settings icon
share icon
प्रश्नः

सामर्थ्यवान प्रार्थना जीवनात येणारे काही अडथळे काय आहेत?

उत्तरः


परिणामकारक प्रार्थनेमध्ये सर्वाधिक येणारा सर्वात स्पष्ट अडथळा हा जो प्रार्थना करतो आहे, त्याच्या हृदयात कबूल न केलेल्या पापांची उपस्थिती आहे. कारण आपला देव पवित्र आहे, जेंव्हा आपण आपल्या जीवनातील कबूल न केलेल्या पापांसोबत देवाकडे येतो तेंव्हा त्याच्यामध्ये आणि आपल्यामध्ये एक अडथळा असतो. “तर तुमचे अपराध तुम्ही व तुमचा देव यांच्यामध्ये आडभिंतीप्रमाणे झाले आहेत; तुमच्या पताकांमुळे तो तुम्हास दर्शन देत नाही, तुमचे ऐकत नाही (यशया 59:2). जे लोक त्यांचे पाप लपवण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यापासून देव दूर असतो हे दावीदाने अनुभवावरून जाणून त्याच्याशी सहमत झाला: “माझ्या मानत दुष्कार्माचा विचार असता तर प्रभू माझे ऐकले नसतेस” (स्तोत्रसंहिता 66:18).

पवित्रशास्त्र परिणामकारक प्रार्थनेमध्ये अडथळा करणाऱ्या पपांच्या अनेक भागांचा संदर्भ देते. प्रथम, जेंव्हा आपण आत्म्याऐवजी, शरीराच्या इच्छेप्रमाणे जीवन जगतो, तेंव्हा आपली प्रार्थना करण्याची इच्छा आणि देवाबरोबर परिणामकारक संवाद साधण्याच्या क्षमतेमध्ये अडथळा निर्माण होतो. जेंव्हा आपण नव्याने जन्मतो तेंव्हा जरी आपल्याला नवीन स्वभाव मिळतो, तरी तो नवीन स्वभाव जुन्या शरीरात राहतो, आणि तो आपला जुना “तंबू” हा भ्रष्ट आणि पापमय आहे. शरीर आपल्या क्रियांवर, वृत्तींवर, आणि हेतुंवर नियंत्रण मिळवू शकते, जोपर्यंत आपण “शरीराच्या कर्मांना ठार मारण्यासाठी” (रोमकरांस पत्र 8:13) कष्ट घेत नाही, आणि आत्म्याद्वारे देवाबरोबर योग्य संबंधात चालत नाही, तेंव्हाच आपण त्याच्याबरोबर प्रार्थनेमध्ये जवळून संवाद साधण्यास सक्षम होऊ शकतो.

देहामध्ये राहण्याचा एक मार्ग म्हणजे स्वार्थीपणा होय, हा परिणामकारक प्रार्थनेमधील अजून एक अडथळा आहे. जेंव्हा आपण स्वार्थी हेतूने प्रार्थना करतो, जेंव्हा आपण देवाला त्याला जे पाहिजे त्याऐवजी आपल्याला जे हवे ते मागतो, तेंव्हा आपले हेतू आपल्या प्रार्थनेमध्ये अडथळा बनतात. “त्याच्यासमोर येण्यास आपल्याला जे धैर्य आहे ते ह्यावरून की, आपण त्याच्या इच्छेप्रमाणे काही मागितले तर तो आपले ऐकेल” (1 योहान 5:14). देवाच्या इच्छेप्रमाणे मागणे म्हणजे, त्याची इच्छा जी काही असेल ती आपल्याला माहित असो वा नसो तरीदेखील त्या इच्छेला समर्पित होणे आहे. जसे येशू हा सर्व गोष्टींमधील प्रार्थनेमध्ये आपले उदहरण असला पाहिजे. त्याने नेहमी त्याच्या पित्याच्या इच्छेप्रमाणे प्रार्थना केली: “तरी माझ्या इच्छेप्रमाणे नको, तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे” (लूक 22:42). स्वार्थी प्रार्थना या नेहमीच स्वतःच्या इच्छांना संतुष्ट करण्याच्या हेतूने केल्या जातात, आणि देव त्या ऐकेल याची अपेक्षा आपण नाही केली पाहिजे. “तुम्ही मागता परंतु तुम्हास मिळत नाही; कारण तुम्ही अयोग्य प्रकारे मागता, म्हणजे आपल्या चैनिकरिता खर्चावे म्हणून मागता” (याकोब 4:3)

स्वार्थी, दैहिक इच्छेनुसार जीवन जगणे सुद्धा आपल्या प्रर्थनांमध्ये अडथळा ठरू शकते, कारण हे दुसऱ्यांप्रती आपले मन कठीण करते. जर आपण दुसऱ्यांच्या गरजांच्या प्रती उदासीन असू, तर देव आपल्या गरजांच्या बाबतीत उदासीन असेल अशी आपण अपेक्षा करू शकतो. जेंव्हा आपण प्रार्थनेमध्ये देवासमोर जातो तेंव्हा आपण पहिल्यांदा देवाच्या इच्छेसंबंधित चिंताशील असले पाहिजे. दुसरे दुसऱ्यांच्या गरजांच्या बाबतीत असायला हवे. आपण आपल्यापेक्षा इतरांना चांगले समजले पाहिजे आणि स्वतःच्या हितापेक्षा दुसऱ्याच्या हिताला प्राधान्य दिले पाहिजे हे समजून घेतले पाहिजे (फिलीप्पैकरांस पत्र 2:3-4).

