settings icon
share icon
प्रश्नः

मी विवाहापूर्वी स्वतःस कसे तयार करू शकतो?

उत्तरः


स्वतःला बायबलच्या आधारे विवाहासाठी तयार करणे हे जीवनाच्या कुठल्याही उद्योगासारखेच आहे. एक सिद्धांत आहे ज्याचे शासन नवा जन्म पावलेले विश्वासणारे म्हणून आमच्या जीवनाच्या सर्व पैलूंवर असावे: "तो त्याला म्हणाला, तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, 'पूर्ण जिवाने' व 'पूर्ण' मनाने प्रीति कर" (मत्तय 22:37). ही गांभीर्यशून्य आज्ञा नाही. ती विश्वासणारे म्हणून आमच्या जीवनांचा केंद्र आहे. ते देवावर आणि त्याच्या वचनावर आपल्या संपूर्ण अंतःकरणाने लक्ष केंद्रित करण्याची निवड करणे होय यासाठी की आमचे प्राण आणि आमची मने त्याला प्रसन्न करणार्‍या गोष्टींत गुंतलेली असावी.

प्रभु येशू ख्रिस्ताद्वारे देवासोबत आमचे जे नाते आहे ते इतर सर्व नात्यांचे महत्व विशद करते. वैवाहिक नाते ख्रिस्त आणि त्याच्या मंडळीच्या नमून्यावर आधारित आहे (इफिसकरांस पत्र 5:22-33). आमच्या जीवनांचा प्रत्येक पैलू विश्वासणारे म्हणून आमच्या समर्पणाद्वारे चालविला जातो यासाठी की आम्ही प्रभूच्या आज्ञा व नियमांनुसार जगावे. देवाप्रत आणि त्याच्या वचनाप्रत आमचा आज्ञाधारकपणा वैवाहिक जीवनात आणि जगात देवाने आम्हास दिलेली कर्तव्ये पार पाडण्यासाठी आम्हास सुसज्जित करतो. आणि प्रत्येक नवा जन्म पावलेल्या विश्वासणार्‍याचे कर्तव्य सर्व गोष्टींत देवास गौरव देणे हे आहे (करिंथकरांस 1 ले पत्र 10:31).

स्वतःस विवाहाप्रीत्यर्थ तयार करण्यासाठी, येशू ख्रिस्ताठायी आपल्या पाचारणानुसार वागण्यासाठी, आणि देवाच्या वचनाच्या द्वारे त्याच्या निकट सान्निध्यात येण्यासाठी (तीमथ्याला 2 रे पत्र 3:16-17), सर्व बाबतीत आज्ञापालनाकडे लक्ष द्या. देवाच्या आज्ञेत चालावयास शिकण्यासाठी कोणतीही सोपी योजना नाही. जगीक दृष्टिकोन बाजूला सारून ठेवण्याची आणि त्याऐवजी देवाचे अनुसरण करण्याची निवड आम्ही दररोज केली पाहिजे. ख्रिस्तास साजेलसे वागणे म्हणजे नम्रपणे स्वतःस त्या एकमेव मार्गाप्रत, एकमेव सत्याप्रत आणि एकमेव जीवनाप्रत, दैनिक, क्षण-दर-क्षणच्या आधारे समर्पित करणे होय. विवाह म्हटल्या जाणार्‍या मोठ्या बक्षिसासाठी तयार राहण्याकरिता प्रत्येक विश्वासणार्‍याने करावयाची ही तयारी आहे.

आध्यात्मिकरित्या परिपक्व व्यक्ती आणि जो देवासोबत वाटचाल करतो तो इतर कोणापेक्षाही विवाहासाठी अधिक तयारीत असतो. विवाहासाठी समर्पण, उत्साह, नम्रता, प्रीती, आणि आदरभावनेची गरज असते. हे गुण अशा व्यक्तीत अत्यंत स्पष्टपणे दिसतात ज्याचे देवासोबत नाते असते. जेव्हा आपण स्वतःस विवाहासाठी तयार करता, तेव्हा देवास आपणास अशा स्त्री वा पुरुषात रचण्याची व घडविण्याची मुभा द्या जसे आपण असावे असे त्याला वाटते (रोमकरांस पत्र 12:1-2). जर आपण स्वतःस त्याच्या अधीन कराल, तर विवाहाचा अद्भुत दिवस येईल तेव्हा तो आपणास त्याच्यासाठी तयार राहण्याची पात्रता देईल.

English



मराठीच्या पहिल्या पानावर वापस या

मी विवाहापूर्वी स्वतःस कसे तयार करू शकतो?
© Copyright Got Questions Ministries