settings icon
share icon
प्रश्नः

महासंकटाच्या संबंधांने अंतराळात उचलले जाणे केव्हा घडणार आहे?

उत्तरः


महासंकटाच्या संबंधांने अंतराळात उचलले जाणे हा आज मंडळीत सर्वात जास्त वादग्रस्त विषयांपैकी एक विषय आहे. महासंकटपूर्व (महासंकटा अगोदर मंडळी अंतरराळात उचलल्या जाण्याची प्रक्रिया घडेल), महासंकटमध्य (मंडळी अंतरराळात उचलल्या जाण्याची प्रक्रिया महासंकटाच्या मध्यबिंदुपाशी किवा त्याच्या जवळ घडेल) आणि महासंकटांनंतर (महासंकटाच्या शेवटी मंडळी अंतराळात उचलली जाण्याची प्रक्रिया घडेल) हे तीन प्राथमिक दृष्टीकोण आहेत. चौथा दृष्टीकोण जो सामान्यतः क्रोधपूर्व म्हणून ओळखला जातो तो मध्यमहासंकट स्थितीचा क्षुल्लक बदल आहे.

प्रथम महासंकटाचा उद्देश ओळखणे महत्वाचे आहे. दानिएल 9:27 नुसार एक सत्तरावा "सात" (सात वर्ष) ते आहे जे अजून येणे बाकी आहे. दानिएलाची सत्तर सात ची संपूर्ण भविष्यवाणी (दानिएल 9:20-27) इस्राएल राष्ट्राच्याबद्दल सांगत आहे. हा तो कालखंड आहे ज्यामध्ये देव त्याचे लक्ष विशेषकरून इस्राएलवर केन्द्रित करणार आहे. सत्तरावा सत्तर, महासंकट, एक असा काळ असला पाहिजे जेव्हा देव विशेषकरून इस्राएलसोबत व्यवहार करणार आहे. जेव्हा हे अटळपणे असे दर्शवीत नाही की मंडळी सुद्धा उपस्थित राहू शकणार नाही तेव्हा एक असा प्रश्न पुढे येतो की त्याकाळाच्या दरम्यान मंडळीला का पृथ्वीवर राहण्याची गरज पडेल.

अंतराळात उचलले जण्यावर पवित्र शास्त्रात प्राथमिक शास्त्रभाग 1थेस्स 4:13-18 हा आहे. तो स्पष्टपणे सांगतो की जीवंत असलेले सर्व विश्वासणारे व त्यांच्यासोबत मरण पावलेले सर्व विश्वासणारे प्रभू येशूला अंतराळात भेटतील आणि ते त्याच्यासोबत सदासर्वदा राहतील. अंतराळात उचलले जाणे म्हणजे देव त्याच्या लोकांना पृथ्वीवरून दूर नेईल. थोड्यावचनानंतर 1 थेस्स 5:9 मध्ये पौल म्हणतो, "कारण आपल्यावर क्रोध व्हावा म्हणून नव्हे, तर आपला प्रभू येशू ख्रिस्त हयाच्याद्वारे आपले तारण व्हावे म्हणून देवाने आपल्याला नेमले आहे." प्रकटीकरणाचे पुस्तक जे प्रामुख्याने महासंकटाच्या कालखंडासोबत संबंध ठेवते ते देव महासंकटाच्या दरम्यान पृथ्वीवर त्याचा क्रोध कसा प्रवाह रूपाने ओतेल याचा एक भविष्यसूचक संदेश आहे. विश्वासणार्‍यांना वचन देणे की ते क्रोधामुळे दुःख सोसणार नाही आणि मग महासंकटाच्या क्रोधामध्ये दुःख सोसण्यासाठी त्यांना पृथ्वीवर सोडून देणे हे देवासाठी विसंगत असे दिसून येते. त्याच्या लोकांना पृथ्वीवरून दूर नेण्याचे वचन दिल्यानंतर ख्रिस्तीलोकांना क्रोधापासून थोडक्यात मुक्त करण्याचे दिलेले वचन ही वस्तुस्थिती त्या दोन घटनांना एकत्र जोडलेली दिसून येते.

अंतराळात उचलले जाण्याची वेळ ह्यावर दूसरा महत्वाचा शास्त्रभाग प्रकटीकरण 3:10 आहे ज्यामधे ख्रिस्त विश्वासणार्‍यांना "परीक्षा प्रसंगा" पासून मुक्त करण्याचे वचन देतो जो पृथ्वीवर येणार आहे. "पासून" ह्या भाषांतरीत केलेल्या ग्रीक शब्दाचे दोन्ही वैध किवा सबळ अर्थ आहेत.

तथापि हे ओळखणे नाहत्वाचे आहे की विश्वासणार्‍यांना कशापासून सवरक्षण करण्याचे वचन दिले आहे. ती केवळ परीक्षा नाही, परंतू "प्रसंगाची" परीक्षा आहे. ख्रिस्त विश्वासणार्‍यांना त्या कालखंडापासून वाचविण्याचे वचन देत आहे ज्यामध्ये परीक्षांचा समावेश आहे म्हणजे महासंकट. महासंकटाचा उद्देश, अंतराळात उचलले जाण्याचा उद्देश, 1 थेस्स 5:9 चा अर्थ आणि प्रगटीकरण 3:10 चे स्पष्टीकरण ह्यासर्व बाबी महासंकटपूर्वीच्या स्थितीला आधार देतात. जर पवित्र शास्त्राचे स्पष्टीकरण शब्दशः व सुसंगतपणे केले आहे तर महासंकटपूर्व स्थिति पवित्र शास्त्राविषयी आधारलेले स्पष्टीकरण आहे.

Englishमराठीच्या पहिल्या पानावर वापस या

महासंकटाच्या संबंधांने अंतराळात उचलले जाणे केव्हा घडणार आहे?
© Copyright Got Questions Ministries