settings icon
share icon
प्रश्नः

ख्रिस्ताचे पुनरूत्थान महत्वाचे का आहे?

उत्तरः


पुनरुत्थान अनेक कारणांनी महत्त्वाचे आहे. सर्वप्रथम पुनरुत्थान स्वतः देवाच्या प्रचंड सामथ्र्याची साक्ष देते. पुनरुत्थानामध्ये विश्वास ठेवणे म्हणजे देवांमध्ये विश्वास ठेवणे आहे. जर देव अस्तित्वात आहे, आणि त्याने जगाची उत्पत्ती केली आणि त्यावर त्याचे सामर्थ्य आहे, तर त्याच्या ठायी मृतांस जिवंत करण्याचे सामर्थ्य देखील आहे. जर त्याच्याजवळ असे सामर्थ्य नसेल, तर तो आमच्या विश्वासास आणि उपासनेस पात्र नाही. ज्याने जीवन उत्पन्न केले केवळ तोच मरणानंतर त्यास पुनरूत्थान देऊ शकतो, केवळ तोच मृत्यूची भयंकरता बदलू शकतो, आणि केवळ तोच त्याची नांगी दूर करून कबरेवर विजय मिळू शकतो (1 करिंथ 15:54-55). येशूला कबरेतून जिवंत करण्याद्वारे, देव जीवन व मृत्यूवर त्याच्या संपूर्ण सार्वभौम सामर्थ्याचे आम्हास स्मरण करून देतो.

ख्रिस्ताचे पुनरुत्थान यासाठी देखील महत्त्वाचे आहे कारण येशूने जे असल्याचा म्हणजे देवाचा पुत्र आणि मशिहा असल्याचा जो दावा केला त्यास ते सत्य प्रमाणित करते. येशूनुसार, त्याचे पुनरुत्थान स्वर्गातून हे चिन्ह होते जे त्याच्या सेवाकार्यास सत्य प्रमाणित करीत होते (मत्तय 16:1-4). शेकडो प्रत्यक्ष साक्षी ज्यांनी येशू ख्रिस्ताच्या पुनरूत्थाची साक्ष दिली (1 करिंथ 15:3-8), ते हा अखंडनीय पुरावा देतात की तो जगाचा तारणारा आहे.

येशू ख्रिस्ताचे पुनरुत्थान महत्वाचे आहे याचा दुसरा पुरावा हा आहे की ते त्याचे निष्पाप चरित्र आणि ईश्वरीय स्वभाव सिद्ध करते. पवित्र शास्त्रात म्हटले आहे की देवाचा जो पवित्र त्यास कुजण्याचा अनुभव येणार नाही (स्तोत्र 16:10), आणि येशूने कधीही कुजण्याचा अनुभव घेतला नाही त्याच्या मरणानंतरही नाही (पहा प्रे. कृत्ये 13:32-37). ख्रिस्ताच्या पुनरूत्थाच्या आधारे पौलाने प्रचार केला, “म्हणून बंधुजनहो, तुम्हांला हे ठाऊक असो की, ह्याच्या द्वारे तुम्हांला पापांच्या क्षमेची घोषणा करण्यात येत आहे; आणि ज्याविषयी मोशेच्या नियमशास्त्राने तुम्ही नीतिमान ठरत नाही त्या सर्वांविषयी ह्याच्याकडून प्रत्येक विश्वास ठेवणारा नीतिमान ठरतो” (प्रे. कृत्ये 13:38-39).

येशू ख्रिस्ताचे पुनरुत्थान केवळ त्याच्या ईश्वरत्वाचे श्रेष्ठ प्रमाणीकरण नव्हे तर ते येशू ख्रिस्ताचे दुःखसहन व पुनरुत्थान या विषयी करण्यात आलेली जुन्या करारातील भाकिते देखील प्रमाणित करते (प्रे. कृत्ये 17:2-3). ख्रिस्ताच्या पुनरूत्थानाने त्याचे स्वतःचे दावे देखील सत्य सिद्ध केले की तो तिसर्या दिवशी मरणातून जिवंत उठणार आहे (मार्क 8:31; 9:31; 10:34). जर ख्रिस्त पुनरूत्थित झाला नाही तर मग आमच्याजवळ आशा नाही की आम्ही देखील मरणातून जिवंत होऊ. ख्रिस्ताच्या पुनरूत्थानावाचून आमच्याजवळ कोणीही तारणारा नाही, कोणतेही तारण नाही आणि सार्वकालिक जीवनाची कोणतीही आशा नाही. पौलाने म्हटल्याप्रमाणे आमचा विश्वास व्यर्थ ठरेल, सुवार्ता पूर्णपणे निर्बळ ठरेल, आणि आमच्या पापांची क्षमा झालेली नसेल (1 करिंथ 15:14-19).

