जीवनातील हेतू कसा शोधावा याविषयी बायबल काय म्हणते?


प्रश्नः जीवनातील हेतू कसा शोधावा याविषयी बायबल काय म्हणते?

उत्तरः
आमच्या जीवनातील हेतू काय असावा याविषयी बायबल अत्यंत स्पष्ट आहे. जुन्या व नव्या करारातील लोकांनी जीवनातील हेतू शोधला आणि तो त्यांस प्राप्त झाला. पृथ्वीतलावरील सर्वात बुद्धिमान पुरुष, शलमोन, याला कळून आले की केवळ ह्या जगापुरते जगल्यास जीवन हे व्यर्थ ठरते. तो आमच्यासाठी उपदेशकाच्या पुस्तकात हे शेवटचे विचार मांडतो: "आता सर्व काही तुम्ही ऐकले; सर्वांचे सार हे की देवाचे भय धर व त्याच्या आज्ञा पाळ; सगळîा बर्यावाईट गुप्त गोष्टींचा न्याय करितांना देव सगळîा कृत्यांची झाडाझडती घेईल" (उपदेशक 12:13-14), शलमोन म्हणतो की आम्ही आपल्या जीवनात आपल्या विचारांनी आणि जीवनाने देवाचे गौरव करावे आणि त्याच्या आज्ञांचे पालन करावे, एके दिवशी आम्ही त्याच्या न्यायासनासमोर उभे राहणार आहोत. जीवनातील आमच्या हेतूचा एक भाग आहे देवाचे भय धरणे आणि त्याच्या आज्ञेचे पालन करणे.

आमच्या हेतूचा दुसरा भाग जीवनाकडे ह्या पृथ्वीवरील दृष्टिकोनातून पाहणे. ज्यांचे लक्ष ह्या जीवनावर आहे त्यांच्या विपरीत, राजा दावीद येणार्या समयात त्याचे समाधान शोधित होता. त्याने म्हटले, "मी तर — नीतिमान ठरून मला तुझ्या मुखाचे दर्शन घडो. मी जागा होईन तेव्हा तुझ्या दर्शनाने माझी तृप्ति होवो" (स्तोत्रसंहिता 17:15). दाविदाला पूर्ण समाधान अथवा तृप्ती त्या दिवशी येणार होती ज्या दिवशी तो देवाच्या मुखाचे दर्शन घेत (त्याच्याशी सहभागित्व) आणि त्याच्यासमान होत (योहानाचे 1 ले पत्र 3:2) जागे होणार होता (पुढील जीवनात).

स्तोत्रसंहिता 73 मध्ये, आसाफ म्हणतो की कशाप्रकारे तो दुर्जनांचा उत्कर्ष पाहून त्यांचा हेवा करू लागला ज्यांना कुठलीच काळजी नव्हती आणि जे इतरांच्या पाठीच्या बळावर संपत्तीची उभारणी करीत, त्यांचा ते फायदा घेत, पण नंतर त्याने त्यांच्या शेवटाचा विचार केला. त्यांनी जे मिळविण्याचा प्रयत्न केला त्या विपरीत, तो 25व्या वचनात त्याच्यासाठी काय महत्वाचे आहे ते सांगतो: "स्वर्गात तुझ्याशिवाय मला कोण आहे? पृथ्वीवर मला तुझ्याशिवाय दुसरा कोणीही प्रिय नाही." आसाफाला, जीवनातील इतर सर्व गोष्टींपेक्षा देवासोबतचे नाते अधिक महत्वाचे वाटले. त्या नात्याशिवाय जीवनाचा काहीच हेतू नाही.

प्रेषित पौलाने त्या सर्व गोष्टींविषयी सांगितले आहे जे त्याने पुनरुत्थित ख्रिस्ताशी भेट घडण्यापूर्वी धार्मिकतेने प्राप्त केले होते, आणि त्याने निष्कर्ष काढला की येशू ख्रिस्त ह्याच्या विषयीच्या ज्ञानाच्या श्रेष्ठपणाच्या तुलनेत ते सर्वकाही केरकचरा असे होते. फिलिप्पैकरांस पत्र 3:9-10 या वचनांत पौल म्हणतो की मी ख्रिस्ताला जाणावे आणि "मी त्याच्याठायी आढळावे", त्याचे नीतिमत्व प्राप्त करावे आणि त्याच्याठायी विश्वासाने जगावे यापेक्षा अधिक त्याला काही नको, जरी त्याचा अर्थ क्लेश आणि मृत्यू का असेना. पौलाचा हेतू ख्रिस्तास जाणणे, त्याच्याठायी विश्वासाद्वारे नीतिमत्व प्राप्त करणे, आणि त्याच्या सहभागित्वात जगणे हा होता, त्याद्वारे त्याला क्लेश सहावे लागले याची त्याला परवा नव्हती (तीमथ्याला 2 रे पत्र 3:12). शेवटी, तो अशा वेळेच्या प्रतीक्षेत होता जेव्हा तो "मृतांच्या पुनरुत्थानाचा" भागी होईल.

देवाने प्रारंभी मनुष्याची उत्पत्ती केल्याप्रमाणे, जीवनातील आमचा हेतू, हा आहे 1) देवाचे गौरव करणे आणि त्याच्या सहभागित्वाचा आनंद उपभोगणे, 2) इतरांसोबत उत्तम संबंध राखणे, 3) काम करणे, आणि 4) पृृथ्वीवर प्रभुत्व गाजविणे. पण पापात पडल्यानंतर, मनुष्याचे देवाशी सहभागित्व तुटले, इतरांसोबत त्याच्या संबंधात तुटातुट झाली, काम नेहमीच निराशाजनक वाटते, आणि निसर्गावर वर्चस्व राखून ठेवण्यासाठी मनुष्य संघर्ष करीत असतो. केवळ देवासोबत सहभागित्व स्थापन करण्याद्वारे, येशू ख्रिस्तावरील विश्वासाद्वारे, जीवनातील हेतू पुन्हा प्राप्त करता येऊ शकतो.

मानवाचा हेतू देवाचा गौरव करणे आणि त्याच्यासोबत सदैव आनंद अनुभवणे हा आहे. आपण देवाचे भय मानून आणि त्याच्या आज्ञेचे पालन करण्याद्वारे, स्वर्गातील आमच्या भविष्यातील घरावर आपले डोळे लावून, आणि त्याला निकटतेने जाणून त्याचे गौरव करू शकतो. आमच्या जीवनांसाठी देवाच्या हेतूचे अनुसरण करून आपण देवाचा आनंद घेऊ शकतो, ज्याद्वारे आपण खर्या व स्थायी आनंदाचा अनुभव करू शकतो — विपुल जीवनाचा जो आम्ही प्राप्त करावा अशी त्याची इच्छा आहे.

English
मराठीच्या पहिल्या पानावर वापस या
जीवनातील हेतू कसा शोधावा याविषयी बायबल काय म्हणते?