प्रश्नः
कुटुंबामध्ये पती आणि पत्नीच्या काय भूमिका आहेत?
उत्तरः
जरी ख्रीस्ताबरोबरच्या नात्यात पुरुष आणि स्त्री समान आहेत, तरी वचने लग्नामध्ये त्यापैकी प्रत्येकाला वेगवेगळ्या भूमिका देतात. घरामध्ये पतीने नेतृत्व केले पाहिजे असे मानले आहे (1 करिंथ 11:3 ; इफिस 5:23). हे नेतृत्व पत्नीवर हुकुमशाही, खालच्या पातळीवर गेलेले, किंवा आपण वरच्या पातळीवर आहोत असे वागणूक देणारे नसायला पाहिजे, परंतु ख्रिस्त जसे मंडळीचे नेतृत्व करतो त्यांच्या अनुसार असायला हवे. “पतींनो, जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली तशी तुम्हीही आपआपल्या पत्नीवर प्रीती करा; ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली आणि स्वतःस तिच्यासाठी अर्पण केले, अशासाठी की, तिला वचनाद्वारे जलस्नानाने स्वच्छ करून पवित्र करावे” (इफिस 5:25-26). ख्रिस्ताने मंडळीवर (त्याच्या लोकांवर) करुणा, दया, क्षमा, आदर आणि निस्वार्थीपणा यांच्यासह प्रीती केली. त्याचप्रकारे पतींनी त्यांच्या पत्नीवर प्रीती केली पाहिजे.
पत्नींनी त्यांच्या पतीच्या अधिकाराच्या अधीन असले पाहिजे. “स्त्रियांनो, तुम्ही जशा प्रभूच्या अधीन तशा आपआपल्या पतीच्या अधीन असा. कारण जसा ख्रिस्त मंडळीचे मस्तक आहे, तसा पती पत्नीचे मस्तक आहे. शिवाय ख्रिस्त हाच शरीराचा तारणारा आहे, तरी मंडळी जशी ख्रिस्ताच्या अधीन असते, तसे स्त्रियांनीही सर्व गोष्टीत आपल्या पतीच्या अधीन असावे” (इफिस 5:22-24). जरी स्त्रियांनी त्यांच्या पतीच्या अधीन असले पाहिजे, तरी पवित्र शास्त्र बऱ्याच वेळा पुरुषांनी त्यांच्या पत्नीशी कसे वागावे याबद्दल सुद्धा सांगते. पतीने हुकुमशहाची भूमिका नाही घेतली पाहिजे, परंतु त्यांच्या पत्नीप्रती आणि तिच्या मतांविषयी आदर दाखवला पाहिजे. खर तर, इफिसकरांस पत्र 5:28-29 पुरुषांना प्रोत्साहन देते की, त्यांनी त्यांच्या पत्नीवर त्याच प्रकारे प्रेम केले पाहिजे, ज्या प्रकारे ते त्यांच्या स्वतःच्या शरीरावर, त्याला खायला देतात आणि त्याची काळजी घेऊन करतात तसे केले पाहिजे. जसे ख्रिस्ताचे त्याचे शरीर, म्हणजेच मंडळीच्याप्रती जसे प्रेम आहे तसेच पुरुषाचे त्याच्या पत्नीप्रती प्रेम असले पाहिजे.
“स्त्रियांनो, जसे प्रभूमध्ये उचित आहे त्याप्रमाणे तुम्ही आपआपल्या पतीच्या अधीन असा. पतींनो, तुम्ही आपआपल्या पत्नीवर प्रीती करा, व तिच्याशी निष्ठुरतेने वागू नका” (कलस्सै 3:18-19). पतींनो, तसेच तुम्हीही आपआपल्या स्त्रियांबरोबर, त्या नाजूक व्यक्ती आहेत म्हणून सुज्ञतेने सहवास ठेवा; तुम्ही उभयता जीवनरूपी कृपादानाचे सामाईक वतनदार आहा, म्हणून तुम्ही त्यांना मान द्या; म्हणजे तुमच्या प्रर्थानात व्यत्यय येणार नाही” (1 पेत्र 3:7). या वचनांवरून आपल्याला असे दिसून येते की, प्रेम आणि आदर हे पती आणि पत्नी दोन्हींच्या भूमिकेचे व्यक्तिचित्रण करते. जर हे उपस्थित असेल, तर अधिकार, पद, प्रेम आणि समर्पण यासाठी कोणत्याही जोडीदाराला काहीच समस्या असणार नाही.