येशूने म्हटले पुनरुत्थान व जीवन मीच आहे (योहान 11:25), आणि त्या वाक्यात त्याने दोन्हींचा स्रोत असल्याचा दावा केला. ख्रिस्तावाचून पुनरुत्थान आणि सार्वकालिक जीवन नाही. येशू जीवन देण्यापेक्षा आणखी काही करतो, तो जीवन आहे, आणि म्हणून त्याच्यावर मृत्यूचे सामर्थ्य नाही. येशू आपले जीवन त्यांस बहाल करतो जे त्याच्याठायी विश्वास ठेवतात, यासाठी की मृत्युवर आपण त्याच्या विजयाचे सहभागी व्हावे (1 योहान 5:11-12). आम्ही जे येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो ते व्यक्तिगतरित्या पुनरुत्थानाचा अनुभव घेतील कारण येशू जे जीवन देतो ते मिळविल्यामुळे, आम्ही मरणावर विजय मिळविला आहे. मरणास विजय मिळविणे अशक्य आहे (15:53-57).

येशू “महानिद्रा घेणार्यांतले प्रथमफळ असा आहे” (1 करिंथ 15:20).

दुसऱ्या शब्दांत, येशूने मरणानंतरच्या जीवनाचा मार्ग दाखविला. ख्रिस्ताचे पुनरुत्थान मानवांच्या पुनरुत्थानाची साक्ष म्हणून महत्त्वाचे आहे, जे ख्रिस्ती विश्वासाचे मूलभूत तत्त्व आहे. इतर धर्मांंच्या उलट, ख्रिस्ती धर्मात एक संस्थापक आहे जो मृत्यूच्या पलीकडे आहे आणि त्याच्या अनुयायांसही असेच वचन देतो. इतर प्रत्येक धर्म मनुष्यांनी किंवा संदेष्ट्यांनी स्थापना केला होता ज्यांचा शेवट कबरेत होतो. ख्रिस्ती या नात्याने आपल्याला हे माहित आहे की देव मनुष्य झाला, आपल्या पापांसाठी मरण पावला आणि तिसर्या दिवशी त्याचे पुनरुत्थान झाले. थडगे त्याला धरुन ठेवू शकले नाही. तो जिवंत आहे, आणि तो आज स्वर्गात पित्याच्या उजवीकडे बसला आहे (इब्री 10:12).

परमेश्वराचे वचन हमी देते की मंडळीस हवेच उचलून नेण्यासाठी येशू ख्रिस्त जेव्हा येईल तेव्हा विश्वासणारे पुनरुत्थान प्राप्त करतील. अशा आश्वासनाद्वारे विजयाचे एक महान गीत उदयास येते जसे पौलाने 1 करिंथ 15:55 मध्ये लिहिले आहे, “अरे मरणा, तुझा विजय कोठे? अरे मरणा, तुझी नांगी कोठे?” (तुलना करा होशे 13:14).

ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाच्या महत्त्वाचा आता प्रभूच्या आमच्या सेवेवर परिणाम होतो. पौलाने या शब्दांद्वारे पुनरुत्थानाबद्दलचे भाषण संपवले: “म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो, प्रभूमध्ये तुमचे श्रम व्यर्थ नाहीत हे तुम्ही जाणून आहात; म्हणून तुम्ही स्थिर व अढळ व्हा आणि प्रभूच्या कामात सर्वदा अधिकाधिक तत्पर असा” (1 करिंथ 15:58). आम्हाला माहित आहे की आपल्यास पुनरुत्थानाद्वारे नवीन जीवनात प्रवेश दिला जाईल, यामुळे आपण ख्रिस्तासाठी (वचन 30-32) छळ आणि जोखिमेचा सामना करू शकतो. येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानामुळे, इतिहासात हजारो ख्रिस्ती रक्तसाक्षींनी सार्वकालिक जीवनासाठी आणि पुनरुत्थानाच्या अभिवचनासाठी स्वेच्छेने आपले पृथ्वीवरील जीवन दिले.

पुनरुत्थान हा प्रत्येक विश्वासणाऱ्यासाठी विजय आणि गौरवशाली विजय आहे. पवित्र शास्त्रानुसार येशू ख्रिस्त मरण पावला, पुरला गेला आणि तिसर्या दिवशी मरणांतून उठला (1करिंथ 15:3-4). आणि तो परत येत आहे! ख्रिस्तामधील मेलेले उठविले जातील आणि जे त्याच्या आगमनसमयी जिवंत आहेत ते बदलले जातील आणि त्यांस नवीन, गौरवी देह प्राप्त होतील (1 थेस्सल 4:13-18). येशू ख्रिस्ताचे पुनरुत्थान महत्वाचे का आहे? हे येशू कोण आहे हे सिद्ध करते. हे सिद्ध होते की देवाने आमच्या वतीने येशूने केलेले बलिदान स्वीकारले आहे. हे दर्शवते की देवाला आम्हास मरणातून उठवण्याचे सामथ्र्य आहे. हे हमी देते की जे ख्रिस्तावर विश्वास ठेवतात त्यांचे मृतदेह मृत राहणार नाहीत तर ते सार्वकालिक जीवनासाठी उठविले जातील.

English



मराठीच्या पहिल्या पानावर वापस या

ख्रिस्ताचे पुनरूत्थान महत्वाचे का आहे?
© Copyright Got Questions Ministries