settings icon
share icon
प्रश्नः

ख्रिस्ती समेट म्हणजे काय? आम्हास देवाबरोबर समेट करण्याची का गरज आहे?

उत्तरः


कल्पना करा की दोन मित्र भांडत आहेत किंवा वाद घालत आहेत. पूर्वी असलेले चांगले संबंध इतके ताणले गेले आहेत की ते तुटणार आहेत. ते एकमेकांशी बोलणे बंद करतात, त्यांच्या बोलण्यात त्यांना अडखळल्यासारखे वाटते. मित्र हळूहळू अनोळखी बनतात. अशा प्रकारचा दुरावा समेटाद्वारे दूर केला जाऊ शकतो. समेट करणे म्हणजे मैत्री किंवा सुसंवाद परत स्थापन करणे. जेव्हा जुने मित्र त्यांचे मतभेद सोडवतात आणि त्यांचे नाते पुन्हा स्थापित करतात, तेव्हा सलोखा होतो. दुसरे करिंथ 5:18-19 घोषित करते, “ही सगळी देवाची करणी आहे; त्याने स्वतःबरोबर आपला समेट येशू ख्रिस्ताच्या द्वारे केला आणि समेटाची सेवा आम्हांला दिली; म्हणजे जगातील लोकांची पातके त्यांच्याकडे न मोजता, देव ख्रिस्तामध्ये स्वतःबरोबर जगाचा समेट करत होता; आणि त्याने आपल्याकडे समेटाचे वचन सोपवून दिले.”

बायबल म्हणते की ख्रिस्ताने परमेश्वराशी आमचा समेट केला (रोम 5:10; 2 करिंथ 5:18; कलस्सै 1:20-21). आपल्याला समेटाची गरज होती याचा अर्थ असा की देवाबरोबरचे आपले नाते तुटले होते. देव पवित्र असल्यामुळे आपणच दोषी होतो. आमच्या पापाने आपल्याला त्याच्यापासून दूर केले. रोम 5:10 म्हणते की आपण देवाचे शत्रू होतो: “कारण आपण शत्रू असता देवाबरोबर त्याच्या पुत्राच्या मृत्यूद्वारे आपला समेट झाला, तर आता समेट झाला असता त्याच्या जीवनाने आपण विशेषेकरून तारले जाणार आहोत!”

जेव्हा ख्रिस्त वधस्तंभावर मरण पावला, तेव्हा त्याने देवाच्या न्यायाचे समाधान केले आणि देवाचे शत्रू आम्हाला त्याच्याद्वारे शांती मिळवून दिली. तर मग देवाशी “समेट” करण्यात त्याच्या कृपेचा उपयोग आणि आपल्या पापांची क्षमा यांचा समावेश आहे. येशूच्या बलिदानाचा परिणाम असा आहे की आमचे नाते शत्रूत्वातून मैत्रीत बदलले आहे. “मी यापुढे तुम्हाला सेवक म्हणत नाही ... तर मी तुम्हाला मित्र म्हणत आहे” (योहान 15:15). ख्रिस्ती सलोखा किंवा समेट एक गौरवमय सत्य आहे! आम्ही देवाचे शत्रू होतो, पण आता त्याचे मित्र आहोत. आमच्या पापांमुळे आम्ही दंडाज्ञेच्या स्थितीत होतो, परंतु आता आम्हाला क्षमा करण्यात आली आहे. आम्ही देवाबरोबर युद्ध करीत होतो, परंतु आता आमच्याजवळ ती शांती आहे जी सर्व बुद्धीसामथ्र्यापलीकडे आहे (फिलिप्पै 4:7).

Englishमराठीच्या पहिल्या पानावर वापस या

ख्रिस्ती समेट म्हणजे काय? आम्हास देवाबरोबर समेट करण्याची का गरज आहे?
© Copyright Got Questions Ministries