मंडळी अंतराळात उचलली जाणे हे काय आहे?


प्रश्नः मंडळी अंतराळात उचलली जाणे हे काय आहे?

उत्तरः
(राप्चर) अंतराळात उचलले जाणे हा शब्द पवित्र शास्त्रामध्ये आढळून येत नाही. हा शब्द एका लॅटिन शब्दावरून आला आहे, ज्याचा अर्थ "पळवून नेणे, वाहून नेणे किवा हिसकावून दूर नेणे" असा आहे. "पळवून नेण्याची" कल्पना किवा मंडळीचे अंतराळात उचलले जाणे पवित्र शास्त्रात स्पष्टपणे शिकविले आहे.

मंडळीचे अंतराळात उचलले जाणे ही आधी घटना आहे, ज्यामध्ये तो सर्व विश्वासणार्‍यांना पृथ्वीवरून हिसकावून दूर नेईल. जेणेकरून महासंकटाच्या काळात त्याचा प्रामाणिक न्याय पृथ्वीवर ओतण्यासाठी त्याला मार्ग मोकळा होईल. अंतराळात उचलले जाण्याचे वर्णन प्रामुख्याने 1 थेस्स 4:13-18 आणि 1 करिंथ 15:50-54 मध्ये केले आहे. सर्व विश्वासणारे जे मेलेले आहेत त्यांना देव पुनरुत्थित करेल, त्यांना गौरवी शरीर देईल आणि सर्व जीवंत असलेले विश्वासणारे त्यांनासुद्धा त्यावेळी गौरवी शरीर देण्यात येईल, त्यांच्यासोबत पृथ्वीवरून दूर घेऊन जाईल. "कारण, आज्ञाध्वनी, आद्यदेवदूताची वाणी व देवच्या तुतारीचा नाद होत असता प्रभू स्वतः स्वर्गातून उतरेल, आणि ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहेत ते पहिल्याने उठातील; नंतर जीवंत उरलेले आपण त्यांच्या बरोबर प्रभूला सामोरे होण्यासाठी मेघारूढ असे अंतराळात घेतले जाऊ, आणि तसेच सदासर्वदा प्रभूजवळ राहू (1 थेस्स 4:16,17).

आपले सर्वकालिकते करिता योग्य राहण्यासाठी एका क्षणार्धात घडणार्‍या रूपांतरचा अंतराळात उचलले जाण्याच्या प्रक्रियेत समावेश असेल. "तो (ख्रिस्त) प्रगट होईल तेव्हा आपण त्याच्यासारखे होवू हे आपल्याला माहीत आहे, कारण जसा तो आहे तसाच तो आपल्याला दिसेल" (1योहान 3:2). अंतराळात उचलेल जाणे हे ख्रिस्ताच्या दुसर्‍या आगमनापासून वेगळे गणिले आहे. अंतराळात उचलले जाण्याच्या वेळी प्रभू "मेघारूढ होवून" आपणास "अंतराळात" भेटेल (1 थेस्स 4:17). दुसर्‍या आगमनच्या वेळी प्रभू जैतून झाडांच्या डोंगरावर उभा राहण्यासाठी स्वर्गातून पृथ्वीवर उतरेल, ज्याचा परिणाम एका मोठ्या भूमीकंपात होईल व त्या पाठोपाठ देवाच्या शत्रूंचा पराभव होईल (जखर्‍या 14:3-4).

अंतराळात उचलले जाण्याची तत्वप्रणाली (सिद्धांत) जुन्याकरारात शिकविली गेली नाही आणि म्हणून पौल त्याला आता प्रकट झालेले "रहस्य" असे म्हणतो: "पहा, मी तुम्हास एक रहस्य सांगतो; आपण सर्वच महानिद्रा घेणार नाही, तरी आपण सर्वजण बदलून जाऊ; क्षणांत, निमिष्यांत, शेवटला कर्णा वाजेल तेव्हा; कारण कर्णा वाजेल, मेलेले ते अविनाशी असे उठविले जातील, आणि आपण बदलून जाऊ (1 करिंथ 15:51-52).

अंतराळात उचलले जाणे ही एक गौरवी घटना आहे ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत. सरतेशेवटी आपण पापापासून मुक्त होवू. आपण सदासर्वदा देवाच्या उपस्थितीत राहू. अंतराळात उचलले जाणे ह्याचा अर्थ व संधी ह्याबाबत जगत अतिशय चर्चा केली जात आहे. पण देवाचा हेतु हा नाही, खरे पहिले तर अंतराळात उचलले जाणे ही एक दिलासा देणारी व आशेने पूर्ण भरलेली तत्व प्रणाली आहे, आणि देवाची इच्छा आहे की आपण "ह्या वचनांनी एकमेकांचे सांत्वन करावे" (1थेस्स 4:18).

English
मराठीच्या पहिल्या पानावर वापस या
मंडळी अंतराळात उचलली जाणे हे काय आहे?