प्रश्नः
ख्रिस्ती मुक्ती म्हणजे काय?
उत्तरः
प्रत्येकास मुक्तीची किंवा सुटकेची गरज आहे. आमच्या नैसर्गिक अवस्थेत आपण दोषी होतो: “सर्वांनी पाप केले आहे आणि देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत” (रोम 3:23). ख्रिस्ताच्या मुक्तीेमुळे आपल्याला दोषमुक्त केले गेले आहे, “त्याच्या कृपेने ख्रिस्त येशूने खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या द्वारे ते विनामूल्य नीतिमान ठरतात” (रोम 3:24).
मुक्तीच्या फायद्यांमध्ये सार्वकालिक जीवन (प्रकटीकरण 5:9-10), पापांची क्षमा (इफिसकर 1:7), नीतिमत्व (रोम 5:17), नियमशास्त्राच्या शापातून मुक्तता (गलतीकर 3:13), देवाच्या कुटुंबात स्वीकारले जाणे (गलती 4:5), पापाच्या गुलामगिरीतून मुक्तता (तीत 2:14; 1 पेत्र 1:14-18), देवाबरोबर शांती (कलस्सै 1:18-20) आणि पवित्र आत्म्याचा अधिवास (1 करिंथ 6:19-20) यांचा समावेश आहे. म्हणून, मुक्ती प्राप्त करणे तर क्षमा पावणे, पवित्र, नीतिमान ठरविले जाणेे, स्वतंत्र, दत्तक आहे आणि समेट झालेले आहोत. स्तोत्र 130:7-8; लूक 2:38; आणि प्रेषितांची कृत्ये 20:28.
सोडविणे किंवा रीडिम या शब्दाचा अर्थ “विकत घेणे” आहे. हा शब्द विशेषतः गुलामांचे स्वातंत्र्य खरेदी करण्याच्या संदर्भात वापरला जात असे. वधस्तंभावर ख्रिस्ताच्या मृत्यूसाठी या शब्दाचा उपयोग सूचक आहे. जर आपण “सोडवले गेलो” आहोत तर आपली पूर्वीची दशा गुलामगिरीची होती. देवाने आमचे स्वातंत्र्य विकत घेतले आहे, आणि आम्ही यापुढे पाप किंवा जुन्या कराराच्या नियमशास्त्राच्या गुलामगिरीत राहिलो नाही. “सुटके” चा हा रूपकात्मक उपयोग गलती 3:13 आणि 4:5 ची शिकवण आहे.
मुक्ती किंवा सुटकेच्या ख्रिस्ती संकल्पनेशी संबंधित शब्द आहे खंडणी. आम्हास पापांपासून आणि त्याच्या शिक्षेपासून सोडविण्यासाठी येशूने किंमत मोजली (मत्तय 20:28; 1 तीमथ्य 2:6). त्याचा मृत्यू आमच्या जीवनाच्या ऐवजी होता. खरे तर, पवित्र शास्त्र अगदी स्पष्टपणे सांगते की मुक्ती केवळ “त्याच्या रक्ताद्वारे” म्हणजे, त्याच्या मरणाद्वारे शक्य आहे (कलस्सै 1:14).
स्वर्गातील रस्ते पूर्वीच्या बंदिवानांनी भरलेले असतील जे स्वतःच्या कोणत्याही गुणवत्तेशिवाय स्वतःस मुक्तता, क्षमा आणि स्वातंत्र्य पावलेले म्हणून पाहतील. पापाचे दास संत झाले आहेत. यात काहीच आश्चर्य नाही की आपण एक नवीन गीत गाऊ - म्हणजे मुक्तीदात्यासाठी स्तुतीचे गीत जो वध केला गेला (प्रकटीकरण 5:9). आम्ही पापाचे गुलाम होतो आणि देवापासून सदाकाळसाठी विभक्त होतोे. येशूने आम्हास सोडविण्यासाठी किंमत मोजली, परिणामी पापांच्या गुलामगिरीतून आम्हास स्वातंत्र्य मिळाले आणि त्या पापाच्या शाश्वत परिणामापासून आपला बचाव झाला.
English
ख्रिस्ती मुक्ती म्हणजे काय?