ख्रिस्ती आईवडिलांस जर उधळा पुत्र (अथवा मुलगी) असेल तर त्यांनी काय करावे?


प्रश्नः ख्रिस्ती आईवडिलांस जर उधळा पुत्र (अथवा मुलगी) असेल तर त्यांनी काय करावे?

उत्तरः
उधळ्या पुत्राच्या गोष्टीत (लूक 15:11-32) अनेक सिद्धांत आहेत ज्यांचा उपयोग आपल्या मुलांप्रत प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठी आणि त्यांस हाताळण्यासाठी विश्वासणारे आईवडील करू शकतात अशा मुलांस जी आईवडिलांनी शिकविलेल्या मार्गाच्या अगदी विरुद्ध चालतात. आईवडिलांस हे लक्षात ठेवण्याची गरज आहे की त्यांची मुले प्रौढावस्थेस पोहोचल्यावर, ती आपल्या आईवडिलांच्या अधिकारात नसतात.

उधळ्या पुत्राच्या गोष्टीत, धाकट्या पुत्राने आपल्या हक्काची संपत्ती घेतली आणि तो दूर देशास निघून गेला व त्याने ती उधळून टाकली. नवा जन्म पावलेला विश्वासणारा नसलेल्या मुलाच्या बाबतीत, ही स्वाभाविकतःच घडणारी गोष्ट आहे. अशा मुलाच्या बाबत ज्याने एकदा ख्रिस्ताठायी आपल्या विश्वासाचा स्पष्ट अंगीकार केलेला आहे, त्या मुलास आपण "उधळा" म्हणू शकतो. ह्या शब्दाचा अर्थ आहे "असा व्यक्ती ज्याने आपली संपत्ती वाया घालविली आहे," अशा मुलाचे उत्तम वर्णन जो घर सोडून जातो आणि त्याच्या आईबापांनी त्याच्याठायी गुंतविलेला आध्यात्मिक वारसा उधळून लावता तोे. संगोपन, शिक्षण, प्रेम, आणि देखरेख यांच्या सर्व वर्षांचा त्यांस विसर पडतो कारण हे मूल देवाविरुद्ध बंड करते. सर्व बंड हे प्रथम देवाविरुद्ध आहे, आणि आईबापाविरुद्धच्या आणि त्यांच्या अधिकाराविरुद्ध बंडात प्रगट होते.

लक्षात घ्या की ह्या दाखल्यातील पिता आपल्या मुलास सोडून जाण्यापासून थांबवत नाही. तो मुलाचे रक्षण करण्यासाठी त्याच्या मागोमागही जात नाही. तर, हा पिता विश्वासूपणे घरी राहून प्रार्थना करतो, आणि जेव्हा ते मूल "भानावर येते" आणि मागे वळते आणि परतते, तेव्हा त्याचा पिता वाट पाहत आहे आणि बघत आहे आणि जरी तो मुलगा "दूरवर आहे" तरी तो धावत जाऊन त्याचे स्वागत करतो.

जेव्हा आमची मुले व मुली आपल्या मार्गाने निघून जातात — हे समजतात की असे करण्याचे त्यांचे कायदेशीर वय झालेले आहे — आणि अशा निवडी करतात ज्यांचे परिणाम वाईट होतील हे आम्हास माहीत आहे, अशा आईवडिलांनी त्यांना सोडून द्यावे आणि जाऊ द्यावे. आईवडील त्याच्या मागोमाग जात नाहीत, आणि आईवडील येणार्‍या परिणामांसोबत हस्तक्षेप करीत नाहीत. तर, आईवडील घरी राहतात, विश्वासूपणे प्रार्थना करीत राहतात आणि पश्चातापाच्या चिन्हाची आणि मार्ग परिवर्तनाची वाट पाहतात. ते होईपर्यंत, आईवडील आपल्या गोष्टीत टिकून राहतात, बंडाचे समर्थन करीत नाहीत, आणि हस्तक्षेप करीत नाहीत (पेत्राचे 1 पत्र 4:15).

मुले कायदेशीररित्या वयात आल्यावर, ते केवळ देवाच्या अधिकाराधीन व सरकारच्या प्रतिनिधित अधिकाराधीन असतात (रोमकरांस पत्र 13:1-7). आईवडील या नात्याने, आपण आपल्या उधळ्या मुलांस प्रेमाने आणि प्रार्थनेने आधार देऊ शकतो आणि जेव्हा ते देवाकडे वळू लागतात तेव्हा त्यांच्या बाजूस येण्यास तयार होऊ शकतो. देव बरेचदा आम्ही स्वतःवर ओढविलेल्या संकटाचा उपयोग आम्हास बुद्धी प्राप्त व्हावी म्हणून करतो, आणि त्यास योग्य तो प्रतिसाद द्यावा हे त्याच्या हाती आहे. आईवडील या नात्याने, आम्ही आपल्या मुलांचे तारण करू शकत नाही — केवळ देव ते करू शकतो. ती वेळ येईपर्यंत, आपण जागृत राहिले पाहिजे, प्रार्थना करीत राहिले पाहिजे, आणि ती बाब देवाच्या हाती सोडली पाहिजे. ही दुःखदायक प्रक्रिया असू शकते, पण बायबलनुसार ती पूर्ण केल्यास, त्याद्वारे मनाची व अंतःकरणाची शांती प्राप्त होईल. आम्ही आपल्या मुलांचा न्याय करू शकत नाही, केवळ देव करू शकतो. ह्या वचनात एक मोठे सांत्वन आहे: "सर्व जगाचा न्यायाधीश योग्य न्याय करणार नाही काय?" (उत्पत्ती 18:25ब).

English
मराठीच्या पहिल्या पानावर वापस या
ख्रिस्ती आईवडिलांस जर उधळा पुत्र (अथवा मुलगी) असेल तर त्यांनी काय करावे?