प्रश्नः
पश्चाताप काय आहे आणि तो तारणासाठी आवश्यक का आहे?
उत्तरः
अनेक जण असे समजतात की पश्चाताप या शब्दाचा अर्थ आहे “पापापासून फिरणे”. ही पश्चातापाची बायबलमध्ये दिलेली व्याख्या नाही. बायबलमध्ये पश्चाताप या शब्दाचा अर्थ आहे आपले “मन बदलणे”. बायबल आम्हाला हे देखील सांगते की खर्या पश्चातापाचा परिणाम कृतींमध्ये परिवर्तनात होतो (लूक 3:8-14; प्रे. कृत्ये 3:19). प्रेषितांची कृत्ये 26:20 घोषित करते, “मी उपदेश करत आलो की, पश्चात्ताप करा आणि पश्चात्तापास शोभतील अशी कृत्ये करून देवाकडे वळा.” पश्चातापाची पूर्ण बायबल आधारित व्याख्या म्हणजे मन परिवर्तन आहे ज्याचा परिणाम म्हणजे कृतीमध्ये बदल घडून येणे.
तर मग पश्चाताप आणि तारण यामध्ये काय संबंध आहे? प्रेषितांच्या पुस्तकात तारणाच्या बाबतीत पश्चातापावर विशेष लक्ष देण्यात आल्याचे दिसून येते (प्रे. कृत्ये 2:38; 3:19; 11:18; 17:30; 20:21; 26:20). तारणाच्या संबंधाने पश्चाताप करणे म्हणजे येशू ख्रिस्ताबाबत आपले मन बदलणे. पेन्टेकाॅस्टच्या दिवशी पेत्राच्या उपदेशात (प्रे. कृत्ये अध्याय 2), तो लोकांस पश्चाताप करण्यासाठी पाचारण देऊन समाप्त करतो (प्रे. कृत्ये 2:38). पश्चाताप कशापासून? पेत्र येशूचा अव्हेर करणाऱ्या लोकांना बोलावीत आहे (प्रे. कृत्ये 2:36) की त्यांनी त्याच्याविषयी आपले मन बदलावे, त्यांनी हे ओळखावे की तो खरोखर “प्रभू आणि ख्रिस्त” आहे (प्रे. कृत्ये 2:36). पेत्र लोकांना पाचारण करीत आहे की त्यांनी ख्रिस्ताचा अव्हेर करण्यापासून आपले मन बदलावे आणि त्याच्यावर मशिहा आणि तारणारा दोन्ही म्हणून विश्वास ठेवावा.
पश्चात्ताप आणि विश्वास एकाच नाण्याच्या दोन बाजू म्हणून समजू शकतो. तो कोण आहे आणि त्याने काय केले याविषयी प्रथम आपले मत बदलल्याशिवाय येशू ख्रिस्तावर तारणारा म्हणून आपला विश्वास ठेवणे अशक्य आहे. हेतुपुरस्सर नाकारण्यापासून पश्चात्ताप असो किंवा अज्ञानातून पश्चात्ताप असो किंवा त्याविषयीची आवड नसल्यामुळे असो, हा मनाचा एक बदल आहे. बायबल आधारित पश्चात्ताप, तारणाच्या संदर्भात पश्चात्ताप, ख्रिस्ताला नाकारण्यापासून ख्रिस्तावरील विश्वासाकडे आपले मन बदलणे आहे.
हे आपण समजून घेणे महत्त्वाचे आहे की पश्चात्ताप करणे तारण मिळविण्यासाठी केलेले कार्य नाही. जोपर्यंत देव त्या व्यक्तीस आपल्याकडे खेचत नाही तोपर्यंत कोणीही पश्चात्ताप करू शकत नाही आणि देवाकडे येऊ शकत नाही (योहान 6:44). प्रेषितांची कृत्ये 5:31; 11:18 असे सूचित करते की पश्चात्ताप ही अशी गोष्ट आहे जी देव देतो - केवळ त्याच्या कृपेमुळेच हे शक्य आहे. देव कृपा पुरवीत नाही तोपर्यंत कोणीही पश्चात्ताप करू शकत नाही. पश्चात्ताप आणि विश्वास यासह सर्व तारण म्हणजे देव आपल्याला स्वतःकडे खेचतो, आपले डोळे उघडतो आणि आपली अंतःकरणे बदलतो. देव धैर्याने आपल्याला पश्चात्ताप करण्यास प्रवृत्त करतो (2 पेत्र 3:9) त्याच्या दयाळूपणाप्रमाणे (रोम 2:4)).
पश्चाताप हे तारण मिळवून देणारे काम नसले तरी तारणासाठी पश्चात्ताप केल्याने कार्य होते. कृतीत बदल घडवून आणल्याशिवाय आपले मन खरोखर आणि पूर्णपणे बदलणे अशक्य आहे. बायबलमध्ये, पश्चात्ताप केल्याने वर्तणुकीत बदल होतो. म्हणूनच बापतिस्मा करणाऱ्या योहानाने लोकांना “पश्चात्तापास योग्य असे फळ देण्यास” सांगितले (मत्तय 3:8)). ज्याने खरोखर ख्रिस्तावर विश्वास ठेवून ख्रिस्ताला नाकारल्यापासून पश्चात्ताप केला आहे तो बदललेल्या जीवनाचा पुरावा देईल (2करिंथ 5:17; गलती 5:19-13; याकोब 2:14-२6) योग्यरित्या परिभाषित केल्यास, पश्चात्ताप तारणासाठी आवश्यक आहे. बायबलचा पश्चात्ताप म्हणजे येशू ख्रिस्ताबद्दलचे आपले मत बदलणे आणि तारणासाठी विश्वासाने देवाकडे वळणे (प्रेषितांची कृत्ये 3:19). पापापासून वळणे ही पश्चात्तापाची व्याख्या नाही तर प्रभु येशू ख्रिस्ताप्रत अस्सल, विश्वास-आधारित पश्चात्तापाचा हा एक परिणाम आहे.
English
पश्चाताप काय आहे आणि तो तारणासाठी आवश्यक का आहे?