settings icon
share icon
प्रश्नः

बदलीचे देवपरिज्ञान शास्त्र अर्थात रिप्लेसमेन्ट थिओलॉजी काय आहे?

उत्तरः


रिप्लेसमेन्ट थिओलॉजी (ज्याला सुपरिसेनिझम देखील म्हटले जाते) असे शिकविते कि, सभेने देवाच्या योजनेत इस्राएलची जागा घेतली आहे. रिप्लेसमेन्ट थिओलॉजीचे अनुयायी असे मानतात कि यहुदी लोक देवाचे निवडलेले लोक राहिले नाहीत, आणि देवाजवळ इस्राएल राष्ट्राच्या भविष्यासाठी कोणतीही विशिष्ट योजना नाही. सभा आणि इस्राएलच्या संबंधाच्या विविध मतांपैकी सभेने इस्राएलची जागा घेतली आहे (रिप्लेसमेन्ट थिओलॉजी), सभा इस्राएलचा विस्तार आहे (कवनन्ट थिओलॉजी), किंवा सभा इस्राएल पेक्षा पूर्पपणे वेगळी आणि भिन्न आहे (डिस्पन्सेशनलीसम/ प्रीमिलॅनिलिझम) हि आहेत.

रिप्लेसमेन्ट थिओलॉजी असे शिकवते कि इस्राएलची जागा सभेने घेतली आहे आणि पवित्र शास्त्रात देवाने दिलेली बरीचशी अभिवचने इस्राएलमध्ये पूर्ण झाली नसून ख्रिस्तींच्या सभेमध्ये पूर्ण झाली आहेत. शास्त्रवचनातील इस्राएलच्या वाचाबद्द भूमीविषयी आशीर्वाद आणि पुनर्संचयनाच्या भविष्यावाण्या आत्मिक आणि रूपकात्मक प्रकारे सभेच्या आशीर्वादात रुपांतरीत केल्या आहेत. या दृष्टीकोनाच्या समस्या म्हणजे शतकानुशतके यहुदी लोकांच्या अस्तित्वातील सातत्य आणि आधुनिक इस्त्राईलच्या राज्य पुनरुज्जीवन या आहेत. जर इस्राएल चा देवाने निषेध केला आहे आणि यहुदी राष्ट्राला कोणतेही भविष्य नसेल तर, मागील 2,000 वर्षांत यहुदी लोकांचा नाश करण्याच्या अनेक प्रयन्तातून हि त्याच्या अलौकिक अस्तित्वाचे आपण कसे वर्णन करू? 1,900 वर्षे अस्तित्व नसलेला 20व्या शतकात.

इस्राएल राष्ट्राच्या रूपात पुन्हा कसा दिसू लागला याचे स्पष्टीकरण आपण कसे देऊ शकतो? इस्राएल आणि सभा हे वेगळे आहेत हा दृष्टीकोन आपण नवीन करारात स्पष्टपणे शिकविल्याचे दिसते. पवित्र शास्त्रीय पद्धतीने बोलायचे झाले तर सभा इस्राएल पेक्षा वेगळी आहे आणि सभा आणि इस्राएल या दोन शब्दामध्ये गोंधळून जाण्याचे कारण नाही किंवा हे शब्द परस्पराबद्दल वापरण्यात आलेले नाहीत. आम्हाला पवित्र शास्त्रातून असे शिकविण्यात आले आहे की सभा ही संपूर्णपणे नवीन निर्मिती आहे जी पेन्टेकॉस्टच्या दिवशी अस्तित्वात आली आहे आणि ती स्वर्गात घेतली जाईपर्यंत राहणार आहे (इफिसकरांस पत्र 1:9–11; 1 थेस्सनलिकाकरांस पत्र 4:13–17). इस्त्राएलच्या शाप आणि आशीर्वादांशी सभेचा कोणताही संबंध नाही. विविध करार, अभिवचने आणि मोसेच्या करतील सूचना या फक्त इस्राएल पुरतेच वैध होते. मागील 2000 वर्षांच्या पांगापांगी दरम्यान इस्त्राएलला देवाच्या कार्यक्रमात तात्पुरते बाजूला ठेवण्यात आले आहे (रोमकरांस पत्राचा 11 वा अध्याय पहा).

रिप्लेसमेन्ट थिओलॉजी च्या विपरीत, डिस्पन्सेशनलीसम शिकविते कि सभेच्या स्वर्गरोहनानंतर (1थेस्सनलिकाकरांस पत्र 4:13–18), देव इस्राएलला त्याच्या योजनेचा मुख्य केंद्र म्हणून पुनर्संचयित करील. यावेळी प्रथम घटना म्हणजे सताव होय (प्रकटीकरण अध्याय 6–19). ख्रिस्ताला नाकारल्याबद्दल जगाचा न्याय केला जाईल, तर मसीहाच्या दुसऱ्या आगमनासाठी इस्राएल मोठ्या संकटाच्या परीक्षेत तयार होत असेल. मग, जेव्हा ख्रिस्त सतावाच्या शेवटी पृथ्वीवर परत येईल, तेव्हा इस्राएल लोक त्याला स्वीकारण्यास तयार असतील. संकटात टिकून राहिलेल्या इस्राएलमधील वाचलेल्या लोकांचे तारण होईल, आणि प्रभु यरुशलेमला राजधानी बनवून या पृथ्वीवर आपले राज्य स्थापित करील. ख्रिस्त राजा म्हणून राज्य करीत असताना, इस्राएल एक अग्रगण्य राष्ट्र असेल आणि सर्व राष्ट्रांचे प्रतिनिधी यरुशलेममध्ये येतील आणि राजा - येशू ख्रिस्ताची उपासना करतील. सभा ख्रिस्ताबरोबर परत येईल आणि त्याच्याबरोबर शाब्दिक हजार वर्षे राज्य करेल (प्रकटीकरण 20:1-5).

जुना आणि नवीन असे दोन्ही हि करार इस्राएलसाठी असलेल्या देवाच्या योजनेच्या प्रीमिलॅनिलिअल/ डिस्पन्सेशनल दृष्टीकोनास समर्थन करतात. प्रीमिलॅनिलिजमचा सर्वात मजबूत आधार प्रकटीकरण 20:1–7 च्या शिकवणीत स्पष्ट आढळतो, जिथे ख्रिस्ताचे राज्य 1,000 वर्षे टिकेल असे सहा वेळा म्हटले आहे. सतावानंतर प्रभु परत येईल आणि इस्राएल राष्ट्राबरोबर त्याचे राज्य स्थापित करील, ख्रिस्त संपूर्ण पृथ्वीवर राज्य करील, आणि इस्राएल राष्ट्रांचा पुढारी होईल. सभा ख्रिस्ताबरोबर शब्दशः हजार वर्षे राज्य करील. देवाच्या योजनेत सभेने इस्राएलची जागा घेतली नाही. या कृपेच्या कालखंडात देवाने आपले लक्ष प्रामुख्याने सभेकडे केंद्रित केले असे असले तरी देव इस्राएलला विसरलेला नाही आणि एक दिवस इस्राएलला त्याने निवडलेल्या राष्ट्राच्या भूमिकेत तो परत घेऊन येईल (रोमकरांस पत्र 11).

Englishमराठीच्या पहिल्या पानावर वापस या

बदलीचे देवपरिज्ञान शास्त्र अर्थात रिप्लेसमेन्ट थिओलॉजी काय आहे?
© Copyright Got Questions Ministries