सराफीम कोण आहेत? सराफ देवदूत आहेत का?


प्रश्नः सराफीम कोण आहेत? सराफ देवदूत आहेत का?

उत्तरः
सराफ (ज्वलंत, जळत असलेले) देवदूत आहेत मंदिरातील संदेष्टा यशयाच्या दृष्टान्ताशी संबंधित देवदूत होते जेव्हा परमेश्वराने त्याला भविष्यवक्ता म्हणून सेवेसाठी पाचारण केले (यशया 6:1-7) यशया 6:2-4 मध्ये लिहिले आहे, “त्याच्या भोवताली सराफीम उभे होते; त्या प्रत्येकाला सहा-सहा पंख होते; दोहोंनी तो आपले तोंड झाकी, दोहोंनी आपले पाय झाकी व दोहोंनी उडे. ते आळीपाळीने उच्च स्वराने म्हणत, “पवित्र! पवित्र! पवित्र सेनाधीश परमेश्वर! अखिल पृथ्वीची समृद्धी त्याचे वैभव आहे.” घोषणा करणार्‍यांच्या ह्या वाणीने उंबरठे हालले व मंदिर धुराने भरले.” सराफ हे देवदूत आहेत जे देवाची सतत उपासना करतात.

बायबलमध्ये यशया 6 वा अध्याय एकमेव असे स्थान आहे ज्यामध्ये सराफांचा विशिष्टरित्या उल्लेख करण्यात आला आहे. प्रत्येक सराफाला सहा पंख होते. दोन उड्डाण करण्यासाठी, दोन आपले पाय झाकण्यासाठी आणि दोन आपले तोंड झाकण्यासाठी त्यांचा वापर करीत (यशया 6:2). देव विराजीत असलेल्या सिंहासनावर सराफ उड्डाण करीत आणि देवाची महिमा व वैभवाकडे विशेष लक्ष आकर्षित करीत ते त्याची स्तुती करीत.जेव्हा यशयाने भविष्यवक्त्याची सेवा सुरू केली, त्यावेळी या प्राण्यांनी शुद्धतेचे प्रतिनिधी म्हणून काम केले. एकाने यशयाच्या ओठांवर गरम कोळसा ठेवला, “पाहा, ह्याचा स्पर्श तुझ्या ओठांना झाला म्हणून तुझा दोष दूर झाला आहे, तुझ्या पापाचे प्रायश्चित्त झाले आहे.” (यशया 6:7). पवित्र देवदूतांच्या इतर प्रकारांप्रमाणेच सराफ देवाप्रत पूर्णतः आज्ञाधारक आहेत. करूबांप्रमाणेच सराफ देखील विशेषतः देवाची उपासना करण्यावर लक्ष केंद्रित करतात.

English
मराठीच्या पहिल्या पानावर वापस या
सराफीम कोण आहेत? सराफ देवदूत आहेत का?