settings icon
share icon
प्रश्नः

लैंगिकदृष्ट्या, ख्रिस्ती दाम्पत्त्यास काय करण्याची/न करण्याची परवानगी आहे?

उत्तरः


बायबल म्हणते, "लग्न सर्वस्वी आरदणीय असावे व अंथरून निर्दोष असावे; जारकर्मी व व्यभिचारी ह्यांचा न्याय देव करील" (इबरी लोकांस पत्र 13:4). पवित्र शास्त्र सांगत नाही की पती व पत्नीला लैंगिकदृष्ट्या, ख्रिस्ती दाम्पत्त्यास काय करण्याची अथवा न करण्याची परवानगी आहे. पती व पत्नीस आज्ञा देण्यात आली आहे, "एकमेकांबरोबर वंचना करूं नका, तरी प्रार्थनेसाठी प्रसंग मिळावा म्हणून पाहिजे असल्यास कांहीं वेळ परस्पर संमतीनें एकमेकापांसून दूर राहा" (करिंथकरांस 1 ले पत्र 7:5अ). हे वचन कदाचित वैवाहिक जीवनात लैंगिक संबंधांचा सिद्धांत मांडते. जे काही केले जात आहे, त्यात परस्पर सहमती असली पाहिजे. असे काहीही करण्यास प्रोत्साहन देता कामा नये अथवा बळजबरी करता कामा नये जी दुसर्‍या जोडीदारास त्रासदायक वाटत असेल व ज्यास तो किंवा ती चूक समजत असेल. जर पती व पत्नी दोघे एखादी गोष्ट करून पाहण्यास सहमत असतील (उदाहरणार्थ, मुखमैथून, वेगवेगळ्या मुद्रा, सेक्स टॉय्ज, इत्यादी), तर त्यांनी असे करू नये याचे बायबल कोणतेही कारण देत नाही.

तरीही, काही गोष्टी आहेत, ज्यांची विवाहित दाम्पत्त्यासाठी लैंगिकदृष्ट्या मोकळीक नाही. जोडीदाराची "अदलाबदल करणे" अथवा "आणखी एका व्यक्तीस आणणे" (तीन, चार, इत्यादी) सरासर व्यभिचार आहे (गलतीकरांस पत्र 5:19; इफिसकरांस पत्र 5:3; कलस्सैकरांस पत्र 3:5; थेस्सलनीकाकरांस 1 ले पत्र 4:3). व्यभिचार हे पाप आहे जरी आपला जोडीदार त्याची मोकळीक देत असेल, मंजूरी देत असेल, अथवा त्यात सहभागी होत असेल तरी. अश्लीलता "देहाची वासना आणि डोळ्यांची वासना" यांस आकर्षित करते (योहानाचे 1 ले पत्र 2:16) आणि म्हणून देवानेही त्यास दंडाज्ञा दिली आहे. पती व पत्नीने त्यांच्या लैंगिक मिलनात अश्लीलतेस कधीही आणू नये. ह्या दोन गोष्टींवाचून, दुसरे काहीच नाही ज्याची पवित्र शास्त्र पती व पत्नीस एकमेकांशी करावयास मनाई करते केवळ इतकेच की त्यास परस्पर मंजूरी असली पाहिजे.

English



मराठीच्या पहिल्या पानावर वापस या

लैंगिकदृष्ट्या, ख्रिस्ती दाम्पत्त्यास काय करण्याची/न करण्याची परवानगी आहे?
© Copyright Got Questions Ministries