settings icon
share icon
प्रश्नः

ख्रिस्ती व्यक्तीने जगिक संगीत ऐकावे का?

उत्तरः


अनेक ख्रिस्ती लोक या प्रश्नाशी संघर्ष करतात. अनेक जगिक संगीतकार प्रचंड प्रतिभाशाली आहेत. जगिक संगीत खूप मनोरंजक असू शकते. अशी अनेक जगिक गाणी आहेत ज्यामध्ये आकर्षक धुन, विचारशील अंतर्दृष्टी आणि सकारात्मक संदेश आहेत. जगिक संगीत ऐकायचे की नाही हे ठरवताना, विचारात घेण्यासाठी तीन प्राथमिक घटक आहेत: 1) संगीताचा हेतू, 2) संगीताची शैली आणि 3) गीतांची सामग्री.

1) संगीताचा उद्देश. संगीताची रचना केवळ आराधनेसाठी केली आहे, की संगीत सुखदायक आणि/किंवा मनोरंजक असावे असा देवाचाही हेतू आहे काय? पवित्र शास्त्रामधील सर्वात प्रसिद्ध संगीतकार दावीद राजाने प्रामुख्याने देवाची उपासना करण्याच्या उद्देशाने संगीताचा वापर केला (स्तोत्र 4:1; 6:1, 54, 55; 61:1; 67:1; 76:1 पहा). तथापि, जेव्हा राजा शौलला दुष्ट आत्म्यांनी त्रास दिला तेव्हा तो दाविदाला शांत करण्यासाठी वीणा वाजवण्यास सांगत असे (1 शमुवेल 16:14-23). इस्रायली लोकांनी धोक्याचा इशारा देण्यासाठी (नहेम्या 4:20) आणि त्यांच्या शत्रूंना आश्चर्यचकित करण्यासाठी वाद्ये वापरण्यात आली (शास्ते 7:16-22). नवीन करारामध्ये, प्रेषित पौल ख्रिस्ती लोकांना संगीताने एकमेकांना प्रोत्साहित करण्याची सूचना देतो: “स्तोत्रे, गीते व आध्यात्मिक प्रबंध ही एकमेकांना म्हणून दाखवा” (इफिस 5:19). तर, संगीताचा प्राथमिक हेतू उपासना असल्याचे दिसत असताना, पवित्र शास्त्र निश्चितपणे संगीताच्या इतर उपयोगांना परवानगी देते.

2) संगीताची शैली. दुर्दैवाने, संगीत शैलीचा मुद्दा ख्रिस्ती लोकांमध्ये फारच विभाजनकारक असू शकतो. असे ख्रिस्ती आहेत जे कोणतेही वाद्य वापरू नये अशी ठामपणे मागणी करतात. असे ख्रिस्ती आहेत ज्यांना फक्त “जुने विश्वासू” स्तोत्र गाण्याची इच्छा आहे. असे ख्रिस्ती आहेत ज्यांना अधिक उत्साही आणि समकालीन संगीत हवे आहे. असे ख्रिस्ती आहेत जे “रॉक कॉन्सर्ट” प्रकारच्या वातावरणात सर्वोत्तम उपासना करण्याचा दावा करतात. हे फरक वैयक्तिक आवडीनिवडी आणि सांस्कृतिक भेद म्हणून ओळखण्याऐवजी, काही ख्रिस्ती त्यांच्या पसंतीच्या संगीताची शैली केवळ “पवित्रशास्त्रीय संबंधी” असल्याचे घोषित करतात आणि इतर सर्व प्रकारच्या संगीतांना अपवित्र, अधार्मिक किंवा सैतानी असल्याचे घोषित करतात.

पवित्रशास्त्रीय कोठेही संगीताच्या कोणत्याही विशिष्ट शैलीचा निषेध करत नाही. पवित्रशास्त्र कुठेही कोणत्याही विशिष्ट वाद्याला अधार्मिक असल्याचे घोषित करत नाही. पवित्रशास्त्रामध्ये असंख्य प्रकारची तार वाद्ये आणि वारा फुकून वाजविण्यात येणाऱ्या वाद्यांचा उल्लेख आहे. पवित्रशास्त्रामध्ये ड्रम्सचा विशेष उल्लेख नसला तरी त्यात इतर पर्क्युशन वाद्यांचा उल्लेख आहे (स्तोत्र 68:25; एज्रा 3:10). आधुनिक संगीताचे जवळजवळ सर्व प्रकार भिन्नता आणि/किंवा एकाच प्रकारच्या वाद्यांचे संयोजन आहेत, जे वेगाने किंवा जास्त जोर देऊन वाजवले जातात. संगीताच्या कोणत्याही विशिष्ट शैलीला अधार्मिक किंवा देवाच्या इच्छेबाहेर घोषित करण्यासाठी पवित्रशास्त्रसंबंधी कोणताही आधार नाही.

