settings icon
share icon
प्रश्नः

रीफॉम्ड थिओलॉजी काय आहे?

उत्तरः


रीफॉम्ड थिओलॉजी हि अशी विश्वास प्रणाली आहे ज्यामध्ये त्या प्रत्येक विश्वास प्रणालीचा समावेश केला जातो ज्यांचा संबंध 16 व्या शतकाच्या प्रोटेस्टंट रीफॉर्मेशनशी येतो. अर्थात, सुधारकांनी त्याच्या शिकवणी पवित्र शास्त्रातून घेतल्या आहेत, जसे कि “सोला स्क्रीप्चर” अर्थात केवळ शास्त्र, म्हणून रीफॉम्ड थिओलॉजी एक “नवीन” विश्वास प्रणाली नसून प्रेरीतांच्या शिकवणीचे सातत्य आहे.

सामान्यत: रीफॉम्ड थिओलॉजीने पवित्र शास्त्राचे अधिकार जे देवाचे सार्वभौमत्व आहे आणि ख्रिस्ताद्वारे कृपेने तारण आणि सुवार्तेची आवश्यकता याला पकडून आहे. याला कधीकधी करार देवपरीज्ञान शास्त्र म्हटले जाते कारण आदामाबरोबर देवाने केलेला करार आणि येशू ख्रिस्ताद्वारे प्राप्त झालेल्या नवीन करारावर (लूक 22:20) यामध्ये जोर देण्यात आला आहे.

शास्त्राची अधिकृतता. रीफॉम्ड थिओलॉजीची अशी शिकवण आहे कि पवित्र शास्त्र देवाची प्रेरणा आणि देवाची अधिकृत वचन आहे जे विश्वासास आणि असुसरण्यास पुरेसे आहे.

देवाचे सार्वभौमत्व. रीफॉम्ड थिओलॉजीची अशी शिकवण आहे कि देव सर्व सृष्टीवर पूर्ण नियंत्रण ठेवून राज्य करतो. त्याने सर्व घटना पूर्वनिर्धारित केल्या आहेत आणि म्हणूनच परिस्थितीमुळे कधीही निराश होत नाही. हे निर्मितीच्या इच्छेला मर्यादित करत नाही, आणि हे देवाला पापाचा जनक बनवत नाही.

कृपेने तारण. रीफॉम्ड थिओलॉजीची अशी शिकवण आहे कि देवाने आपल्या कृपेने आणि दयेने लोकांना स्वत: कडे सोडवले असून त्यांना पापातून आणि मृत्यूतून बाहेर काढले आहे. सुधारित शिकवण अर्थात रीफॉम्ड डॉकट्रीन सामान्यत: परिवर्णी लेकन टीयूएलआयपी अर्थात TULIP (कॅल्व्हनिझमचे पाच मुद्दे म्हणूनही ओळखले जाते) द्वारे दर्शविले जाते:

टी – टोटल डीप्रेविटी अर्थता संपूर्ण विकृती. मनुष्य आपल्या पापी अवस्थेत पूर्णपणे असहाय्य असून देवाच्या क्रोधाखाली आहे आणि कोणत्याही प्रकारे तो देवाला प्रसन्न करू शकत नाही. संपूर्ण विकृतीचा अर्थ असा आहे की, देव त्याच्या दयाळूपणाने जोपर्यंत मानवाला उत्तेजित करत नाही तोपर्यंत मनुष्य देवाला ओळखण्याचा प्रयत्न करू शकत नाही (उत्पत्ति 6:5; यिर्मया 17:9; रोमकरांस पत्र 3:10-18).

यू – अनकन्डीशनल ईलेक्शन अर्थात बिनशर्त निवड. देवाने, अनंतकाळपासून, ज्यास कोणीही मोजू शकत नाही अशा पापी लोकांच्या मोठ्या लोकसमुदायास वाचविण्याचे निवडले आहे (रोमकरांस पत्र 8:29-30; 9:11; इफिसकरांस पत्र 1:4-6,11-12).

एल – लिमिटेड अटोनमेन्ट अर्थात मर्यादित भरपाई. यालाच “विशिष्ट सोडविणे” असेही म्हणतात. ख्रिस्ताने निवडलेल्या लोकांचे पाप स्वत: वर घेतले आणि त्यांच्या जीवनासाठी त्याने स्वतःच्या मृत्यूने किंमत भरली. दुसऱ्या शब्दामध्ये, त्याने फक्त तारण “शक्य” केले नाही तर ज्याला त्याने निवडले त्यांच्यासाठी ते प्राप्त केले (मत्तय 1:21; योहान 10:11; 17:9; प्रेषितांची कृत्ये 20:28; रोमकरांस पत्र 8:32; इफिसकरांस पत्र 5:25).

आय – ईरजीस्टीबल ग्रेस अर्थात अनाकारनिय कृपा. मानवाच्या त्याच्या पडलेल्या अवस्थेमध्ये त्याने देवाच्या प्रेमाला नाकारले होते, परंतु मनुष्याच्या अंत: करणात काम करत असलेल्या देवाच्या कृपेमुळे त्याने यापूर्वी नाकारलेल्या गोष्टीची इच्छा निर्माण होते. म्हणजेच, देवाची कृपा त्याच्या निवडलेल्यांमध्ये वाचविण्याचे कार्य पूर्ण करण्यात अयशस्वी होणार नाही (योहान 6:37,44; 10:16).

पी – पर्सीवरन्स ऑफ द सेन्ट अर्थात संतांची चिकाटी. देव त्याच्या संतांना पडल्यापासून वाचवितो; अशा प्रकारे, तारण चिरंतन आहे (योहान 10:27-29; रोमकरांस पत्र 8:29-30; इफिसकरांस पत्र 1:3-14).

सुवार्ता प्रसाराची गरज. रीफॉम्ड थिओलॉजीची अशी शिकवण आहे कि ख्रिस्ती लोक या जगामध्ये सुवार्ता प्रसाराद्वारे आत्मिक आणि पावित्र व मानवतेच्या जगण्याने सामाजिक बदल घडविण्यासाठी आहेत.

रीफॉम्ड थिओलॉजीच्या इतर विशिष्ट गोष्टींमध्ये सामान्यत: पुढील बाबींचा समावेश होतो: दोन सराव (बप्तिस्मा आणि प्रभूभोज), आत्मिक वरदानांचा समाप्तीवाद अर्थात सेशॅशनिस्ट दृष्टीकोन (यापुढे सभांना वरदाने विस्तारित केलेली नाहीत) आणि पवित्र शास्त्राचा अ-कालखंडनिय दृष्टीकोन अर्थात नॉन-डीस्पेन्सेशनल व्यू. सुधारित सभांनी जॉन कॅल्विन, जॉन नॉक्स, उल्रिक झ्विंगली आणि मार्टिन ल्यूथर यांच्या लिखानांना फार आदर दिला आहे. वेस्टमिन्स्टरची कबुली सुधारित परंपरांच्या देवपरीज्ञान शास्त्राला मूर्तिमंत करते. सुधारित परंपरेतील आधुनिक सभांमध्ये प्रेस्बिटेरियन, कॉन्ग्रीगेशनॅलिस्ट, आणि काही बॅप्तीस्ट यांचा समावेश होतो.

Englishमराठीच्या पहिल्या पानावर वापस या

रीफॉम्ड थिओलॉजी काय आहे?
© Copyright Got Questions Ministries