परिणामकारक प्रार्थनेचा सर्वात मोठा अडथळा हा दुसऱ्यांना क्षमा न करण्याचा आत्मा आहे. जेंव्हा आपण दुसऱ्यांना क्षमा करण्याचे नाकारतो, तेंव्हा आपल्या मनामध्ये कटुता वाढू लागते आणि ती आपल्या प्रार्थनांना अडवते. जर आपल्या मनात दुसऱ्यांप्रती द्वेष आणि कटुता असेल तर, देव आपण जे अपात्र पापी आहोत त्या आपल्यावर आशीर्वादाचा वर्षाव करेल अशी अपेक्षा कशी करू शकतो? मत्तय 18:23-35 मधील कृतघ्न चाकराचा दृष्टांत या परिच्छेदात या तत्वाला खूप चांगल्या प्रकारे स्पष्ट केले आहे. ही गोष्ट आपल्याला शिकवते की देवाने आपले मोजण्यापलीकडे असलेले कर्ज (आपले पाप) माफ केले, आणि तो अशी अपेक्षा करतो की आपण सुद्धा इतरांना माफ केले पाहिजे कारण आपल्याला क्षमा मिळाली आहे. असे करण्यास नकार देणे हे आपल्या प्रार्थनेमध्ये अडथळा ठरू शकते.

परिणामकारक प्रार्थनेमधील अजून एक मोठा अडथळा अविश्वास आणि संशय हा आहे. जसे काही सुचवतात, तसा याचा अर्थ असा होत नाही, की आपण देवाकडे आलो आहो म्हणून तो आपल्या विनंत्या स्वीकार करील कारण तसे करणे त्याला बंधनकारक आहे. संशय न धरता प्रार्थना करणे म्हणजे खात्रीशीर विश्वास ठेवून आणि देवाचे चारित्र्य, स्वभाव, आणि हेतूंना समजून घेऊन प्रार्थना करणे. “आणि विश्वासावाचून त्याला संतोषविणे अशक्य आहे; कारण देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की, तो आहे, आणि त्याचा शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणारा आहे” (इब्री 11:6). जेंव्हा आपण प्रार्थनेमध्ये देवाच्या चारीत्र्यांवर, हेतुंवर, आणि त्याच्या वचनांवर संशय ठेवतो तेंव्हा आपण त्याचा भयानक अपमान करतो. आपला आत्मविश्वास हा तो आपल्या जीवनाबद्दल असलेल्या त्याच्या इच्छेनुसार आणि हेतुनुसार आपली कोणतीही विनंती मान्य करण्याच्या त्याच्या क्षमतेवर असला पाहिजे. आपण हे समजून प्रार्थना केली पाहिजे की, त्याचे जे काही प्रयोजन आहे तीच उत्तम संभाव्य परिस्थिती आहे. “पण त्याने काही संशय न धरता विश्वासाने मागावे; कारण संशय धरणारा वाऱ्याने लोटलेल्या व उचंबळलेल्या समुद्राच्या लाटेसारखा आहे. असा माणूस द्विबुद्धीचा असून आपल्या सर्व कार्यात चंचल असतो. आपणाला प्रभूपासून काही मिळेल असे त्याने समजू नये” (याकोब 1:6-7).

शेवटी, घरामध्ये मतभेद असणे हे निश्चितच प्रार्थनेमधील एक अडथळा आहे. ज्याची वृत्ती त्याच्या पत्नीच्या प्रती ईश्वरीय पेक्षा कमी आहे अशा पतीच्या प्रार्थनेमधील अडथळा म्हणून पेत्र स्पष्टपणे याचा उल्लेख करतो. “पतींनो, तसेच तुम्हीही आपल्या स्त्रियांबरोबर, त्या अधिक नाजूक व्यक्ती आहेत म्हणून सुज्ञतेने सहवास ठेवा; तुम्ही उभयता जीवनरूपी कृपादानाचे सामाईक वतनदार आहा, म्हणून तुम्ही त्यांना मन द्या; म्हणजे तुमच्या प्रर्थानात व्यत्यय येणार नाही” (1 पेत्र 3:7). जिथे कौटुंबिक नात्यामध्ये एक गंभीर संघर्ष आहे आणि घरातील प्रमुख पेत्राच्या उल्लेखानुसार वृत्ती दर्शवित नाही, तेथे पतीच्या देवाबरोबर प्रार्थना संवादामध्ये अडथळा आणला जातो. त्याचप्रमाणे, पत्नी स्वत:च्या प्रार्थनांना अडथळा आणू नयेत तर त्यांनी आपल्या पतींच्या अधीन राहण्याच्या पवित्र शास्त्र संबंधीत तत्त्वांचे पालन केले पाहिजे (इफिसकरांस पत्र 5: 22-24).

सुदैवाने, या सर्व प्रार्थना अडथळ्यांचा एकाच वेळी देवाकडे पश्चात्ताप आणि कबुलीच्या प्रार्थनेमध्ये सामना करता येऊ शकतो. 1 योहान 1:9 मध्ये आपल्याला याची खात्री आहे की, “जर आपण आपली पापे पदरी घेतली, तर तो विश्वसनीय व न्यायी आहे म्हणून आपल्या पापांची क्षमा करील, व आपल्याला सर्व अनीतीपासून शुद्ध करील”. एकदा का आपण ते केले, म्हणजे मग आपण स्पष्ट आणि मोकळ्या मार्गाने देवाशी संवादाचा आनंद घेऊ शकतो, आणि आपल्या प्रार्थनांना फक्त ऐकले आणि त्याचे उत्तर दिले जाणार नाही, तर आपण अतिशय आनंदाने भरले जाऊ.

Englishमराठीच्या पहिल्या पानावर वापस या

सामर्थ्यवान प्रार्थना जीवनात येणारे काही अडथळे काय आहेत?
© Copyright Got Questions Ministries