घरामधील जबाबदाऱ्यांची विभागणी करण्याच्या संदर्भात, पवित्र शास्त्र पतींना त्यांच्या कुटुंबाची तरतूद करण्याची सूचना देते. याचा अर्थ असा आहे की, तो काम करतो आणि त्याच्या पत्नीच्या आणि मुलांच्या सर्व आवश्यक गरजांची तरतूद करण्यासाठी पुरेसे पैसे कमवतो. असे करण्यात अपयशी होत असेल तर निश्चितच त्याचे आत्मिक परिणाम आहेत. “जर कोणी स्वकीयांची, व विशेषकरून आपल्या घरच्यांची तरतूद करीत नाही, तर त्याने विश्वास नाकारला आहे; तो माणूस विश्वास न ठेवणाऱ्या माणसापेक्षा वाईट आहे” (1 तीमथ्या 5:8). म्हणून, जो माणूस त्याच्या कुटुंबाची तरतूद करण्याची कोणतीच धडपड करीत नाही तो स्वतःला ख्रिस्ती म्हनवण्याच्या योग्य नाही. याचा अर्थ असा नाही की, पत्नी कुटुंबाची सहाय्यता करण्यात मदत करू शकत नाही—नीतीसुत्रे 31 दाखवते की देवभक्तीत असलेल्या स्त्रीने कोणत्या गोष्टी निश्चितपणे केल्या पाहिजेत—परंतु कुटुंबाची तरतूद करणे ही तिची मुख्य जबाबदारी नाही; ती तिच्या पतीची आहे.
पतीनेसुद्धा मुले आणि घरातील दैनंदिन कामामध्ये मदत केली पाहिजे (त्यामार्गाने त्याच्या पत्नीवर प्रेम करण्याचे कर्तव्य पूर्ण करतो), नीतीसुत्रे 31 हे सुद्धा स्पष्ट करते, की घर हे स्त्रीच्या प्रभावाचे आणि जबाबदारीचे मुख्य क्षेत्र असले पाहिजे. जरी ती उशीरपर्यंत जागी असली आणि लवकर उठली, तिच्या कुटुंबाची योग्य काळजी घेतली जाते. ही अनेक स्त्रियांसाठी—विशेषकरून संपन्न पाश्चिमात्य राष्ट्रांत सोपी जीवनशैली नाही. तथापि, आतापर्यंत बऱ्याच स्त्रिया ताणग्रस्त आणि तुटू शकतील इथपर्यंत ताणल्या गेलेल्या आहेत. अशा प्रकारच्या ताणतणावाला रोखण्यासाठी, पती आणि पत्नी दोघांनी प्रार्थनापूर्वक त्यांच्या प्रथामिकतेला पुनक्रमित केले पाहिजे, आणि त्यांच्या भूमिकेबद्दल पवित्र शास्त्राच्या सूचनांचे अनुसरण केले पाहिजे.
लग्नामध्ये कामाच्या विभागणीवरून वाद होणे निश्चित आहे, परंतु जर दोन्ही जोडीदार ख्रिस्ताच्या अधीन असतील, तर ते वाद कमीतकमी असतील. जर एखाद्या जोडप्यामध्ये या मुद्द्यावरून वाद सतत आणि जोरदार होत असतील, किंवा वाद त्यांच्या लग्नाचे वैशिष्ठ असे झाले असेल तर, ती समस्या आत्मिक आहे. अशा घटनेमध्ये, जोडीदारांनी पहिल्यांदा प्रार्थना आणि ख्रिस्ताच्या अधिनतेला, आणि नंतर प्रेम आणि आदरच्या वृत्तीने एकमेकांना पुनःसमर्पित केले पाहिजे.
English
कुटुंबामध्ये पती आणि पत्नीच्या काय भूमिका आहेत?