settings icon
share icon
प्रश्नः

बंडखोर मुलाबरोबर काय करावे असे पवित्र शास्त्र सांगते?

उत्तरः


एखादे मुल बंडखोर प्रवृत्तीचे प्रदर्शन करते त्यामागे अनेक कारणे असू शकतात. कठोर, प्रेमरहित, आणि गंभीर पालकत्व याचा परिणाम बहुदा कोणत्या ना कोणत्या प्रकारची बंडखोरी असेल. अगदी सगळ्यात आज्ञाधारक मूल सुद्धा अशा वागणुकीच्या विरोधमध्ये—आतून किंवा बाहेरून—बंडखोरी करेल. स्वाभाविकपणे, अशा प्रकारचे पालकत्व टाळायला हवे. याव्यतिरिक्त, युवावस्थेतील मुलांमध्ये जे त्यांचे जीवन आणि स्वतःची ओळख स्थापन करण्याच्या प्रक्रियेमध्ये असताना त्यांच्या कुटुंबापासून हळूहळू दूर जात असतात त्यांच्यात त्यांच्या पालकांच्या विरोधमध्ये विशिष्ठ प्रमाणामध्ये बंडखोरी असणे हे स्वाभाविक आहे.

बंडखोर मुलाकडे स्वाभाविक मजबूत इच्छा असलेले व्यक्तिमत्व आहे असे गृहीत धरून, त्याच्या वैशिष्ठ्यामध्ये, मर्यादांना चाचपून बघण्याकडे कल, नियंत्रण करण्याची प्रबळ इच्छा, आणि सर्व अधिकारांना विरोध करण्याची वचनबद्धता यांचा समावेश असतो. दुसऱ्या शब्दात, बंडखोरी हे त्याचे मधले नाव आहे. याव्यतिरिक्त, ही मजबूत इच्छा असलेली बंडखोर मुले बऱ्याचदा अतिशय हुशार असतात आणि परिस्थितीवर आणि त्यांच्या सभोवताली असलेल्या लोकांवर नियंत्रण मिळवण्याचे मार्ग शोधून घटनांमध्ये आश्चर्यकारक गतीने “उपाय शोधतात”. ही मुले त्यांच्या पालकांच्यासाठी अतिशय कठीण आणि दमवणारे आव्हान असू शकतात.

सुदैवाने, मुले जी आहेत आणि जशी आहेत त्यांना देवानेच बनवले आहे हे खरे आहे. तो त्यांच्यावर प्रेम करतो, आणि तो पालकांना येणाऱ्या आव्हानांना पूर्ण करण्याचा संसाधानाविना सोडत नाही. काही पवित्र शास्त्रीय तत्वे आहेत जी बंडखोर, मजबूत इच्छा असणाऱ्या मुलाला कृपेने हाताळण्याबाबत संबोधित करतात. पहिले, नीतीसुत्रे 22:6 आपल्याला सांगते की, “मुलाच्या स्थितीस अनुरूप असे शिक्षण त्याला दे, म्हणजे वृद्धपणीही तो त्यापासून परावृत्त होणार नाही.” सर्व मुलांसाठी ज्या मार्गांनी त्यांनी गेले पाहिजे तो देवाकडे जाणारा असला पाहिजे. मुलांना देवाच्या वचनांमधून शिकवणे हे सर्व मुलांसाठी महत्वपूर्ण आहे, ज्यांनी हे समजले पाहिजे की देव कोण आहे आणि उत्तमप्रकारे त्याची सेवा कशी करायची. मजबूत इच्छा असलेल्या मुलाबरोबर, त्याला काय प्रोत्साहित करते—नियंत्रण करण्याची इच्छा—ते समजून घेऊन त्याला त्याचा “मार्ग” शोधण्यास मदत करण्यात खूप लांबपर्यंत मदत होऊ शकते. बंडखोर मुलगा असा एक आहे ज्याने हे समजून घेतले पाहिजे की तो या जगाचा प्रमुख नाही—देव आहे—आणि त्याने सरळ देवाच्या मार्गाने गोष्टी केल्या पाहिजेत. यासाठी पालकांची या सत्याबद्दल पूर्णपणे खात्री पटलेली असणे आणि त्यांनी तसे जीवन जगणे गरजेचे आहे. एक पालक जो स्वतः देवाच्या विरुद्ध बंडखोरी करतो तो त्याच्या मुलाला अधीन राहण्यासाठी सहमत करू शकत नाही.

