settings icon
share icon
प्रश्नः

प्रकटीकरणाच्या पुस्तकात सात शिक्के आणि सात कर्णे काय आहेत?

उत्तरः


सात शिक्के (प्रकटी 6:1-17, 8:1-5), सात कर्णे (प्रकटी 8:6-21, 11:15-19), आणि सात वाट्या (प्रकटी 16:1-21) अंतसमयीच्या परमेश्वराच्या न्यायदंडाच्या तीन मालिका आहेत, अंतसमय जसजसा जवळ येत जातो तसतसा हे न्यायदंड हळूहळू अधिक भयावह आणि विध्वंसक होत जातात. सात शिक्के, सात कर्णे आणि सात वाट्या परस्पर निगडीत आहेत. सातवा शिक्का सातव्या कर्ण्याचा परिचय घडवून देतो (प्रकटी 8:1-5) आणि सातवा कर्णा सातव्या वाटीचा परिचय घडवून देतो (प्रकटी 11:15-19, 15:1-8).

सात शिक्क्यांपैकी पहिले चार प्रकटीकरणाचे चार घोडेस्वार म्हणून ओळखले जातात. पहिला शिक्का ख्रिस्तविरोधकाचा परिचय घडवून देतो (प्रकटी 6:1-2). दुसरा शिक्का मोठ्या युद्धास कारणीभूत ठरतो (प्रकटी 6:3-4). सातपैकी तिसरा शिक्का मोठ्या दुष्काळाचे कारण ठरतो (प्रकटी 6:5-6). चौथा शिक्का मरी, आणखी दुष्काळ आणि आणखी युद्ध घेऊन येतो (प्रकटी 6:7-8).

पाचवा शिक्का आपल्याला त्या लोकांविषयी सांगतो जे शेवटल्या काळात ख्रिस्तावरील विश्वासामुळे ख्रिस्तसाक्षी होतील (प्रकटी 6:9-11). देव न्यायासाठी त्यांचा आक्रोश ऐकतो आणि आपल्या समयी तो न्याय करील - कर्ण्याच्या आणि वाट्यांच्या न्यायनिवाड्यासह सहाव्या शिक्काच्या स्वरूपात - वेळेवर देईल. जेव्हा सातपैकी सहावा शिक्का तोडला जातो, तेव्हा एक विनाशकारी भूकंप होतो, ज्यामुळे प्रचंड उलथापालथ आणि भयानक विनाश होतो - असामान्य खगोलीय घटनेसह (प्रकटी 6:12-14). जे लोक जिवंत आहेत ते आक्रोश करतील, “आणि ते डोंगरांना व खडकांना म्हणाले, “आमच्यावर पडून राजासनावर जो बसलेला आहे, त्याच्या दृष्टीपुढून व कोकर्याच्या क्रोधापासून आम्हांला ‘लपवा.’ कारण त्याच्या ‘क्रोधाचा मोठा दिवस’ आला आहे, ‘आणि कोणाच्याने टिकाव धरवेल?” (प्रकटी 6:16-17).

प्रकटीकरण 8:6-21 मध्ये सात कण्र्यांचे वर्णन करण्यात आले आहे. सात कर्णे ही सातव्या शिक्क्याची “विषयवस्तू” आहे (प्रकटीकरण 8:1-5). पहिल्या कर्ण्यामुळे गारा व अग्नि प्रकट होईल ज्यामुळे जगातील बहुतेक वनस्पतीजीवन नष्ट होईल (प्रकटीकरण 8:7). दुसरा कर्णा महासागरावर आघात करणार्या उल्केस कारणीभूत ठरतो ज्यामुळे जगाच्या बहुतेक समुद्री जीवांचा मृत्यू घडून येईल (प्रकटीकरण 8:8-9). तिसरा कर्णा दुसर्यासारखाच आहे, तो महासागराऐवजी जगाच्या सरोवरांना आणि नद्यांना प्रभावित करेल (प्रकटीकरण 8:10-11).

सात कण्र्यांपैकी चैथ्यामुळे सूर्य आणि चंद्र अंधकारमय होतात (प्रकटीकरण 8:12). पाचव्या कर्ण्याचा परिणाम म्हणून “राक्षसी टोळ” उत्पन्न होतात जे मनुष्यांवर हल्ला करतात आणि त्यांना यातना देतात (प्रकटीकरण 9:1-11). सहाव्या कर्ण्यामुळे एक सैतानी सैन्य मुक्त होते ज्याने एक तृतीयांश मानवजात ठार केली जाते (प्रकटीकरण 9:12-21). सातव्या कर्णाने देवाच्या क्रोधाच्या सात वाट्यांसह सात देवदूतांना हाक मारली (प्रकटीकरण 11:15-19, 15:1-8).

सात वाट्यांच्या न्यायनिवाड्याचे वर्णन प्रकटीकरण 16:1-21 मध्ये आहे. सात वाट्यांचा न्यायनिवाडा सातव्या कर्ण्याद्वारे प्रकट होतो. पहिल्या वाटीमुळे मनुष्यांच्या शरीरांवर वेदनादायक फोड होतात (प्रकटीकरण 16:2). दुसर्या वाटीचा परिणाम म्हणून समुद्रातील प्रत्येक जीवाचा मृत्यू होतो (प्रकटीकरण 16:3). तिसर्या वाटीमुळे नद्यांचे रक्तात रुपांतर होते (प्रकटीकरण 16:4-7). सात वाटींपैकी चैथीच्या परिणामी सूर्याची उष्णता तीव्र होते आणि त्यामुळे तीव्र वेदना उत्पन्न होते (प्रकटीकरण 16:8-9). पाचव्या वाटीमुळे घोर अंधार पडतो आणि पहिल्या वाटीचे फोड आणखी तीव्र होतात (प्रकटीकरण 16:10-11). सहाव्या वाटीमुळे फरात नदी कोरडी पडते आणि हर्मगिदोनची लढाई करण्यासाठी ख्रिस्तविरोधकाच्या सैन्यांस एकत्र केले जाते (प्रकटीकरण 16:12-14). सातव्या वाटीचा परिणाम म्हणून विनाशकारी भूकंप येतो ज्यानंतर प्रचंड आकाराच्या गारा पडतात (प्रकटीकरण 16:15-21).

प्रकटी 16:5-7 परमेश्वराविषयी घोषणा करते, तेव्हा मी जलांच्या देवदूताला असे बोलताना ऐकले, “हे प्रभू, ‘जो तू पवित्र आहेस, होतास व असणार’, त्या तू असा न्यायनिवाडा केलास म्हणून तू ‘न्यायी’ आहेस; कारण त्यांनी पवित्र जनांचे व संदेष्ट्यांचे ‘रक्त पाडले’ आणि तू ‘त्यांना रक्त पिण्यास’ लावले आहे; ह्यास ते पात्र आहेत.’ नंतर मी वेदीला असे बोलताना ऐकले, “हो, ‘हे प्रभू’ देवा, हे सर्वसमर्था, ‘तुझे न्याय सत्य’ व ‘नीतीचे’ आहेत!”

English



मराठीच्या पहिल्या पानावर वापस या

प्रकटीकरणाच्या पुस्तकात सात शिक्के आणि सात कर्णे काय आहेत?
© Copyright Got Questions Ministries