सैतान कोण आहे?


प्रश्नः सैतान कोण आहे?

उत्तरः
सैतानाविषयीच्या लोकांच्या विश्वास मत हे मूर्खपणापासून तर भ्रामक गोष्टी पर्यंत आहे. — आपल्या खांद्यावर शिंग असलेला एक लहानसा लाल माणूस बसतो आणि तो आपल्याला पाप करण्याची गळ घालतो. असल्याप्रकारचे काल्पनिक चित्रण वापरुन वाईटाचा जो अवतार आहे त्याचे वर्णन केले जाते. परंतु, पवित्रशास्त्रात, आपल्याला सैतान कोण आहे आणि तो आपल्या जीवनावर कसा प्रभाव पाडतो याचे स्पष्ट चित्र दिले आहे. सोप्या शब्दात सांगितल्यास पवित्र शास्त्र सैतानाला एक देवदूत म्हणून परिभाषित करते. ज्याने पाप केल्यामुळे त्याला स्वर्गातल्या त्याच्या पदावरून त्याला खाली टाकले आणि आता तो देवाच्या उद्देशांच्या आड येणाऱ्या सर्व शक्तीचा उपयोग करून देवाच्या विरूद्ध पूर्णपणे विरोधात उभा आहे,

सैतान एक पवित्र देवदूत म्हणून तयार करण्यात आला होता यशया 14:12 त्याच्या पतनाच्या पूर्वीचे त्याचे नाव लुसिफर होते. यहेज्केल 28: 12-14 मध्ये वर्णन आहे की सैतान एक करुबिम म्हणून निर्माण केला होता, तसे पहिले असता तो एका उच्च श्रेणीचा देवदूत म्हणून निर्माण केला गेला होता परंतु त्याला त्याच्या सुंदरतेचा आणि पदाचा गर्व झाला. त्याच्याकडे वरचेवर पाहता सर्वात जास्त निर्माण केलेले देवदूते त्यांची सुंदरता आणि पदामुळे ते गर्विष्ठ झाले आणि त्याने देवाचे सिंहासन वर बसावे असे ठरविले (यशया 14: 13-14; यहेज्केल 28:15; 1 तीमथ्य 3: 6). सैतानाच्या गर्वामुळे त्याची अशी इच्छा झाली की त्याने देवाच्या सिंहासनावर बसावे. यशया 14: 12-15 मधील अनेक "मी" विधानाकडे लक्ष द्या. त्याच्या ह्या पापामुळे, देवाने सैतानाला स्वर्गात येण्यास प्रतिबंध केला.

सैतान ह्या जगाचा शासक बनला आणि अंतराळाच्या शक्तीचा राजपुत्र बनला (योहान 12:31; 2 करिंथ 4: 4; इफिसकरास पत्र 2: 2). तो एक दोषारोप करणारा आहे (प्रकटीकरण 12:10), मोहात टाकणारा (मत्तय 4: 3; 1 थेस्सलनीकाकरास पत्र 3: 5) आणि फसवणूक करणारा (उत्पत्ति 3; 2 करिंथ 4: 4; प्रकटीकरण 20: 3). त्याच्या नावाचा अर्थच "विरोधक" किंवा " विरोध करणारा " आहे. त्याचे दुसरे शीर्षक भूत म्हणजे "निंदा करणारा".

जरी त्याला स्वर्गातून हाकलून लावले गेले असले तरी तो स्वताहाला देवापेक्षा उच्च समजून त्याचे सिहासन देवाच्या सिंहासनापेक्षा उंच करण्याचा प्रयत्न सतत करत असतो. जगाच्या उपासनेचा स्वतासाठी लाभ घ्यावा म्हणून आणि देवाच्या राज्याच्या विरोधाला उत्तेजन देण्याची आशा बाळगून देव जे काही करतो त्या सगळ्यांची तो नक्कल करतो. प्रत्येक जागतिक खोट्या धर्माचे अंतिम उगमस्थान सैतानच आहे. सैतान देवाच्या आणि त्याच्या अनुयायांचा विरोध करण्यासाठी त्याच्या सामर्थ्यानीशी काहीही करण्याचा प्रयत्न करतो. तथापि, सैतानाचा शेवट हा मोहरबंद केलेला आहे-तो सदासर्वकाळासाठी अग्नीच्या तळ्यात टाकला जाईल. (प्रकटीकरण 20:10).

English
मराठीच्या पहिल्या पानावर वापस या
सैतान कोण आहे?