एकदा का हे स्थापित झाले की देवच काय तो एकटा आहे जो नियम बनवतो, पालकांनी मुलाच्या मनामध्ये हे स्थापित केले पाहिजे की ते देवाचे उपकरण आहेत आणि त्यांच्या कुटुंबासाठी असणाऱ्या देवाच्या योजनांना पार पाडण्यासाठी आवश्यक असलेले काहीही आणि सर्वकाही करतील. बंडखोर मुलाला हे शिकवले पाहिजे की पालकांसाठी नेतृत्व करणे आणि मुलाने त्याचे अनुसरण करणे ही देवाची योजना आहे. या मुद्द्यावर कोणतीही कमजोरी नसली पाहिजे. मजबूत इच्छा असलेले मुल अनिश्चिततेला एक मैल दूरवरून ओळखू शकते, आणि नेतृत्वाच्या पोकळीला भरून काढण्यासाठी आणि नियंत्रण घेण्यासाठी त्या संधीमध्ये उडी मारेल. मजबूत इच्छा असलेल्या मुलासाठी अधिकाराच्या अधीन असण्याचे तत्व महत्वाचे आहे. जर अधीन राहणे लहानपणी शिकले गेले नाही तर, भविष्य सर्व अधिकाऱ्यांबरोबर संघर्षाने वैशिष्ट्यीकृत होईल, ज्यामध्ये मालक, पोलीस, कोर्ट कायदे, आणि सैन्यातील पुढारी यांचा समावेश होतो. रोमकरांस पत्र 13:1-5 हे स्पष्ट करते की, आपल्यावर असणारे अधिकारी देवाने स्थापित केलेले आहेत, आणि आपण त्यांच्या अधीन राहिले पाहिजे.

आणखी, मजबूत इच्छा असलेले मूल केवळ स्वेच्छेने नियमांचे किंवा कायद्यांचे पालन करील, जेंव्हा त्यांची त्याला जाणीव होईल. त्याला नियमांसाठी एक भक्कम कारण देऊन, सतत या सत्याला पुन्हा पुन्हा सांगायला हवे, की आपण जशी देवाची इच्छा आहे तश्याच गोष्टी केल्या पाहिजेत आणि य वस्तुस्थिती बरोबर तडजोड केली जाऊ शकत नाही. देवाने पालकांना त्यांच्या मुलावर प्रेम करण्याची आणि त्याला शिस्त लावण्याची जबाबदारी दिलेली आहे, आणि तसे करण्यात ते अपयशी झाले तर याचा अर्थ पालक देवाची अवज्ञा करत आहेत असा होतो हे स्पष्ट करा. तथापि, ज्या वेळी शक्य असेल, त्यावेळी मुलाला स्वतः निर्णय घेण्यास मदत करा, जेणेकरून त्याला पूर्णपणे निर्बळ वाटणार नाही. उदाहरणार्थ, मंडळीमध्ये जाणे यामध्ये तडजोड केली जाऊ शकत नाही, कारण देवाने आपल्याला इतर विश्वासणाऱ्यांच्या बरोबर एकत्रित जमण्याची आज्ञा केली आहे (इब्री 10:25), परंतु मुले हे सांगू शकतात (करणामध्ये) त्यांना काय घालायचे आहे, कुटुंब कोठे बसेल, इत्यादी. त्यांना असे प्रकल्प द्या, जसे की कुटुंबाच्या सुट्ट्यांचे नियोजन करणे, ज्यामध्ये ते स्वतःची मते देऊ शकतील.