3) गीतांची सामग्री. एखाद्या ख्रिस्ती व्यक्तीने जगिक संगीत ऐकावे की नाही हे संगीताचा हेतू किंवा संगीताची शैली ठरवत नसल्याने, गीतांच्या सामग्रीचा विचार केला पाहिजे. विशेषतः संगीताबद्दल बोलत नसताना, फिलिप्पैकरांस पत्र 4:8 हे संगीत गीतांसाठी एक उत्कृष्ट मार्गदर्शक आहे: “बंधूंनो, शेवटी इतके सांगतो की, जे काही सत्य, जे काही आदरणीय, जे काही न्याय्य, जे काही शुद्ध, जे काही प्रशंसनीय, जे काही श्रवणीय, जो काही सद्‍गुण, जी काही स्तुती, त्यांचे मनन करा.” जर आपण अशा गोष्टींबद्दल विचार केला पाहिजे, तर नक्कीच अशा गोष्टी आपण आपल्या मनात संगीत आणि गीताद्वारे आमंत्रित केल्या पाहिजेत.. जगिक गाण्याचे बोल खरे, उदात्त, योग्य, शुद्ध, सुंदर, प्रशंसनीय, उत्कृष्ट आणि प्रशंसनीय असू शकतात का? जर तसे असेल, तर ख्रिस्ती व्यक्तीने त्या प्रकारचे जगिक गाणे ऐकण्यात काहीच गैर नाही.

तथापि, बहुतेक जगिक संगीत फिलिप्पैकरांस पत्र 4:8 च्या मानकांशी जुळत नाही. जगिक संगीत अनेकदा अनैतिकता आणि हिंसेला प्रोत्साहन देते तर पवित्रता आणि सचोटीला कमी लेखते. जर एखादे गाणे देवाच्या विरोधात असलेल्या गोष्टीचे गौरव करते, तर ख्रिस्ती व्यक्तीने ते ऐकू नये. तथापि, अशी अनेक जगिक गाणी आहेत ज्यामध्ये इतर देवाचा उल्लेख नाही जे अजूनही प्रामाणिकपणा, शुद्धता आणि सचोटी यासारख्या ईश्वरीय मूल्यांचे समर्थन करतात. जर प्रेमाचे गाणे लग्नाचे पावित्र्य आणि/किंवा खऱ्या प्रेमाच्या शुद्धतेला प्रोत्साहन देते - जरी ते देव किंवा पवित्र शास्त्र याचा उल्लेख करत नसले तरीही ते ऐकले जाऊ शकते आणि त्याचा आनंद घेतला जाऊ शकतो.

एखादी व्यक्ती त्याच्या मनावर कब्जा करण्यास जे काही परवानगी देते ते लवकरच किंवा नंतर त्याचे भाषण आणि त्याच्या कृती निर्धारित करेल. फिलिप्पैकरांस पत्र 4:8 आणि कलस्सैकरांस पत्र 3:2, 5: पौष्टिक विचार पद्धती स्थापन करण्यामागे हा आधार आहे. करिंथकरांस दुसरे पत्र 10:5 म्हणते की आपण “प्रत्येक विचार बंदिस्त करून घ्या आणि ते ख्रिस्ताला आज्ञाधारक बनवा”. हे शास्त्र आपल्याला कोणत्या प्रकारचे संगीत ऐकू नये याचे स्पष्ट चित्र देते.

अर्थात, सर्वोत्तम प्रकारचे संगीत हे आहे जे देवाची स्तुती आणि गौरव करते. प्रतिभावान ख्रिस्ती संगीतकार जवळजवळ शास्त्रीय ते रॉक, रॅप आणि रेगे अशा प्रत्येक संगीत प्रकारात काम करतात. संगीताच्या कोणत्याही विशिष्ट शैलीमध्ये स्वाभाविकपणे काहीही चुकीचे नाही. ख्रिस्ती लोकांना ऐकण्यासाठी गाणे “स्वीकार्य” आहे की नाही हे ठरवणारे गीत आहेत. जर एखादी गोष्ट तुम्हाला विचार करण्यास प्रवृत्त करते किंवा देवाचे गौरव होत नाही अशा एखाद्या गोष्टीमध्ये तुम्ही सामील होते असाल तर, तर ते टाळले पाहिजे.

Englishमराठीच्या पहिल्या पानावर वापस या

ख्रिस्ती व्यक्तीने जगिक संगीत ऐकावे का?
© Copyright Got Questions Ministries