कोणी देवाला पाहिले आहे का?


प्रश्नः कोणी देवाला पाहिले आहे का?

उत्तरः
पवित्र शास्त्र आम्हाला सांगते की प्रभू येशू ख्रिस्तावाचून देवास कोणीही पाहिलेले नाही (योहान 1:18). निर्गम 33 20 मध्ये परमेश्वर घोषणा करतो, ”तुला माझे मुख पाहवणार नाही, कारण माझे मुख पाहिल्यास कोणी मनुष्य जिवंत राहणार नाही.” असे वाटते की ही वचने पवित्र शास्त्रातील इतर वचनांचे खंडन करतात जी अनेक लोकांनी परमेश्वरास “पाहिल्याचे” वर्णन करतात. उदाहरणार्थ, निर्गम 33:11 वर्णन करते की मोशेने परमेश्वराशी “अमोरासमोर” बोलणे केले. जर कोणीही देवास पाहून जिवंत राहत नसेल तर मोशेने परमेश्वराशी “अमोरासमोर” कसे बोलणे केले? या उदाहरणात, “अमोरासमोर” हा एक अलंकार आहे जो हे दाखवितो की ते परमेश्वराशी निकट सान्निध्यात होते. परमेश्वर देव आणि मोशे एकमेकांशी बोलत असत जणूकाही ते दोघे दोन मनुष्य आहेत जे सलगीचा संवाद साधत आहेत.

उत्पत्ती 32:30 मध्ये याकोबाने परमेश्वर देवास स्वर्गदूताच्या रूपात पाहिले, त्याने खरोखर देवास पाहिले नाही. जेव्हा शमशोनच्या आईबापास कळून आले की त्यांनी देवास पाहिले आहे तेव्हा ते घाबरून गेले (शास्ते 13:22), पण त्यांनी त्याला स्वर्गदूताच्या रूपात पाहिले होते. येशू देहरूपात परमेश्वर होता (योहान 1:1,14), म्हणून जेव्हा लोकांनी त्याला पाहिले तेव्हा ते परमेश्वरास पाहत होते. म्हणून होय परमेश्वर देवास “पाहता” येते आणि अनेक लोकांनी परमेश्वरास “पाहिले” आहे. त्याचवेळी कोणीही परमेश्वरास कधीही त्याच्या सर्व गौरवात पाहिलेले नाही. आमच्या पतित मानव अवस्थेत, जर देवाने स्वतःला आम्हावर पूर्णपणे प्रगट केले असते तर आम्ही भस्म झालो असतो आणि नाश पावलो असतो. म्हणून देव स्वतःस लपवून टाकतो आणि अशा स्वरूपात प्रगट करतो ज्यात आम्ही त्यास “पाहू” शकतो. तथापि, हे सर्व देवास त्याच्या गौरवाने आणि पवित्रतेने मुकुटमंडित असे पाहण्यापेक्षा वेगळे आहे. लोकांनी देवाचे दर्शन, देवाचे स्वरूप आणि देवाचे दर्शन पाहिले आहे, परंतु त्याच्या सर्व परिपूर्णतेत कोणीही कधीही देवाला पाहिले नाही (निर्गम 33:20).

English
मराठीच्या पहिल्या पानावर वापस या
कोणी देवाला पाहिले आहे का?