अजून, पालकत्व सुसंगती आणि सहनशीलता यांच्याबरोबर करणे जरुरी आहे. पालकांनी त्यांचा आवाज वाढणार नाही किंवा रागामध्ये ते हात उचलणार नाहीत किंवा त्यांचा संयम सुटणार नाही याचा प्रयत्न केला पाहिजे. हे मजबूत इच्छा असणाऱ्या मुलाला तो/ती ज्या नियंत्रणाची वाट बघत होते त्याची जाणीव करून देईल आणि तो/ती लगेचच एखाद्या ठिकाणी भावनिकदृष्ट्या प्रतिसाद द्यायला लावून तुम्हाला निराश करण्याद्वारे तुमच्यावर निंयत्रण कसे मिळवू शकतो त्याचा उपाय करील.या मुलांना शारीरिक शिस्त लावण्यात बऱ्याचदा अपयश येते, कारण त्यांना पालकांना ते तुटतील इथपर्यंत ढकलण्यात मज्जा येते की त्यामुळे त्यांना थोड्या वेदना जरी झाल्या तरी त्या सहन करण्यास ते तयार असतात. मजबूत इच्छा असलेल्या मुलांच्या पालकांची बऱ्याचदा अशी तक्रार असते की त्यांचे मुल त्याला थापट मारताना त्यांच्यावरच हसते, म्हणून अशा मुलांना शिस्त लावताना थापट मारण्याची पद्धत योग्य नाही. कदाचित आयुष्यामध्ये आत्म्याची ख्रिस्ती फळे सहनशीलता आणि स्व-नियंत्रण (गलतीकरांस पत्र 5:23) यांची गरज जितकी लागली नव्हती तितकी त्याची अधिक गरज मजबूत इच्छा असलेले/बंडखोर मुलाबरोबर लागेल.

ही मुले पालकांना कितीही संताप आणणारी असली तरीही, पालक देवाचे अभिवचन की, तो आपल्याला सहनशक्तीच्या पलीकडे परीक्षेमध्ये आणणार नाही (1 करिंथ 10:13) यामध्ये विश्रांती घेऊ शकतात. जर देवाने त्यांना मजबूत इच्छा असलेले मुल दिले आहे, तर पालकांची याबद्दल खात्री असली पाहिजे की त्याने काही चूक केली नाही आणि तो हे काम करण्यासाठी लागणारे मार्गदर्शन आणि संसाधन यांची तरतूद करेल. कदाचित “निरंतर प्रार्थना करा” (1 थेस्सलनी 5:17) या शब्दांचा अर्थ पालकांच्या आयुष्यात त्यांना कधीही कळला नसेल, जितका जास्त तो मजबूत इच्छा असणाऱ्या किशोरवयीन मुलाबरोबर कळेल. अशा मुलांच्या पालकांना त्यांचा बराच वेळ देवासमोर गुढघ्यांवर देवाकडे सुज्ञान मागण्यात, ज्याला देण्याचे त्याने अभिवचन दिले आहे (याकोब 1:5) घालवावा लागतो. शेवटी, या गोष्टीची माहिती असण्यामध्ये समाधान आहे की, मजबूत इच्छा असणारे मूळ ज्याला चांगल्या प्रकारे प्रशिक्षित केले गेले आहे, तो बऱ्याचदा मोठा होऊन उच्च-साध्य, यशस्वी प्रौढ बनतो. अनेक बंडखोर मुले धाडसी, वचनबद्ध ख्रिस्ती बनतात, जे त्यांच्या पालकांच्या सहनशील आणि मेहनती प्रयत्नातून प्रेम आणि आदर यामध्ये येतात, आणि जे त्यांच्या विशेष कौशल्याचा उपयोग जास्त प्रमाणात देवाची सेवा करण्यासाठी करतात.

English



मराठीच्या पहिल्या पानावर वापस या

बंडखोर मुलाबरोबर काय करावे असे पवित्र शास्त्र सांगते?
© Copyright Got Questions Ministries