णन केले आहे कारण मनुष्य व लोक जे सक्रियपणे "सत्याचा विरोध करतात त्यांच्या अधिक प्रमाणात वाढलेल्या दुष्ट स्वभावामुळे तसे होईल (2 तिमथ्य 3:1-9; 2 थेस्स 2:3 सुद्धा पहा).

इतर चिन्हांमध्ये येरुषलेमेत एका यहुदी मंदिराचे पुनर्निर्माण, इस्राइलच्या रोखाने वाढलेले शत्रुत्व आणि एक वैश्विक सरकार ह्या दिशेने होणारी प्रगती. तथापि इस्राइल राष्ट्र हे शेवटच्या काळाचे अत्यंत महत्वाचे चिन्ह आहे, ई.सन. 70 नंतर मूलतः प्रथम वेळा इस्राइलला एक स्वतंत्र राज्य म्हणून मान्यता प्राप्त झाली. देवाने अब्राहमाला वचन दिले की त्याच्या भावी पिढ्यांना कनान "एक कायमचे वतन" म्हणून मिळेल (उत्पत्ती 17:8 आणि येहेज्केलने भविष्यवाणी केली की इस्राइलचे एक शाररीक व आत्मिक वस्तीस्थान असेल (येहेज्केल अध्याय 37). स्वर्ग व नरकाच्या सीद्धांतामध्ये इस्राइलचे श्रेष्ठत्व असल्यामुळे, त्यांच्या स्वतहाच्या भूमीत एक राष्ट्र म्हणून असणे हे शेवटच्या काळाच्या प्रकाशात महत्वपूर्ण आहे (दानिएल 10:14; 11:41;प्रकटीकरण 11:8).

ही चिन्हे ध्यानात ठेवून आपण हुशार आणि शेवटच्या काळाच्या अपेक्षेच्या बाबत सूक्ष्मदर्शी राहू शकतो. तथापि, ह्या असामान्य घटनेनपैकी कोणत्याही घटनेचे शेवटच्या काळाच्या लवकर आगमनाचे एक स्पष्ट चिन्ह म्हणून स्पष्टीकरण देवू नये. देवाने आम्हाला पुरेशी माहिती दिली आहे जेणेकरून आम्ही तयार राहू शकतो आणि तसेच होण्यासाठी आम्हाला पाचारण केले आहे.

English



मराठीच्या पहिल्या पानावर वापस या

शेवटच्या काळाची चिन्हे कोणती आहेत?
© Copyright Got Questions Ministries